

मधमाशांच्या हल्ल्यात आजऱ्यात 50 वर जखमी ….
रामतीर्थ परिसरात महाप्रसाद प्रसंगी घडली घटना…

हनुमान जयंती निमित्त आजरा येथील रामतीर्थ परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसाद सुरू असतानाच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक महाप्रसाद सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळ असणाऱ्या उपस्थितांवर मधमाशांनी हल्ला चढविला. या मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे पन्नासवर लहान- मोठी भक्त मंडळी जखमी झाली.
अचानक झालेल्या मधमाशांचा या हल्ल्यामुळे महाप्रसादाच्या ठिकाणी गोंधळ उडाला.
या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या दिनेश शेखर कुरुणकर, सुधीर बळीराम कुंभार,अभिषेक टंगसाली, सुवर्णा आनंदा नाईक, स्नेहल समीर नाईक,धनश्री सुनील नाईक,हंसिका सुनील नाईक, वैशाली सुनिल नाईक आदिंवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तर इतरांवर ठिक ठिकाणी उपचार सुरु आहेत.









