mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या …

 

बेवारस हुसेनचा अखेर मृत्यू


आजरा तालुक्यातील मुम्मेवाडी येथे २० जुलै रोजी रस्त्याच्या कडेला आजारी अवस्थेत सापडलेल्या बेवारस हुसेन वर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हुसेनची जगण्याची लढाई संपुष्टात आली त्याच बरोबर त्याच्या जगण्याला बळ देऊ पाहणा-या उत्तूर व मुम्मेवाडी परिसरातील कार्यकर्त्यांचे प्रयत्नही अयशस्वी ठरले.

अडीच महिन्यापूर्वी हुसेन नामक ( पूर्ण नाव माहित नाही) एक व्यक्ती स्थानिक नागरिकांना आजारी स्थितीत आढळली. ही बातमी आजूबाजूच्या तरुणांना व समाजभान असणाऱ्या नागरिकांना समजल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी हुसेन याच्यावर औषधोपचार करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.याचाच एक भाग म्हणून त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हुसेन कोण होता…? कुठून आला होता…? त्याचे नातेवाईक कोण…? तो कोणत्या जातीचा…? हे सर्व प्रश्न बाजूला ठेवून उत्तूर व मुम्मेवाडी येथील कार्यकर्त्यांनी त्याला जगवण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होते.

हुसेनच्या मृत्यूची नोंद पोलिसात झाली आहे.


लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज सप्ताहानिमित्त दिंडी सोहळा उत्साहात…


आजरा येथील ह.भ.प.पू. श्री. लक्ष्मण बुवा मोरजकर महाराज यांच्या सप्ताहानिमित्त दिंडीचा कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला.

शिवाजीनगर येथील मोरजकर महाराज यांच्या समाधीस्थळापासून दिंडीस सुरुवात झाली. दिंडीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध गावच्या भजनी मंडळांसह नागरिक मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन विविध उपक्रमांनी व्यंकटराव येथे संपन्न


आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा व आजरा तहसील कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने पार पडला.

या कार्यक्रमासाठी आजरा तहसीलदार समीर माने यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रशालेतील इयत्ता अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. व या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भाषणातून, वक्तृत्व स्पर्धेतून, चित्रकला स्पर्धेतून आपले मत, विचार मांडणे आवश्यक आहे व त्यातूनच समाज प्रबोधन घडणे हे उपक्रमाचे सार आहे असे सांगितले.

यावेळी तहसील कार्यालयातील विकास कोलते, महसूल नायब तहसीलदार आजरा, शिवराज देसाई, तलाठी आजरा व सुरेश कांबळे, महसूल सहाय्यक तसेच व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य आर. जी. कुंभार, प्रा. शिवाजी पारळे, आर. एस. कांबळे , कृष्णा दावणे, उपस्थित होते.


रामतीर्थ परिसरात स्वच्छता मोहीम


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाअंतर्गत आयोजित स्वच्छता अभियान अंतर्गत रामतीर्थ येथील महादेव मंदिर परिसरत आग्रा तालुका भाजपाच्या वतीने एक तास स्वच्छता मोहीम भारतीय जनता पार्टी आजरा चे तालुका अध्यक्ष अनिरुद्ध (बाळ) केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली ,

यावेळी भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  आज शहरात…

ह.भ. प.पू.लक्ष्मण बुवा महाराज मोरजकर यांच्या सप्ताहा निमित्त दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये महाप्रसाद

पाऊस पाणी…

आजरा शहर व परिसरात गेल्या २४ तासात १२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित पोस्ट

तालुका खरेदी विक्री संघाच्या समझोता एक्सप्रेस ला ब्रेक…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!