शनिवार दि.३ जानेवारी २०२६


कर्पेवाडीत दोन लाखांच्या काजूची चोरी
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कर्पेवाडी (ता. आजरा) येथील काजू फॅक्टरीमधून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ९६ हजार रुपये किमतीची वीस पोती काजू बिया चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रकाश निवृत्ती इंगळे (रा. उत्तूर, ता. आजरा) यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. मात्र अद्याप कोणताही ठोस धागा हाती लागलेला नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.

सन्मित्र म्हणजे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना आधार देणारी अर्थवाहिनी : मा.आम.राजेश पाटील
आजरा शाखेचे व मालकीच्या इमारतीत स्थलांतर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन्मित्र पत संस्था म्हणजे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना आधार देणारी अर्थवाहिनी
आहे. नेतृत्व करताना सर्वसामान्य सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवण्याचे काम संस्थापक अल्बर्ट डिसोझा यांनी केले आहे. अनेकांनी तालुक्यातील सहकाराला बळ देण्याचे काम केले. जुन्या नेतेमंडळींनी सहकाराच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक समृद्धी आणण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. डिसोझा यांची वाहून घेऊन काम करण्याची वृत्ती संस्था मोठी करण्यास कारणीभूत आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले. वाटंगी येथील सन्मित्र पतसंस्थेच्या आजरा शाखेचे स्वमालकीच्या इमारतीत समारंभ पूर्वक स्थलांतर करण्यात आले यावेळी राजेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी होते.
संस्थेचे नूतन वास्तूत स्थलांतर व आजरा शाखेच्या नूतन संचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
अशोकअण्णा चराटी म्हणाले, पतसंस्था चालवणे सोपे नाही. डिसोझा यांनी चांगल्या भावनेने संस्था आदर्शवत चालू ठेवली आहे. आजरा ही सहकार पंढरी आहे. सर्वजण जिवाभावाचे मित्र म्हणून सहकारात काम करीत आहेत.
कार्यकर्त्यांना सांभाळायची ताकद डिसोझा यांच्यात आहे. आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले
पतसंस्था चालवणे आजकाल सोपे राहिलेले नाही. १४ % डिव्हिडंट देण्याचे काम मित्र पत्र संस्थेने केले केले. सर्वसामान्यांना आर्थिक हातभार लावला आहे.
आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले,संस्था काढणे सोपे आहे पण चालवणे अवघड आहे. संस्था बंद होण्याचे प्रमाण अधिक आहे. संस्था चालवणे धाडसाचे काम आहे. ठेवी मिळतात पण कर्जदार मिळणे अवघड आहे. डिसोझा यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारातील कार्य कौतुकास्पद आहे .गरजू शेतकरी अल्पभूधारक यांना साथ देण्याचे काम त्यांनी केले आहे.
अल्बर्ट डिसोझा म्हणाले, ४६ व्या वर्षात संस्था पदार्पण करत आहे. कोणतेही गालबोट न लावता संस्था चालवली आहे. चांगले कर्जदार मिळणे दुरापास्त होत चालले आहे.
आजरा, नेसरी शाखा व्यवस्थित चालू आहेत. अनेक संस्था बुडाल्या. राज्य, जिल्हा, पतसंस्था एकाच सॉफ्टवेअरवर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मागताक्षणी ठेवी देण्याची क्षमता संस्थेमध्ये असून संस्थेची रखवाली करण्याचे काम आपण प्रामाणिकपणे केले आहे.
यावेळी अभय अडकूरकर, विठ्ठल देसाई,अनिल फडके, राजू होलम,संभाजी पाटील, मधुकर यलगार, भीमराव सुतार, नामदेव नार्वेकर, भीमराव वांद्रे, रेजीना फर्नांडिस,बाळकू गिलबिले,परशराम गिलबिले,मोतीराम बारदेस्कर, जेमी डिसोझा, भोगले, मारुती सावंत, अजित देसाई,एकनाथ सुतार, जनार्दन बामणे, सुरेश देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषदेकरीता पुन्हा डिसोझा झाले तयार...
डिसोझा हे जिल्हा परिषद निवडणुकीकरता पुन्हा एक वेळ तयार झाले आहेत. सर्वानी मनापासून काम केले तर डिसोझा यांना जिल्हा परिषदेत पाठवणे अशक्य नाही असे यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
गौरव देशपांडे यांचा आज वाढदिवस

आजरा नगरपंचायत सभागृहातील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि प्रशासन आले, त्याच काळात करवाढीविरोधात परशराम बामणे यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन झाले आणि अन्याय निवारण समितीची स्थापन झाली. त्यांच समितीचा एक प्रमुख चेहरा म्हणून गौरव चर्चेत येऊ लागला.
ग्रुपच्या माध्यमातून आजरा शहर आणि इतर ठिकाणची कोणतीही तक्रार आली की त्या ठिकाणी जागेवर जाऊन पाहणी करून त्याची माहिती समिती सदस्य आणि अधिकारी यांचा कानावर घालून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, पाण्याची कमतरता असो वा कचऱ्याची समस्या अथवा इतर काहीही चांगली वाईट समाजसेवा असो आपला वेळ पडली तर मेडिकल व्यवसाय बंद करून गौरव ठिकठिकाणी हजर आहेच.
समाजसेवेची आवड आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणे या स्वभावामुळे सर्वांचा पर्यंत प्रामाणिक काम करत पोहोचला आहे.
अशा प्रामाणिक व उज्वल भवितव्य असणाऱ्या परोपकारी समाजसेवक कार्यकर्त्यांला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

कवितेमुळे माणसाच्या जगण्याला अर्थ येतो. प्रा. डॉ.विष्णू सुरासे
आजरा महाविद्यालयात पारितोषिक वितरण उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कविता ही माणसाला जगायला शिकवते. असे प्रतिपादन हास्य कवी प्रा. डॉ. विष्णू सुरासे यांनी केले.
येथील आजरा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषक वितरण समारंभ झाला. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ.सुरासे यांनी हास्य कविता सादर केल्या. संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, आजरा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी प्रमुख उपस्थित होते.
रत्नदीप पोवार यांनी स्वागत केले. प्राचार्य डा. अशोक सादळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्यावतीने राबविलेले वर्षभरातील उपक्रमांची माहीती दिली. प्रा. डॉ. सुरासे म्हणाले, आजरा महाविद्यालयातील विद्यार्थीनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश हे प्रेरणादायी आहे. सुसंस्कारीत व गुणवंत विद्यार्थी घडवण्यामागे शिक्षकांचेही योगदान महत्वाचे आहे. माणसाला विनोदाचे अंग असावे. विनोद ही माणसाला लाभलेली देणगी आहे.
अध्यक्ष चराटी यांनीही मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थी, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात चमकदार कामगीरी केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषक देवून मान्यवरांनी गौरवले.
यावेळी संस्थेचे संचालक के. व्ही. येसणे, विजयकुमार पाटील, सल्लागार विजय बांदेकर, नूरजहाँ सोलापूरे, आय. के. पाटील, अनिकेत चराटी, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. बाबासाहेब मोहीते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. होते.
प्रा. विनायक चव्हाण, प्रा. आप्पासाहेब बुडके यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी आभार मानले.

निधन वार्ता
आकुबाई बुगडे

मलिग्रे येथील आकूबाई लक्ष्मण बुगडे (वय वर्ष १०४ ) यांचे वार्धक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सून, नातवंडे, असा मोठा परीवार आहे.
रक्षा विसर्जन रविवारी सकाळी आहे.
सुरेश कांबळे

धामणे ता.आजरा येथील सुरेश शामराव कांबळे ( वय ६३ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

विशेष सूचना…
मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.
यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.
…मुख्य संपादक

उमंग महोत्सव ‘व्यंकटराव’ येथे उत्साहात संपन्न..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत “उमंग “महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
यादरम्यान महाराष्ट्राची लोकधारा हा अनोखा कार्यक्रम राबविण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.
२९ डिसेंबर रोजी शेलापागोटे व फनी गेम्स याचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थी पालक शिक्षक यादी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ३० डिसेंबर रोजी ध्यानाचे महत्त्व या विषयावर डॉ. गोपाळ ऐरोनी यांनी मार्गदर्शन केले व श्री. जयवंत आवटे यांनी जगणं सुंदर करूया या विषयावर आपल्या विनोदी शैलीतील व्याख्यान झाले.
३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत महाराष्ट्राच्या लोक कलेचे सादरीकरण केले.तीन दिवसाच्या या भरगच्च उमंग महोत्सवात संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष श्री. कृष्णा पटेकर, सचिव श्री. अभिषेक शिंपी, खजिनदार श्री. सुनील पाटील, संचालक श्री सचिन शिंपी ,पांडुरंग जाधव ,सुधीर जाधव, विलास पाटील, सौ. अलका शिंपी ,सौ. प्रियांका शिंपी , प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुभाष शेळके, प्र.प्राचार्य पन्हाळकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री.आर.व्ही. देसाई,संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजरा नगरपंचायत चे नूतन नगरसेवक, माजी शिक्षक, पालक उपस्थित होते.
व्यंकटरावच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला पोलीस स्थापना दिन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुलातील एनसीसी विभाग प्रमुख श्री महेश पाटील व त्यांच्या एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आजरा पोलीस ठाणे येथे जाऊन महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज पाहिले. पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील साहेब यांनी माहिती दिली हवालदार संदिप म्हसवेकर यांनी पूर्ण पोलीस स्टेशनचे कामकाजाबाबत कसे चालते याबाबत प्रत्यक्षात प्रत्येक विभागाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याबाबत पोलीस सहाय्यक निरीक्षक नागेश यमगेकर, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील . एनसीसी ऑफिसर एम .एस. पाटील पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, बेनके मॅडम उपस्थित होत्या.
आज शहरात…
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांच्या वतीने हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना यांचे ‘तंदुरुस्त हृदय : निरोगी जीवन ‘या विषयावर व्याख्यान
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती दालन


