

सावधान…., ‘लंम्पी ‘ चा विळखा घट्ट होतोय

उत्तूरमध्ये दोन गायीना लम्पीची लागण
पावसाने विश्रांती दिल्यानंतर बळीराजा सुगीच्या कामात व्यस्त असतांनाच आजरा तालुक्यात लम्पीचा विळखा घट्ट होत चालला आहे. तालुक्यात आज अखेर एकूण १५ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तर बहिरेवाडी येथील दोन जनावरे लम्पीच्या आजाराने मृत्यूमुखी पडली आहेत. नव्याने उत्तूरमध्ये दोन गायींना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुपालकात चिंतेचे वातावरण आहे.
दीड महीन्यापासून तालुक्यात लम्पी बाधीत जनावरे आढळत आहेत. सुगीच्या कामासाठी बाहेरून आणलेली जनावरे प्राधान्याने लम्पीचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. बहिरेवाडी येथे कागल तालुक्यातील बाळेघोल येथून आणलेल्या लम्पी बाधीत दोन बैलांचा उपचार सुरु असतांनाच मृत्यू झाला.. त्यानंतर पशुधन विभागाने तातडीने लसीकरणाची मोहीम राबविली. परंतु लम्पी बाधीत जनावरांची संख्या वाढत आहे. तालुक्यात आज अखेर ७ हजार ६३८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण करून देखील लम्पी बाधीत जनावरे आढळत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.



आजरा साखर कडून विनाकपात एक रक्कमी रू.3000/- प्रमाणे ऊसदर जाहीर
आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2022-23 करीता आवश्यक मशीनरीची कामे पुर्ण होवून कारखाना गळीतास सज्ज आहे. कारखान्यास आवश्यक बिड भागातील 150 पर्यंत यंत्रणा हजर झाली असुन उर्वरीत यंत्रणा लवकरच हजर होणार आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील वाहतुक यंत्रणेचे करार झालेप्रमाणे सदर स्थानिक यंत्रणा कार्यरत झाली आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील नोंदविलेला संपुर्ण ऊस वेळेत उचल करणेसाठी आवश्यक ते सर्व नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे येणा-या ऊसाचे संपुर्ण बिल विनाकपात एक रक्कमी रू.3000/ प्रति मे.टना प्रमाणे वेळेत कोल्हापूर जिल्हा मध्य. बँकेच्या सहकार्याने aदा करणेचे नियोजन करून 4 लाख 50 हजार मे. टनाचे उदिष्ठ ठेवले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने गळीतास सुरूवात होत असलेने कारखान्याने ठरविलेले 4 लाख 50 हजार उद्दीष्ट पूर्ण करणेकरीता कारखान्याकडे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व उस उत्पादक शेतकरी बंधुनी आपला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे अवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. आनंदा कुलकर्णी, संचालक श्री. अशोक चराटी, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक श्री. मुकुंदराव देसाई, श्री. मधुकर देसाई, श्री. दिगंबर देसाई, श्री. मारूती घोरपडे, संचालिका सौ. सुनिता रेडेकर, श्री. लक्ष्मण गुडुळकर, श्री. दशरथ अमृते, श्री. राजेंद्र सावंत, श्री. अनिल फडके, श्री.मलिककुमार बुरूड, श्री. जनार्दन टोपले, श्री.आनंदा कांबळे, श्री.तानाजी देसाई, श्री. विलास नाईक मा.कार्यकारी संचालक डॉ.टी.ए. भोसले, सेकेटरी श्री. व्यंकटेश ज्योती, मुख्य शेती अधिकारी श्री.समिरकुमार व्हरकट व इतर अधिकारी उपस्थित होते.




