mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मंगळवार   दि. ३०  डिसेंबर २०२५

नगरपंचायतीत पाणी प्रश्नावर चर्चा…
 अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन…


आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहर व कॉलनीतील नागरी समस्यांवर मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व समर्थ कॉलनीतील रहिवासी यांच्या वतीने आज समर्थ कॉलनीतील व आजरा शहरातील विविध नागरी समस्यांबाबत मुख्याधिकारी सूरज सुर्वे नगरपंचायत आजरा यांचे दालनात सविस्तर चर्चा झाली.  यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी विविध प्रश्नाबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले

या बैठकीत समर्थ कॉलनीतील विजय पाटील यांच्या घराशेजारील वापरात नसलेला व्हॉल्व्ह काढून टाकण्याबाबत सूचना करण्यात आली असून ती तात्काळ मान्य करण्यात आली. समर्थ कॉलनीतील तांबे यांच्या घराशेजारील गटर पाईपमुळे निर्माण झालेल्या उंचवट्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगण्यात आले. रवळनाथ कॉलनीतील नागरिकांना पाणी योग्य दाबाने मिळते की नाही याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार असून, आयडीयल कॉलनीतील बंद पडलेले विद्युत बल्ब बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.शहरातील काही भागात कचरा गाडी नियमित येत नसल्याची तक्रार करण्यात आली  शिवाजीनगर शासकीय गोदामाचे पुर्वे कडील भाग रवळनाथ कॉलनी मधील पारपोलकर गल्ली कांही तांत्रिक अडचणीमुळे येत नव्हती यापुढे वेळेवर सेवा दिली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. आवंडी वसाहतीमध्ये अमोल कोले यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत या बाबत पाणीपुरवठ्याची तात्काळ पाहणी करून योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.

सध्या शहरात एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा दररोज सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली. शहरातील नवीन पाणी पुरवठा चाचणीमुळे तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष नगरसेवक श्री. परशुराम बामणे , सचिव पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, रामचंद्र पंडीत यांच्यासह समर्थ कॉलनीतील विजय मोहीते, बाळकृष्ण दरी, तुकाराम पवार, विनायक उफळकर, संजय सावंत, सुभाष कांबळे, अभिजीत मनगुतकर, आनंदराव पाटील, श्रीपती पाटील अमोल कोले इत्यादी नागरिक उपस्थित होते.

चंदगड- हलकर्णी रस्त्याबाबत तक्रारी:
बैठक बोलावण्याची शिंदे सेनेची मागणी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या चंदगड ते हलकर्णी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून यामध्ये स्थानिक नागरिक व ग्रामपंचायत यांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठेकेदार उदासीन भूमिका घेत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने संबंधित ठेकेदार कंपनी लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी शिंदे सेनेच्या वतीने तहसीलदार आजरा यांच्याकडे करण्यात आली आहे.

या कामाबद्दल एकंदर वाहन चालक, संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व आजूबाजूची शेतकरी यांच्यामध्ये असंतोष आहे. वारंवार तक्रार करूनही तक्रारींचे निवारण होत नसल्याने तातडीने बैठक घ्यावी अन्यथा पुढील काम करू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून निवेदनावर उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, आदींच्या सह्या आहेत.

निवेदन देतेवेळी इंद्रजीत देसाई,रणजीत कुमार सरदेसाई, दयानंद नेऊंगरे, संतोष भाटले, शशिकांत आप्पा सावंत, अनिल डोंगरे, महेश कामत, विनोद कांबळे, संजय डोंगरे, अक्षय कांबळे उपस्थित होते.

जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या नवनियुक्त संचालकांचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनता सहकारी गुहतारण संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले.

मार्च २०२५ अखेर १०० कोटी आणि आजपर्यंत १११ कोटीहून अधिक ठेवी संकलन करून जनता सहकारी गृहतारण संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. हा विश्वास वृद्धिंगत करणे आणि सातत्य राखणे ही संस्थेची जबाबदारी आहे. येथून पुढील काळात येणाऱ्या नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सदैव तयार असले पाहिजे. त्यासाठी नवनवीन उपाययोजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे यांनी केले.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष  डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले. दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शिबीरात गडहिंग्लज शाखा चेअरमन श्री. प्रकाश पोवार, कोल्हापूर शाखा चेअरनमन  डॉ. गोपाळ गावडे, गारगोटी शाखा चेअरमन प्रा.  आनंद चव्हाण, इचलकंरजी शाखा चेअरमन श्री. प्रकाश शिंदे, सांगली शाखा चेअरमन डॉ. संजयकुमार गायकवाड, पाटणे फाटा शाखा चेअरमन  डॉ.अशोक दोरुगडे यांनी शाखा आढावा घेत. २०३० सालापर्यंतचे शाखांचे नियोजनाबद्दल सविस्तर चर्चा करुन काही विधायक सूचना केल्या.

पुढील पाच वर्षांमध्ये संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या व सुरू केल्या जाणाऱ्या नवनवीन गृह कर्ज योजना आणि त्या योजना बददल साकल्याने विचार करण्यात आला व चिंतन शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य, डॉ. एस. बी. भांबर, राजा शिवछत्रपती महाविद्यालय महागाव च्या प्रभारी प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुगंधा घरपणकर, सहकार भारतीच्या भुदरगड तालुकाध्यक्ष पदी निवडीबद्दल गारगोटी शाखेचे चेअरमन प्रा. आनंद चव्हाण आणि आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. अशोकअण्णा चराटी व नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल श्री. अनिकेत चराटी यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशिक्षण शिबीराचे सुत्रसंचालन प्रा. सौ. नेहा पेडणेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संचालक प्रा. आनंद चव्हाण यांनी मानले.

आजरा तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश शिंदे

 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी आकाश शिंदे, उपाध्यक्ष पदी गौतम भोसले व निलेश साळोखे, सचिव पदी प्रकाश यादव तर खजिनदार पदी रामा पाचवडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी नूतन अध्यक्ष आकाश शिंदे म्हणाले,
संपूर्ण नाभिक समाजाला संघटित करून खेड्‌यापाड्‌यामध्ये जे नाभिक समाजाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. समाजाची जी पत संस्था आहे ती संस्था सक्षम करून त्याच्या माध्यमातून समाजाची आर्थिक गरज पूर्ण करणार.

यावेळी बाळासाहेब पाचवडेकर, दत्ता पोवार, कृष्णा यादव, रामचंद्र शिंदे, आनंदा इंगळे, प्रकाश पाचवडेकर, निखिल पाचवडेकर, राजू माने, देव पाचवडेकर, हृषीकेश भोसले, निखिल काशीद आदिजण उपस्थित होते.

निधन वार्ता
गणपती पाटील

चाफे गल्ली, आजरा येथील गणपती नारायण पाटील ( वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने काल मुंबई येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,,दोन मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे.

बुधवार दिनांक ३१ रोजी सकाळी आठ वाजता रक्षा विसर्जन आहे.

हार-तुरे नको, पुस्तके द्या!
वृषाल हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुस्तक मित्र’ चळवळीचा जागर

​सध्याच्या झगमगाटाच्या युगात वाढदिवस म्हटले की डामडौल, फटाके आणि अवाढव्य खर्च हे समीकरण ठरलेले असते. मात्र, सामाजिक जाणिवेतून एक युवक या सर्व प्रथांना फाटा देत ‘वाचन संस्कृती’ रुजवण्यासाठी धडपडत आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्व वृषाल अण्णा हुक्केरी यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी ‘पुस्तक मित्र दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला असून, या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

*​३६५ दिवस, ३६५ उपक्रम*
​वृषाल हुक्केरी हे केवळ नावापुरते सामाजिक कार्यकर्ते नसून, वर्षातील ३६५ दिवस नवनवीन संकल्पना राबवणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. निसर्गावर प्रेम करणारा हा तरुण कोणत्याही सत्कार समारंभात किंवा कोणाच्याही वाढदिवसाला फुलांचा हार देण्याऐवजी शुभेच्छांचे प्रतीक म्हणून ‘पुस्तक’ भेट देतो. हीच त्यांची ओळख आता एका मोठ्या चळवळीत रूपांतरित झाली आहे.

काय आहे ‘पुस्तक मित्र’ उपक्रम?

वृषाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्रपरिवाराने एक आगळीवेगळी चळवळ उभी केली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांनी हार, बुके किंवा महागड्या भेटवस्तू न आणता केवळ ‘पुस्तके’ भेट द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

*​या उपक्रमाची काही प्रमुख वैशिष्ट्ये*

*​वाचन प्रेरणा* – जमा झालेली सर्व पुस्तके वयोगटानुसार विभागली जातात.

*​शाळांना मदत* – ही पुस्तके ग्रामीण भागातील शाळांना आणि गरजू विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून भेट दिली जातात.

*​प्रदूषणमुक्त वाढदिवस* – फटाके न वाजवता, त्या पैशातून पुस्तके खरेदी करून शैक्षणिक कार्याला हातभार लावला जातो.

“पुस्तके ही माणसाची सर्वात चांगली मित्र असतात. हार-तुरे काही तासांत कोमेजून जातात, पण पुस्तक आयुष्यभर विचारांची शिदोरी देते. ही चळवळ केवळ माझ्या वाढदिवसापुरती मर्यादित न राहता, प्रत्येक घरात वाचन संस्कृती पोहोचावी हाच आमचा उद्देश आहे.”
— वृषालअण्णा हुक्केरी

​वृषाल हुक्केरी यांच्या या विधायक पावलामुळे समाजातील इतर युवकांनाही प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या या ‘पुस्तक मित्र’ चळवळीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून,वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात पुस्तके जमा होत आहेत.

एरंडोळ येथील साक्षीचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील अक्षरा काॅम्प्युटर्स ची विद्यार्थीनी कु. साक्षी संतोष धनवडे (रा. एरंडोळ) हीला पुण्यातील नामांकित कंपनीत वार्षिक घसघशीत पॅकेज मिळाले आहे.ती ज्युनियर अकाउंटन्ट या पदावर रूजू झाली आहे.तीने या संस्थेतून स्मार्ट अकाउंटन्ट हा कोर्स पुर्ण केला होता ज्यामध्ये इंग्लिश स्पिकींग, अकौटींग, टॅली प्राईम, ॲडव्हांस्ड एक्सेल आणि इंग्लिश टायपींग शिकवले गेले.

या विद्यार्थिनीला श्री आनंदा गणपत ढोणुक्षे प्रशिक्षण देण्यासोबतच मुलाखतीची व्यवस्था (Placement) करून दिली होती.

तसेच गेल्या तीन वर्षांत या प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन जाॅब वर लागणाऱ्या तरूण पिढीचा एकुण आकडा पण १०० च्या वर गेला आहे.ज्यामध्ये ५२ अकौंटंट आहेत तर इतर बॅक ऑफीससर किंवा इतर पदांवर कार्यरत आहेत.

विशेष सूचना…

मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु  संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.

यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. 

…मुख्य संपादक

आजरा साखर कारखान्यावर ऊस जातींचे संकरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या आंबोली येथील ऊस संशोधन केंद्रावर ज्या ऊस जातींना तुरा येत नाही. अशा जातींची लागवड करून त्यांना तुरा आले नंतर पुढील वर्षी त्यामधील नर-मादी ओळखून त्याचे संकरण करून त्यापासून एक उन्नत जातीचे ऊस बेणे तयार करून त्याचा या भागातील शेतकरी यांना उपयोग व्हावा यासाठी वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे कार्यस्थळावर प्रायोगिक तत्त्वावर बेणे प्लाॅट तयार करणेत आला आहे.

नुकतेच या प्लाॅट मध्ये वेगवेगळ्या ९० जातींच्या बेण्यांची लागण करण्यात आलेली आहे. त्याचा शुभारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष श्री.सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे यज्ञ डॉ कपील सुषीर व डॉ जे.एम. रेपाळे तसेच कारखान्याचे संचालक श्री मधुकर देसाई, श्री अनिल फडके, श्री शिवाजी नांदवडेकर, श्री रणजित देसाई, श्री राजेन्द्र मुरकुटे, श्री दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक श्री संभाजी सावंत, मुख्य शेती अधिकारी श्री विक्रमसिंह देसाई, अजित देसाई, संदिप कांबळे उपस्थित होते.

मनसेच्या तालुका उपाध्यक्षपदी विलास शिंदे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील श्री विलास शिवणगेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा च्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सदर निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष श्री. नागेश चौगुले यांच्या हस्ते देण्यात आले. तालुका अध्यक्ष श्री. आनंदा घंटे,तालुका उपाध्यक्ष ॲड. श्री. सुशांत पोवार,श्री.यश सुतार, श्री. प्रभात साबळे यावेळी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे छापासत्र: चार बंदुका ताब्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चराटी विरुध्द देसाई… की चराटी विरुध्द ना. मुश्रीफ…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!