mrityunjaymahanews
अन्य

आजरा तालुका खरेदी-विक्री संघात दुरंगी लढत

 

आजरा तालुका खरेदी-विक्री संघात दुरंगी लढत

आजरा तालुका खरेदी विक्री संघाकरीता तडजोडीचे प्रयत्न यशस्वी न झाल्याने आज सत्ताधारी मंडळींसह विरोधी अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांच्या पॅनेलची अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा असतानाच मतदान प्रक्रियेला सामोरे जावे लागणार हे सोमवारी सायंकाळनंतर स्पष्ट झाले होते. यामुळे दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची धडपड सुरू होती.

दरम्यान बिनविरोधचे घोडे चर्चेअभावी अडल्याने आज दोन्ही आघाड्यांनी सक्षम पॅनलद्वारे निवडणुकीला सामोरे जाण्याचा दृष्टीने पॅनेल रचनेस प्राधान्य दिले.

निवडणुकी करता मतदान प्रक्रिया १३ मे रोजी होणार आहे. आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ही निवडणूक ओळखली जात असल्याने दोन्ही बाजूने विजयासाठी जोरदार प्रयत्न होणार हे देखील स्पष्ट आहे. दुरंगी लढतीमुळे निवडणुकीतील चुरस तालुकावासीयांना निश्चितच अनुभवावयास मिळणार आहे.

रवळनाथ शेतकरी विकास आघाडी (सत्तारूढ)

व्यक्ती सभासद गट :-

१.सुधीर देसाई
२.एम के देसाई
३.महादेव हेब्बाळकर ४.मधुकर एल्गार ५.गणपतराव सांगले ६.रवींद्र होडगे

सेवा संस्था गट:-

७.विठ्ठल देसाई
८.दौलती पाटील
९.महादेव पाटील
१०.राजाराम पाटील
११.सुनील देसाई
१२.अल्बर्ट डिसोझा १३.ज्ञानदेव पोवार

इतर संस्था गट:-

१४.उदय पवार

महिला राखीव गट:-

१५.सौ.राजलक्ष्मी देसाई
१६.सौ. मायादेवी पाटील

इतर मागासवर्गीय गट:-

१७.संभाजी तांबेकर

भटक्या विमुक्त जाती जमाती गट:-

१८. महेश पाटील

अनुसूचित जाती जमाती गट :-

१९.गणपती कांबळे

रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी

व्यक्ती सभासद गट:-

१.अशोक चराटी २.अभिषेक शिंपी
३.उत्तम देसाई
४.सदानंद व्हनबट्टे ५.बाबुराव फडके ६.मुकुंदराव तानवडे

सेवा संस्था गट:-

७.डॉ. इंद्रजीत देसाई ८.उत्तम रेडेकर
९.मनोहर पाटील
१०.सुरेश सावंत
११.विजय देसाई
१२.आनंदा कुंभार
१३.पांडुरंग केसरकर

इतर संस्था गट:-

१४.विष्णू पाटील

महिला राखीव प्रवर्ग:-

१५.सौ. सुनीता रेडेकर
१६.सौ. मनीषा गुरव

इतर मागास प्रवर्ग:-

१७.अनिरुद्ध केसरकर

भटक्या विमुक्त जाती जमाती गट:-

१८.बयाजी मिसाळ

अनुसूचित जाती गट:-

१९.शामराव कांबळे

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!