mrityunjaymahanews
अन्य

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

 

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण

विविध कार्यक्रमांचे आयोजन

आजरा नगरपंचायंतीच्या स्थापनेस आज मंगळवार दि. 13 सप्टे. रोजी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.त्यानिमित्य नुकतीच पत्रकार बैठक पार पडली…

आजरा नगरपंचायतीच्या माध्यमातून गत पाच वर्षात १४ कोटींची विविध विकास कामे केली .पाणीपुरवठा योजनेसह ४० कोटींची प्रस्तावित कामे आहेत. ही कामे देखील मार्गस्थ लागतील. अशी माहीती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवकांनी दिली.
आजरा नगरपंचायत स्थापन होवून पाच वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा नगरपंचायतीच्या सभागृहात पत्रकार बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या पाच वर्षात शहरात राबविलेल्या विविध विकास कामांचा आढावा नगराध्यक्षा चराटी व नगरसेवकांनी घेतला.

नगरसेवक विलास नाईक यांनी स्वागत केले. त्यांनी नगरपंचायतीसाठी केलेल्या प्रयत्नाची माहीती दिली. ज्येष्ठ नेते (कै) काशिनाथ चराटी यांच्या काळात नगरपंचायतीसाठी प्रयत्न सुरु झाले. १३ सप्टेंबर २०१७ ला याला मूर्त स्वरुप मिळाले. अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख व नेते अशोक चराटी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नगरपंचायत स्थापन झाली. याला तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले. नगरपंचायत झाल्यामुळे शहरातील विकास कामे झपाट्याने मार्गी लागण्यास मदत झाली. यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. ग्रामपंचायतीच्याकाळात निधीमिळण्यास मर्यादा होत्या. नगरपंचायतीमुळे विकासकामांसाठी भरीव प्रमाणात विकास निधी मिळत आहे. नगरसेवक किरण कांबळे म्हणाले, सन १८-१९ ची पूरपरिस्थिती व त्यानंतर आलेला कोरोना यामुळे तीन वर्षात विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही. पण या दोन वर्षात शहरातील रस्ते व गटारीसाठी ९ कोटी रुपये खर्च केले आहेत. साजसाठी खासदार संजय मंडलिक यांच्याकडून १ कोटीचा निधी मिळाला आहे. आमदार सतेज पाटील यांनी रुग्णवाहीका फायर बुलेट व अश्निशन वहानासाठी निधी दिला आहे. त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर व अन्य जिल्हा नियोजन मंडळातून विकासकामांसाठी निधी मिळाला. त्यामुळे 15 कोटीची विकासकामे झाली आहेत. आजरा शहराची पाणी पुरवठा योजनेसाठी 30 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर अन्य विविध विकासकामाठी निधी मिळाला असून प्रस्तावित ४० कोटींची विकास कामे आहेत. स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये आजरा नगरपंचायतीचे नामांकन झाले आहे. माझी वसुंधरामध्ये आजरा नगरपंचायतीचा ८ वा क्रमांक आला आहे. पाच वर्षात जनतेच्या हिताला प्राधान्य देवून काम झाल्याचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी सांगीतले.

विद्यमान नगरसेवक

या वेळी नगरसेवक संभाजी पाटील , सौ. अस्मिता जाधव, यासीराबी लमतुरे,सौ. शकुंतला सलामवाडे, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील,संजय यादव,  आदी उपस्थित होते.

 

🟣🟡कोल्हापुरात डा‌ॅल्बीने कान जाम अन् लेझर शोने 60 जणांच्या थेट डोळ्यावर ‘वार’!             इफेक्टशी जवळून संपर्क आलेल्यांचे धाबे दणाणले

तब्बल 28 तास डाॅल्बीचा अखंड दणदणाट आणि झगमगणारी लेझर लाईट यामध्ये कोल्हापूरमधील गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. ही मिरवणूक पाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्ष आनंदाला मुकलेल्या गणेश मंडळांनी यावेळी चांगलाच कहर केला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये उन्मादही दिसून आला.

आता गणेशोत्सवानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दृष्टीदोष जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकीनंतर डोळ्यांमध्ये जळजळ होणे, कमी दिसणे असे 60 हून अधिक अधिकृत रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भीती कोल्हापुरातील नेत्ररोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

डोळ्यात जळजळणे, भाजल्यासारखे वाटणे यासारखे परिणाम

याबाबत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभिजित तगारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या 10 दिवसांच्या गणपती उत्सवामध्ये तसेच आगमन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डाॅल्बी आणि लेझर शोचा वापर केला गेला. या मिरवणुकीमध्ये नाचगाणे केलेल्यांच्या अनेकांच्या डोळ्यावर लेझर किरणांचा परिणाम होऊन दुष्परिणाम झाले आहेत.

काही लोकांमध्ये डोळ्यात जळजळणे, भाजल्यासारखे वाटणे यासारखे परिणाम दिसून आले आहेत. मात्र, काही लोकांच्या डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी किरण पडल्याने भयंकर मोठा दुष्परिणाम भोगावा लागला आहे. कोल्हापूरमध्ये आता 60 ते 65 रुग्ण आढळून आल्याचे तगारे यांनी सांगितले. मात्र, हा आकडा डाॅक्टरांकडे आलेला असून अजूनही त्रास होत असतानाही डाॅक्टरकडे गेलेले नाहीत, अशाचा आकडा मोठा असू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

उपचार करूनही धोका कायम राहण्याची शक्यता

डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव झाल्यानंतर नजर बंड पडल्याने या रुग्णांना उपचाराची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध उपचार करून घेण्यासाठी जवळपास 5 हजार ते 50 हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. परत उपचार करून त्रास होण्याची शक्यता ही राहतेच. त्यामुळे याचे भविष्यात आणखी काय परिणाम होणार आहेत, हे सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.

या दणक्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर शो समोर केलेला नाच अनेकांच्या अंगाशी आला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरात जशी विसर्जन मिरवणूक रंगली तशीच आगमन मिरवणूकही रंगली होती. या दोन्ही अनेक मंडळांनी डाॅल्बी आणि लेझर शोचा यथेच्छ वापर केला होता. या लेझर शो आणि अत्याधुनिक लाईट इफेक्टमुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याने मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणि आणि इफेक्टशी जवळून संपर्क आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

(source :chat.whatsapp.com)

🟠एका मिनिटात १०० किलो पेढे गायब ; मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच लाडू, पेढ्यांची पळवापळवी 

🔹मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक आणले जात आहेत, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. तशी एक कथित ऑडिओ क्लीपही सध्या व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे पैठण मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटालून लावले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेआधी येथील जनतेची भेट घेतली. याच भेटीगाठीदरम्यान एक अजब प्रकार पाहायला मिळा आहे. मुख्यमंत्र्यांनी पेढातुला नाकारताच तेथे ठेवलेल्या पेढ्यांवर लोक तुटून पडले. लोकांनी ११० किलो लाडू आणि १०० किलो अवघ्या एका मिनिटात गायब केले. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.*

मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात म्हणजेच पैठण येथे शिंदे यांची एक जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी बिडकीन येथे मुख्यमंत्र्यांची पेढेतुला आयोजित करण्यात आली होती. मात्र ही पेढेतुला एकनाथ शिंदे यांनी नाकारली. त्यानंतर पेढेतुलेसाठी आणलेले पेढे पळवण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्वागत समारंभाकडे शिंदे यांनी पाठ फिरवताच जमलेल्या गर्दीने लाडू आणि पेढे पळवले. अवघ्या एका मिनिटात १०० किलो पेढे तसेच ११० किलो लाडू जमलेल्या गर्दीने पळवले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी संदीपान भुमरे यांची पेढेतुला करण्यात आली होते. त्यावेळीही असाच प्रकार पाहायला मिळाला होता.

सभेला गर्दी व्हावी म्हणून पैसे वाटले?

मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून संदीपान भुमरे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सभेला जमण्यासाठी लोकांना पैसे वाटण्यात आले, असा आरोप उद्धव टाकरे गटातील नेत्यांनी केला आहे. तर हा आरोप भुमरे यांनी फेटाळून लावला आहे. ही ऑडिओ क्लीप विरोधकांनीच बनवली असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे.

(source :chat.whatsapp.com)

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी सात जणांना अटक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!