mrityunjaymahanews
अन्य

प्रा.सुनिल शिंत्रे…एक दिलदार व्यक्तिमत्व

प्रा.सुनिल शिंत्रे…एक दिलदार व्यक्तिमत्व


आजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व कै. केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक सुनील शिंत्रे यांचा आज बुधवारी 51 वा वाढदिवस साजरा होत आहे…

प्रचंड मित्रपरिवार व संयमी अशी ओळख असलेल्या प्रा. सुनील शिंत्रे यांनी शिक्षण, संस्कृती, राजकारण व सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

प्रा. शिंत्रे यांचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील पदवीही संपादन केली. गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे त्यांनी काही काळ व्याख्याता म्हणून काम केले. सामाजिक पिंड असणाऱ्या शिंत्रे यांनी कै. केदारी रेडेकर यांच्या निधनानंतर संस्थात्मक कामांमध्ये विशेष सहभाग घेत कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालय उभारणीत श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या साथीने विशेष प्रयत्न केले.गडाहिंग्लज उपविभागामध्ये विविध संस्था उभारण्याचे काम केले.
शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असणाऱ्या शिंत्रे यांनी चंदगड- आजरा- गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातून विधान सभेकरता उमेदवारीही घेतली. आजरा साखर कारखान्यांमध्ये संचालक म्हणून जाण्याचा त्यांचा त्यांना योग आला. त्यांनी सलग दहा वर्षे आजरा साखर कारखान्याचे संचालक पद भूषविले सदर. त्याचबरोबर त्यांना कारखान्याच्या अध्यक्षपदाचीही संधी मिळाली. कारखान्यांमध्ये विविध उपक्रम राबवून बंद अवस्थेत असणारा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे राहिले सदर. गडहिंग्लज येथे पाणी परिषद घेऊन उपविभागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

एक दिलदार व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या प्रा. शिंत्रे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

                    ज्योतीप्रसाद सावंत
                      (मुख्य संपादक)

आजरा नगरपंचायत वर्धापन दिन उत्साहात

आजरा नगरपंचायतीमध्ये पाचवा वर्धापनदिन   मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी तसेच सर्व नगरसेवकांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

नगरपंचायतीच्या पाचव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नगरपंचायत इमारतीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. स्वागत करून प्रास्ताविकात मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी नगरपंचायतीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. भविष्यातील विकास कामांच्या नियोजनाचा आढावा घेतला.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी म्हणाले, आजरा नगरपंचायत स्थापनेसाठी खासदार संजय मंडलिक, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर या सर्व मंडळींचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. भविष्यात आजरा शहरवासीयांना शहराचा कायापालट झाल्याचे निश्चित दिसून येईल असा विश्वास चराटी यांनी व्यक्त केला. नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी विरोधक असा प्रकार राहीलेला नाही. शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करीत आहोत. राज्यातील सध्याचे सरकार पुढील २५ वर्षे हलणार नाही. त्यामुळे नगरपंचायतीला निश्चितपणे चांगले दिवस येतील असेही चराटी यांनी सांगितले.

नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले, सर्व नागरीकांच्या सहकार्यातून नगरपंचायतीची सुखकर वाटचाल सुरू आहे. नवी पाणी पुरवठा योजना, सोलर योजना यासारखे महत्वाकांक्षी योजना लवकरच मार्गी लागणार आहेत. सध्या कार्यरत असलेल्या मंडळींनी केलेल्या कामाला पुढील १० वर्षात निश्चित यश दिसेल असा विश्वास शिंपी यांनी व्यक्त केला.

नगरसेविका शुभदा जोशी म्हणाल्या, गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून काम करीत असताना केवळ गैरसमजातून काही अधिकाऱ्यांना कमी लेखले गेले. परंतू तेच अधिकारी पुढे मोठ्या नगरपंचायतीमध्ये उत्कृष्ठ अधिकारी म्हणून नावारूपास आले. नगरपंचायत नवी असल्याने विकास कामांच्या प्राधान्यक्रम नियोजन यामध्ये ताळमेळ राहू शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत असताना सुकाणू समितीचा अंकुश पदाधिकाऱ्यांवर राहत होता. नगरपंचायतीमध्येही ही पद्धत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणूकीत नगरपंचायतमध्ये आरक्षण परिस्थिती काय राहील याची आपल्याला कल्पना नाही. परंतू नगराध्यक्षांच्या स्पर्धेत आपण निश्चितच आहोत असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक विलास नाईक, आनंदा कुंभार यांच्यासह मराठा महासंघाचे संभाजी इंजल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक संभाजी पाटील, सिकंदर दरवाजकर, अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, नगरसेविका अस्मिता जाधव, सुमैय्या खेडेकर, यसीराबी लमतुरे यास्मीन बुड्ढेखान, रेश्मा सोनेखान, शकुंतला सलामवाडे तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारूती मोरे, बापू टोपले, प्रकाश देसाई, शंकरराव शिंदे तसेच नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संजय यादव यांनी आभार मानले.

अब्दुल सत्तारांना ताकीद,

सदा सरवणकरांमुळे अडचण; शिंदे गटातील कारभारावर फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा

मुंबई : आपल्या गटातल्या आमदारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावले आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले. यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. सदा सरवणकर प्रकरणामुळेही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.

आपल्याच मंत्र्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज

30 जूनला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. तेव्हापासून हे सरकार नको त्या घटनांमुळेच चर्चेत आहे. कृषी मंत्र्यांनी तर कहरच केला. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे, ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच सत्तारांनी माध्यमांकडे फोडली

सदा सरवणकर यांच्या गोळीबाराच्या प्रकरणामुळे तर शिंदे फडणवीसांची मोठी अडचण झाली आहे. आपनं गोळीबार केलाच नाही असा दावा करणाऱ्या सरवणकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. सरवणकरांच्या नगरसेवक मुलाचाही व्हिडिओ व्हायरल झाला. गोळीबार झाला त्या ठिकाणी पोलिसांना फायर झालेल्या बंदुकीच्या गोळीचा भाग मिळाला. त्यामुळे सरवणकरांचे पिस्तुल जप्त करून पोलिसांनी फॅरेन्सिकसाठी पाठवले आहे

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना सोडून 40 आमदार आले. 10 अपक्षांनी शिंदेना पाठिंबा दिला. आलेले सगळे आमदार सेनेतून पुन्हा सेनेतच आलेत असा दावा करत असले तरी उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फरक आहे. शिंदे कार्यकर्त्यांचे नेते आहेत. शिंदेंकडे आलेल्या प्रत्येकाला सत्तेत वाटा हवा आहे. अशा आमदारांवर नियंत्रण ठेवताना शिंदेंना मोठी कसरत करावी लागत आहेत. हे सरकार चालवण्यात भाजपाचाही कस लागणार आहे. नवं सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदारांच्या रोज काही ना काही तक्रारी कानावर येत आहेत. या सगळ्या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमाही मलीन होते. येणाऱ्या काही महिन्यात मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. एक प्रकारे महाराष्ट्रात मिनी विधानसभेचा आखाडा रंगेल. अशा पार्श्वभूमीवर सरकारची प्रतिमा मलीन होणे यांना परवडणार नाही.

(Source :  chat.whatsapp.com)

सहा महिन्यांत शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त,

नेमकं काय आहे कारण?

नाशिक – शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांत दोनवेळा विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्याने शिर्डी साई बाबा संस्थान मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तसंच, येत्या दोन महिन्यांत नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे अशी सूचनाही औरंगाबाद खंडपीठाने केल्या आहेत.

सहा महिन्यापूर्वीच शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मात्र, संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. नियमबाह्य मंडळ स्थापन केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. त्यामुळे हे मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून खंडपीठात सुनावणी सुरू होती. अखेर, याबाबत आज निर्णज जाहीर झाला असून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

दोन महिन्यांत विश्वस्त मंडळ नेमा…
औरंगाबाद खंडपीठाने मंडळ बरखास्तीचे आदेश देताच पुढच्या दोन महिन्यांत नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्यभरातून या विश्वस्त मंडळात सभासद नेमण्यात येतात. या विश्वस्त मंडळात एकूण १६ लोकांची निवड करण्यात येते. त्यामुळे आता पुढच्या निवडीसाठी साईबाबा संस्थानसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

साईबाबा मंदिराभोवती वादाचा फेरा

कोरोना काळात सुरक्षेच्या कारणास्तव साई बाबा मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता कोरोना संसर्ग कमी झालेला असतानाही मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिरात भाविकांना हार फुले घेऊन जाण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक व्यापारांकडून करण्यात येत होती. यासाठी स्थानिक व्यापारांसह समाजसेवकांनी मंदिरात परिसरात मोठे आंदोलन छेडले होते. याप्रकरणी मंदिर प्रशासनाने एका महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(Source :  chat.whatsapp.com)

संबंधित पोस्ट

आजऱ्यात रविवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची माहिती

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एक मराठा… कोटी मराठा…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाचे  प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले.

mrityunjay mahanews
error: Content is protected !!