mrityunjaymahanews
अन्यभारतराजकीय

आज-याची कन्या झाली आमदार… आजऱ्यात जल्लोष

 

आज -याची कन्या झाली आमदार..

आजरेकरांनी केला जल्लोष

आज-याच्या कन्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला. या निकालानंतर आजरा तालुका वासियांनी जल्लोष केला.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली सकाळी सुरू झालेल्या या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून श्रीमती जाधव यांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत गेले.मतमोजणी पूर्ण होताच सुमारे 19 हजार मतांच्या फरकाने जाधव विजयी झाल्याचे स्पष्ट होताच आजरा तालुकावासीयांनी जल्लोष केला .

आजऱ्यातील टीम सतेजसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीमती जाधव यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून होते.आजरा येथील औषध विक्रेते संतोष मोरे यांच्या भगिनी व कै.डॉ. शंकरराव मोरे यांच्या कन्या जयश्री जाधव यांच्या विजयाचे वृत्त आजरा शहरात पसरताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले होते.

हत्तीचा वेळवट्टी, हाळोली भागात धुमाकूळ

 

गेले दोन दिवस हत्तीने हाळोली, वेळवट्टी भागात धुमाकूळ घालत काजू, केळी, ऊस, मेसकाठ्या इत्यादीचे मोठे नुकसान केले आहे हत्तीच्या या उपद्रवाला शेतकरी वर्ग कंटाळला असून हत्तीचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

भादवण विकास सेवा संस्थेत अखेर शिवसेनेने बाजी मारली…

भादवण विकास सेवा संस्थेत शिवसेनाप्रणीत युवा शेतकरी आघाडीने १३ पैकी ९ जागांवर विजय मिळवत बाजी मारली   तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपप्रणीत शेतकरी आघाडीला ३ जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेनेचे दशरथ डोंगरे व राष्ट्रवादीचे विजय माने यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठया टाकून निर्णय घेण्यात आला. त्यात डोंगरे हे विजयी झाले.

विजयी उमेदवारांत शिवसेनाप्रणीत युवा शेतकरी आघाडीचे मारुती देसाई, रत्नाप्पा कुंभार, दशरथ डोंगरे, दत्तात्रय पाटील, पांडुरंग केसरकर, रत्नाबाई केसरकर, रुक्मिणी पाटील, अशोक
गुरव, संभाजी कांबळे तर सर्वपक्षीय आघाडीच्या डॉ. गोपाळ केसरकर गजानन गाडे, पांडुरंग जोशीलकर यांचा समावेश आहे.

शिवसेना आघाडीचे नेतृत्व सरपंच संजय पाटील, उपसरपंच दयानंद पाटील, मारुती पाटील, शिवाजी कुंभार यांनी, तर सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व डॉ. गोपाळ केसरकर बी. टी. जाधव, तुळशीराम मुळीक, शैलेश मुळीक, माजी सरपंच राजू जोशीलकर यांनी केले.

शिवसेनेचे दशरथ डोंगरे व राष्ट्रवादीचे विजय माने यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठया टाकून निर्णय घेण्यात आला. त्यात डोंगरे हे विजयी झाले.

बोलकेवाडी येथे आज श्रींची पालखी व सासन काठी मिरवणूक

बोलकेवाडी ग्रामस्थ मंडळ बोलकेवाडी व मुंबई संचलित सत्ताविसाव्या श्री जोतिबा यात्रा उत्सवानिमित्त आज शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी श्रींची पालखी व सासन काठी मिरवणुकीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे. आजच सायंकाळी पाच नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 आजरा ग्रामीण रुग्णालयात सोमवारी मोफत आरोग्य मेळावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य दि. १८ एप्रिल २२ रोजी ग्रामीण रुग्णालय आजरा येथे भव्य मोफत आरोग्य मेळावा आयोजित केला आहे. सदर दिवशी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालय श्री संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल, महागाव, तसेच देसाई हॉस्पिटल, गडहिंग्लज येथील तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान, औषधं, उपचार व गरजे नुसार शस्त्र-क्रिया महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच आयुष्यमान भारत कार्ड दिले जाईल, त्या साठी आधार कार्ड आणणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आजरा यांनी सांगितले.

छाया वृत्त :-

गुड फ्रायडे निमित्य आजरा येथे रोजरी चर्च समोर ख्रिश्चन बांधवांनी प्रभू येशू यांच्या जीवनावरील प्रसंगांचे सादरीकरण केले.

संबंधित पोस्ट

Big Breaking….

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुणी म्हणते बाल हनुमान, तर कुणी मारते दगड…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!