mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि. १६  डिसेंबर २०२४              

कॅबिनेटचा डबल धमाका :आजऱ्यात आनंदीआनंद…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      राज्याच्या मंत्रिमंडळात परमनंट मंत्री म्हणून ओळख असणाऱ्या नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर या डबल धमाक्याने आजरा तालुक्यामध्ये प्रचंड जल्लोष करण्यात आला. तालुक्याशी जोडलेल्या तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघातील आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली आहे तर वाटंगी जिल्हा परिषद मतदार संघाशी संबंधित चंदगड विधानसभा मतदारसंघाची आमदार शिवाजीराव पाटील यांचे राजकीय वजन सर्वश्रुत आहे . त्यामुळे तालुक्यात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

    नामदार मुश्रीफ व आमदार आबिटकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार अशी खात्री होताच प्रमुख कार्यकर्त्यांनी थेट नागपूर गाठले व शपथविधीचा सोहळा अनुभवला. तर ज्यांना नागपूर गाठणे शक्य नव्हते त्यांनी तालुक्यामध्ये जल्लोष केला.

     आजरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या ठिकाणी आमदार प्रकाश आबिटकर यांचा शपथविधी होत असताना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. साखर पेढ्यांचे व साखरेचे वाटप करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिराजवळ जावून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, विलास नाईक, विजय पाटील, दशरथ अमृते, परशुराम बामणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, विजय थोरवत, बापू टोपले, साळगाव सरपंच धनंजय पाटील, सुनील दिवेकर, संदेश पाटील,साळगाव सरपंच धनंजय पाटील, महेश दळवी, हरपवडे सरपंच सागर पाटील, गोविंद गुरव विभाग प्रमुख अनिल डोंगरे, मराठा महासंघाचे शिवाजी गुडुळकर, दशरथ अमृते, युवा सेनेचे मंदार बिरजे, लहू पाटील जोतीबा पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद घाटगे, दयानंद निऊंगरे अमित खेडेकर, संतोष जाधव, युवराज पाटील, लहू वाकर, गौतम भोसले, संतोष जाधव, असिफ लतीफ, नाथा देसाई, अमानुल्ला आगलावे, उमेश पारपोलकर, प्रकाश हरमळकर, रमेश दळवी, शरीफ खेडेकर, प्रकाश सावंत, समीर मोरजकर,अरुण नाईक अनिकेत चराटी यासह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    उत्तूर मध्येही ना. मुश्रीफ प्रेमी कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

राहत खिदमत फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       येथील राहत खिदमत फाउंडेशन आजरा तर्फे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे, मोतीबिंदू शास्त्रक्रियेचे डॉ. अनिल कुलकर्णी नेत्र रुग्णालय मिरज कुडची यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला.

      सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राहत खिदमत फाउंडेशन मार्फत मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० गरजूंनी याचा लाभ घेतला. यावेळी हाफिज मुबारक (गडहिंग्लज ) म्हणाले, डोळे हे शरीराचे अतिशय नाजूक अवयव आहे. धावपळीच्या आणि डिजिटलच्या युगात डोळ्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. मोबाईल तसेच संगणकाच्या अतिवापरामुळे तसेच पन्नाशी ओलांडलेल्याना डोळ्याचे विकार होत आहेत. त्यासाठी त्यांच्या डोळ्यांची तपासणी होणे गरजेचे आहे म्हणून या मोफत नेत्र तपासणीच्या शिबिराचे आयोजन केले आहे

      हे शिबीर यशस्वी करण्यास डॉ. तनवीर बागसिराज (कुडची, ऍप्टोमेट्रिकल एन डी ), डॉ. सुधीर सावर्डे (मिरज, ऑप्टिकल), डॉ. सईद मुजावर (गोकाक ), डॉ. साद बारगीर, डॉ. नईम मुजावर (कोल्हापूर ), हाफिज मुबारकभाई (गड. थेरपीस्ट एक्युपंचर अँड हिजामा)या टीमने योगदान दिले.
यावेळी अमजद मीरा (अध्यक्ष लकी फाउंडेशन गड.), अशपाक किल्लेदार (गड.), समीर राऊत, इखलास जिनाबडे, जमीर मुल्ला ,अब्दुलवाहिद सोनेखान (ऑ. नायब सुभेदार ), अब्दुलकरीम कांडगवकर, मौजुद माणगावकर, शफिक तकीलदार,बबलू शेख जमील निशानदार, युनूस जंगी, मोहसीन हेरेकर, हाफिज तौफिक काकतिकर, माजीद मुल्ला आदी उपस्थित होते.

आजरा तालूका जेष्ठ नागरीक अध्यक्ष पदी महादेव होडगे यांची निवड

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालूका जेष्ठ नागरिक समन्वय समितीची पुर्नरचना करण्यात आली असून जेष्ठ नागरिक समिती अध्यक्षपदी महादेव होडगे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय जेष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य तुकाराम सावंत होते .

      जिल्हा प्रतिनिधी शशिकांत सावंत यांनी नवनिर्वाचित संचालक व सल्लागार मंडळाचे पुर्नरचना झाल्यावर वाचन केले. यामध्ये आजरा तालूका जेष्ठ नागरिक समिती अध्यक्ष पदी महादेव होडगे, उपाध्यक्षपदी निवृत्ती कांबळे, सचिवपदी कृष्णा सुतार सदस्य ईश्वर गिलबिले शांताराम पाटील शशिकांत कांबळे दिनकर माळवकर व सिंधूताई माळवकर यांची निवड करणेत आली. तर सल्लागार मंडळामध्ये सदाशिव वांजोळे, आनंदराव कुंभार, लहू पाटील, लक्ष्मण गुरव दत्ता पाटील, शंकरराव सांबरेकर, प्रा.सुरेश बुगडे, काॅ.संजय घाटगे, डाॅ. शंकर पारपोलकर, प्रकाश कोडूसकर,श्री खराडे व उर्मिला बनसोडे यांची निवड करणेत आली यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी तसेच दत्तगुरू जेष्ठ नागरिक संघ होनेवाडी यांना राज्य संघटनेचा सन्मान प्राप्त झाले बदल सत्कार करणेत आला.

      यावेळी तुकाराम सावंत यांनी जेष्ठ नागरीक चळवळीच्या कामकाजाची व उपक्रमांची माहिती दिली. आजरा तालुक्यातील सर्व गावात जेष्ठ नागरिक समिती स्थापन करण्याचे आव्हान केले. यावेळी शांताराम हारेर, लक्ष्मण पाटील, शामराव कवीटकर, शरद उंडगे, दौलती राणे, हिंदूराव कांबळे, मिसाळे याच्या सह जेष्ठ नागरिक व हितचिंतक उपस्थित होते.

     आभार सचिव कृष्णा सुतार यांनी मानले.

विनाकारण मारामारी… एक जखमी तिघांविरोधात गुन्हा नोंद

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथे राईस मिल च्या पाठीमागे झालेल्या मारामारीमध्ये अजय अशोक कसलकर (वय २३, रा. मसोली, ता. आजरा) याला कटरने मारहाण केल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसांनी साईल देसाई, प्रशांत कांबळे (रा.आजरा) यांच्यासह एका अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मारामारीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा पुरस्कार रोझरी स्कूलला जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा जिल्हास्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला आहे.
रोझरी इंग्लिश स्कूलने शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता, आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे इतर शाळांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. शाळेचे मुख्याध्यापक मनवेल सालू बारदेस्कर, प्राचार्य फादर अँथोनी डिसूजा व मॅनेजर फादर मेल्विन पायास , मुख्यमंत्री माझी शाळा समिती सदस्य पर्यवेक्षक विजय केसरकर, शैलजा कांबळे, लक्ष्मी पाटील, स्टीफन डिसोजा , आशिष फर्नांडिस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, तसेच पालक समिती मंडळ, तालुका विस्तार अधिकारी संजय ढमाळ , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बसवराज गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रमणी , विलास पाटील, मायकल फर्नांडिस व आनंदराव भादवणकर यांचे एकत्रित प्रयत्न यामागे प्रेरणादायी ठरले आहेत.शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आज इंडिया- महाविकास आघाडीचा मोर्चा

     इंडिया महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधात आज सोमवारी सकाळी ११ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अशोकअण्णा वाढदिवस विशेष…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शक्ती पीठ महामार्ग सर्वेला शेतकऱ्यांचा विरोध

mrityunjay mahanews
error: Content is protected !!