mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


मालवाहतूक गाडी उलटली …

दोघे जखमी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा-पेरणोली मार्गावर मालवाहतूक गाडी (MH 09/GJ 1203) बाजू पट्ट्यांवरून घसरून पलटी झाली. यामध्ये संजय शिवाजी बोटे व धनंजय शिवाजी बोटे रा. खानापूर ता. आजरा हे दोघेजण जखमी झाले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

     गारगोटी/ कडगाव येथून सदर मालवाहतूक करणारी गाडी पेरणोली मार्गे आज-याच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनधारकाला बाजू देताना बाजू पट्ट्यावरून गाडी घसरली व पलटी झाली. एकूल ओपा येथे सदर प्रकार घडला.काल सोमवारी रात्री नऊ वाजता घडलेल्या या प्रकारामध्ये गाडीचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

             बाजू पट्ट्या भरणे गरजेचे…

      या मार्गावरील बाजू पट्ट्या ही वाहनधारकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. पावसामध्ये अनेक छोटे-मोठे अपघात या बाजू पट्ट्या भरल्या नसल्याने झाले आहेत. कालच्या अपघातात सुदैवाने बोटे बंधू बचावले असले तरीही भविष्यात येथे केवळ बाजू पट्ट्यांच्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बाजू पट्ट्या तातडीने भरून घ्याव्यात अशी मागणी होत आहे.

गणेशोत्सवात विधायक उपक्रमांना प्राधान्य द्या : नागेश यमगर

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गणेश उत्सव मांगल्यपूर्ण उत्सव म्हणून ओळखला जातो. या उत्सवामध्ये डॉल्बी सारखे प्रकार टाळून पारंपारिक वाद्यांचा वापर करत त्याला विधायक कार्यक्रमांची जोड देऊन शांततेने साजरा करावा असे आवाहन आज-याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले. आजरा तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस पाटील यांची बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात पोलीस उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज रामदास इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी यमगर बोलत होते.

    यमगर पुढे म्हणाले, सर्वांना या उत्सवाचा आनंद लुटता यावा. उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घ्यावी.

     पोलीस उपविभागीय अधिकारी इंगवले म्हणाले, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्यात यासाठी स्थानिक पोलीस निश्चितच मदत करतील. तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात असून त्यामध्ये वाढ करण्यासाठी मंडळाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

     बैठकीस निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते पोलीस पाटील उपस्थित होते.


आजरा येथील रवळनाथ मंदिराचे उद्या भूमिपूजन व पायाभरणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ देव व परिसरातील श्री भावेश्वरी, श्री महादेव,श्री पालवेर, श्री नरसोबा, श्री म्हसोबा या देवतांच्या मंदिराचा भूमिपूजन व पायाभरणी आणि शिलान्यास समारंभ उद्या बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती श्री रवळनाथ देवालय उपसमितीच्या वतीने देण्यात आली आहे.

     जगद्रूगुरू शिवलिंगेश्वर महास्वामी, सिद्ध संस्थान मठ, निडसोशी यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे.

     सकाळी आठ वाजल्यापासून पद्मनाभ शास्त्री पुराणिक यांच्या पौराहीत्याखाली धार्मिक विधी सुरू होणार आहेत. सकाळी नऊ वाजता लिंगायत गल्ली येथील लिंगायत मठाच्या विहिरीपासून श्री रवळनाथ मंदिरापर्यंत कलश मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रिक्षा मित्र मंडळाकडून खिचडी वाटप


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने श्रावण सोमवार निमित्त खिचड़ी वाटप कार्यक्रम पार पडला.

     कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटन आजऱा बस स्थानक नियंत्रक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

     सदर उपक्रमाचा लाभ अनेक प्रवाशांनी घेतला. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रवी तेंडुलकर, उपाध्यक्ष समीर चौगुले, सदस्य पुंडलिक कोले , सागर चंदगडकर, राजेंद्र चंदनवाले, इरफान शेख, अजित नाईक, जावेद दरवाजकर, उत्तम कसलकर, इरफान मुल्ला, उत्तम जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आधार व बँकखाती लिंक करा…
‘अन्याय निवारण’ ची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आजरा तालुक्यातील बहुतांशी महिलांची बचत खाती असून यापैकी अनेक खाती ही आधार कार्डला लिंक  नाहीत. यामुळे शासकीय योजनांचा लाभ उठवताना सदर महिलांना त्रास होत आहे. अनेक महिलांनी ई केवायसी जमा करूनही अद्याप खाती लिंक झालेली नाहीत. बँकेने सदर महिलांची खाती त्वरित लिंक करून घ्यावीत अशा आशयाचे निवेदन बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

     यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर, संतोष ढोणुक्षे, जोतिबा आजगेकर, वाय. बी. चव्हाण, दयानंद भोपळे, दिनकर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

विजेचा धक्का बसून आज-यात एकाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गवसेजवळ १० कोटी ७४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त

mrityunjay mahanews

पंचायत समिती अधिकाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू

mrityunjay mahanews

प्रा.सुनिल शिंत्रे…एक दिलदार व्यक्तिमत्व

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!