गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५




ताराराणी आघाडीचा एकतर्फी विजय निश्चित : अशोकअण्णा चराटी

आजरा नगरपंचायत निवडणुकीमध्ये काही विरोधकांना धड पॅनल तयार करता आले नाही तर काही विरोधकांना एकसारखी चिन्हेही घेता आली नाहीत. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना शहराच्या विकासासाठी आपण काय केले? हे जनतेसमोर ठेवावी लागते आणि ते ठेवण्याइतपत काम आपण निश्चितच केले आहे ,त्यामुळे ताराराणी आघाडीचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन आघाडी प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी केले.
यावेळी चराटी म्हणाले, केंद्र व राज्याच्या सरकारशी संबंधित आपण आहोत. आजरा ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतरण करण्यापासून ते भरघोस निधी आणण्यापर्यंत आपण कुठेही कमी पडलेलो नाही. पालकमंत्री प्रकाश आबीटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीभाऊ पाटील, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आपले निकटचे संबंध असल्याने विकास कामासाठी निधीची कधीच कमतरता पडलेली नाही. तो खेचून आणण्याची धमकही आपल्यात आहे.
नगरपंचायत नवीन असल्यामुळे व मध्यंतरी आलेल्या कोरोना महामारी सारख्या संकटामुळे विकास कामे मार्गी लावल्यावर निश्चितच मर्यादा येत गेल्या. कोरोनातून बाहेर पडेपर्यंत नगरपंचायतीचा कालावधी संपून गेला. कोट्यावधींची कामे मंजूर करून आणली परंतु लांबलेल्या पावसामुळे ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आता ती मार्गी लागत आहेत. शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन काम करणारी आपण मंडळी आहोत.
आम्ही कोणावर टीका करू इच्छित नाही परंतु ज्यांना आघाडीमध्ये काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत तर काहींना चिन्हे देखील एकसारखी मिळाली नाहीत हे कशाचे द्योतक आहे ? विकास ही प्रक्रिया दोन-चार महिन्यांची नसते त्याला कालावधी द्यावा लागतो. कांही मंडळी नको ते आरोप करून आपणाला बदनाम करण्याचे काम करत आहेत परंतु आजऱ्यातील जनता सुज्ञ आहे हे निकालानंतर निश्चितच दिसून येईल.
अण्णाभाऊ संस्था समूह असो किंवा सोबत असणारी सहकारी मंडळी असोत या सर्वांनी यापूर्वी दिलेले शब्द पाळले आहेत. शब्द पाळणारी आम्ही मंडळी आहोत. पुन्हा एक वेळ नगरपंचायतीची सत्ता निश्चितच आपल्या ताब्यात येणार आहे. स्वच्छ शहर, कचरा मुक्त शहर व सुंदर शहर ..असे लवकरच शहरवासियांना अनुभवावयास येणार व त्यासाठी आम्ही बांधील आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







‘ताराराणी’ चा झंझावात…
प्रवाहात अनेक जण सामील

ताराराणी आघाडीची प्रभागवार प्रचार फेऱ्यांनी शहरात रान उठवले असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी व उमेदवार सौ. समीना खेडेकर यांचा प्रचार दौरा प्रचंड उत्साहात पार पडला. नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या दृष्टीने विविध प्रभागात घर-टू-घर संपर्क मोहीमा राबविण्यात येत आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचारफेरीचे आयोजन उत्साहात पार पडले.आमराई गल्ली व मच्छी मार्केट परिसरात घर-टू-घर मतदारांशी संवाद साधण्यात आला.या प्रचारफेरीत ताराराणी आघाडीचे प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय अशोक अण्णा चराटी यांच्यासह प्रभाग तीनच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. समीना वसीम खेडेकर यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रभागातील आमराई गल्ली, मच्छी मार्केट, व आसपासच्या वस्तीमध्ये घेतलेल्या या फेरीला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागरिकांनी पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, रस्ते दुरुस्ती, महिलांसाठी सुविधा, तसेच तरुणांना रोजगाराभिमुख उपक्रम सुरू करण्याच्या मागण्या उमेदवारांसमोर मांडल्या. उमेदवारांनी सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत पारदर्शक, विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले.
प्रचारफेरीत ताराराणी आघाडीच्या पुढील कार्यकर्त्यांसह मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती होती डॉ. दीपक सातोसकर, डॉ . अनिल देशपांडे,विजयकुमार पाटील, विलास नाईक, संजय कुरुणकर, जितेंद्र टोपले, जयवंत सुतार, अमर पाटील, महेश कुरुणकर, विनायक सरदेसाई, संजय चव्हाण, रिजवान खेडेकर, मकसूद लमतुरे, वसीम खेडेकर, नवीज खेडेकर, असीम लमतुरे, रमीज लमतुरे, नईम लमतुरे, सौद गव्हाणे, राहील लमतुरे, फरहान लमतुरे, कासिम तकिलदार, सुलेमान नसर्दी, तौफिक खेडेकर, वदुद तकीलदार, अलीम पठाण, मोईन लमतुरे, मुजफ्फर खेडेकर, फारुख मुल्ला, बशीर मुल्ला, अरमान दड्डीकर, इमाम साब लमतूरे, सलीम मुल्ला, इलियास लमतुरे, इनामूल खेडेकर, मूइज खेडेकर, सलीम मुल्ला, मजीद लमतुरे, सलाम काक्तीकर, मुक्तार काक्तीकर व इब्राहिम लमतुरे.
आज सकाळी प्रभाग ४ मध्ये प्रचारफेरी
ताराराणी आघाडीचा प्रचार जोरात सुरू असून त्याच अनुषंगाने उद्या सकाळी ठीक 8.00 वाजता प्रभाग क्रमांक ४ मध्ये घर-टू-घर संपर्क दौरा घेण्यात येणार आहे.
या फेरीत प्रभाग चारचे उमेदवार श्री. रशीद महंमद पठाण यांच्या समर्थनार्थ हैदर नगर व दावल मलिक परिसरात नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





