बुधवार दि. १७ डिसेंबर २०२५

कारची ट्रकला धडक…
कारचालका विरोधात गुन्हा नोंद

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर आजऱ्याहून म्हापशाच्या दिशेने भाजी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँड बॉस गाडीला रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चारचाकी वाहन आणून जोराची धडक देऊन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी कारचालक धीरज प्रकाश पाटील ( वय २१ रा. वारणा कोडोली) तालुका यांच्या विरोधात आजरा पोलिसांत पगुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक १६ रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास हॉटेल राजमुद्रा समोर सदर अपघात झाला. याबाबतची फिर्याद रवी जयवंत कोलकार यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
पुढील तपास हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.

वझरे – उत्तूर मार्गावरील बस फेऱ्या पुन्हा बंद
वझरेवासी यांचा संताप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोरोना परिस्थिती आल्यापासून बंद असणारी व महिनाभरापूर्वी सुरू केलेली वझरे – उत्तूर मार्गावरील बस सेवा प्रवाशांचा प्रतिसाद असतानाही बंद केल्याबद्दल वगैरे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बस फेऱ्या बंद केल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार व नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांना खाजगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. याबाबत आजरा आगाराशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे तातडीने सदर बसलेल्या सुरू कराव्यात अशी मागणी अमर पाटील व वझरे ग्रामस्थांनी थेट परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

माकप अधिवेशन निमित्ताने, परिवर्तन पदयात्रे साठी सज्ज व्हा…काँ. अतुल दिघे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय कम्यूनिष्ट पक्ष( मार्क्सवादी लेनिनवादी ) या पक्षाचे कोल्हापूर येथे डिसेंबर दिनांक २० व २१ रोजी अधिवेशन होत असून या अधिवेशन निमित्ताने शनिवारी २० रोजी दसरा मैदानातून परीवर्तन पद यात्रामधून शासनाला गिरणी कामगार व पेन्शर्नाची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन आजरा येथील किसान भवन मध्ये झालेल्या गिरणी कामगार सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँ. अतुल दिघे यांनी केले.
प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले. दिघे यांनी बोलताना गिरणी कामगारांचे योगदान या राज्यात मोठे असून मुबंई महाराष्ट्र मिळवण्यासाठी अधिकसंख्येने गिरणी कामगार हुतात्मे झाले. गिरणी कामगारांना मुबंईत गिरणीच्या जागेत घरे मिळाली पाहिजे या चळवळी साठी कोल्हापूर जिल्हाचे मोठे योगदान असून या जिल्ह्यात गिरणी कामगाराची मोठी ताकत आहे हे दाखवण्यासाठी येणार्या पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी गिरणी कामगारानी तयारी करावी असे सांगितले.
यावेळी आप्पा कुलकर्णी यांनी पेन्शन वाढीव मिळण्यासाठी कायदेशीर लढाई पूर्ण झाली असून शासन जनतेची दिशाभूल करीत आहे. किमान नऊ हजार पेन्शन दिली पाहिजे, यासाठी कोल्हापूर येथील अधिवेशनात देश पातळीवरील मार्गदर्शक येणार असेलेचे सांगितले. काँ. शांताराम पाटील यांनी निवडणूक जवळ आल्या कि राजकीय नेत्यांना गिरणी कामगारांची आठवण येते प्रत्यक्षात गिरणी कामगाराचे प्रश्न सोडवायला कोण तयार नाहीत. यासाठी मुबंईत घर आणी वाढीव पेन्शन मिळण्यासाठी पदयात्रेत सहभागी होणार असलेचे सांगितले. महादेव होडगे, गोपाळ रेडेकर, संजय घाटगे यानी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नारायण राणे, समाजसेवक नरसू शिंदे, शिवाजी पोवार, लक्ष्मण बामणे, निवृती मिसाळे, नंदा वास्कर, अनिता बागवे, सजाबाई देसाई, जिजाबाई वांजोळे, मनपा बोलके, शांताराम हारेर, याच्यासह गिरणी कामगार व वारस उपस्थित होते. आभार काशिनाथ मोरे यानी मानले.

होनेवाडी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होनेवाडी ता. आजरा येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते करणेत आला. या कामासाठी जयवंत मसनू सुतार यांचे विशेष प्रयत्न आणी आमदार शिवाजीराव पाटील यांचे सहकार्य लाभले.
तसेच सहपालक मंत्री ना. माधुरीताई मिसाळ यांचेकडून निधी प्राप्त झाला. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, सरपंच प्रियांका आजगेकर, उपसरपंच संगीता सुतार, सदस्या रेशमा पाटील, सदस्य तातूअण्णा बटकडली, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, माजी पोलीस उपनिरीक्षक बचाराम चव्हाण, किणे माजी सरपंच सुरेश गिलबिले, तुकाराम बामणे, अशोक आजगेकर, कृष्णा पाटील, तानाजी पाटील, गणपती जाधव, जीवन आजगेकर, अरुण पाटील, अमर पाटील, अजित हरेर, ग्रामसेवक अजित देसाई, गणपती पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांच्याकडून शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी दोन लाखांची देणगी

आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा
गोकुळ दुध संघांचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या वतीने आजरा येथील शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणासाठी दोन लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती आजरा यांच्याकडे डोंगळे यांनी देणगी सुपूर्द केली.
आजरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा एप्रिल महिन्यात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ संचालक अरुण डोंगळे हे होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आजरा शिवतीर्थावरील उर्वरित कामासाठी डोंगळे कुटुंबीयांच्या वतीने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार डोंगळे यांनी शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणासाठी दोन लाख रुपयांची देणगी समितीकडे सुपूर्द केली. यावेळी समिती सचिव संभाजी इंजल, देवस्थान समिती अध्यक्ष आनंदा कुंभार, अभिजीत संकपाळ, गोकुळ दूध संघाचे अधिकारी दत्तात्रेय वाघरे, विकास सुतार उपस्थित होते..

उचंगी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी तात्काळ बैठक बोलवा
जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे प्रकल्पग्रस्तांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत उचंगी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी तात्काळ बैठक लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आह
सन २०२२ या साली प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्यामुळे उचंगी प्रकल्पामध्ये पाणी तुंबविण्यात आले. या पाण्याच्या आधारावर उचंगी लघु पाटबंधारे क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात सुजलाम् सुफलाम् व हिरवागार शिवार झाला. परंतू अनेक वर्षांपासून प्रशासनासोबत व सरकार सोबत संघर्ष करुनही आजही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. त्याच बरोबर राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर महसूल प्रशासनासोबत सातत्याने बैठका होवूनही प्रश्न सुटलेले नाहीत. दि. ६ मार्च २०२४ रोजी मा. पुनर्वसन मंत्रीसो यांच्या दालनात धोरणत्मक मुद्दांच्यावर चर्चा होवून तसा अहवाल जिल्हास्तरावरुन मा. जिल्हा पूनर्वसन अधिकारी यांनी देणेचे ठरले होते. उदा. निर्वाहधारण क्षेत्र, ६५ टक्के रक्कम या मुद्द्यांच्यावर मंत्रीस्तरावर सविस्तर चर्चा होवून अहवाल सादर करण्याचे ठरले होते. त्याची कांहीही कार्यवाही झालेली नाही. म्हणून प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत धरणाच्या अनुषंगीक सर्व कामे बंद ठेवण्यात यावीत असेही म्हटले आहे.
प्रलंबित कामांमध्ये प्राधान्याने….
निर्वाह क्षेत्रामधील खाते दारांचा फेर सर्व्हे करून अहवाल तयार करणेत यावा, धोक्याच्या पातळीतील घरांचा सर्व्हे करून अहवाल तयार करणेत यावा.
भावेवाडी, चितळे व वाटंगी मध्ये जमिनी मिळालेल्या खातेदारांना घरांसाठी प्लॉट मिळावेत,चितळे मध्ये वाटप झालेल्या जमिनी मध्ये जाणे येणे साठीचा रस्ता दुरुस्त करून मिळावा, धरणग्रस्त शेतक-यांच्या मिळालेल्या जमिनींचे सपाटी करून मिळावे.
प्रकल्पग्रस्तांना सिरसंगी, किणे, कोळींद्रे, हंदेवाडी, बोलकेवाडी, चितळे, भावेवाडी, जेऊर व चित्रीच्या लाभाक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनींचे नकाशे मिळावेत, प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या सर्व जमिनी भोगवटादार वर्ग-१ करुन मिळाव्यात या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
याबाबत लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर सुरेश पाटील,दशरथ घुरे, प्रकाश भडांगे,धनाजी दळवी,मारुती चव्हाण,
पांडुरंग धनुकटेकर यांच्या सह्या आहेत.
छाया वृत्त…



