mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५

इंग्लंडमधील आरबोरीकल्चरलचे प्रतिनिधींची शिरसंगी येथील महाकाय वृक्षास  उद्या देणार भेट 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसगी येथील महाकाय वृक्षाला भेट देण्यासाठी इंग्लंडमधील आरबोरीकल्चरल असोसिएशन चे प्रतिनिधी उद्या भेट देणार आहेत.

शिरसंगी येथील महाकाय वटवृक्ष हा नेहमीच चर्चेचा विषय होत राहिला आहे.या अवाढव्य वृक्षाची पाहणी करण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी इंग्लंड येथील अरबोरीकल्चरल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पारकर, फिलीप स्माईल, वैभव राजे, आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम इत्यादी भेट घेऊन माहिती घेणार आहेत.

हलकर्णी आजरा रस्त्याला गती, पण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हलकर्णी – महागाव आजरा चंदगड या रस्त्याच्या कामाला मार्च पासून सुरुवात झाली असून आजरा तालुक्यातील भावेवाडी, चितळे, जेऊर, ऊंचगी, श्रृंगारवाडी या रस्त्यावरील गावाना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या नंतर आजरा महागाव रस्त्याचे कामकाज जोरदारपणे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूपट्ट्या खुदाई करून भरावा घालण्याचे काम दिवरात्र सुरू आहे.या रस्त्यावर धुळ पसरली असून वेडी वाकडी वळणे व जंगल परीसरामधून जाताना वाहन धारकांनी सावधगिरी बाळगून दक्षता घेण्याची गरज आहे.

मलिग्रे तिट्टयापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून दोन्ही बाजूपट्ट्या खूदाई करून डबर रोलींगच्या कामाबरोबर रस्ता काँक्रेटीकरण सुरुवात केली आहे. पण ही कामाची पद्धत पाहता जनतेतून नाराजीचा सुर दिसून येत आहे.

महागाव आजरा रस्त्यावर डोंगर भाग असून चढ उतारामुळे वेडी वाकडी वळणाची संख्या बरीच आहे. रस्ता रूंदीकरणासह सरळ रेषेत न घेता,जुन्या रस्त्याच्या मार्गाने कामकाज सुरू असून, कामाच्या दर्जा बाबत प्रश्न निर्माण झाले असल्याने, लोकांच्या मधून तीव्र नाराजी दिसत आहे. रस्ता काँक्रीटीकरणावर पाणी मारले जात नसल्याने, रस्ता मजबुती करणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संकेश्वर-बांदा रस्त्याप्रमाणे हलकर्णी- महागाव+ चंदगड रस्ता होणार असे सांगण्यात आले असताना, मलिग्रे पासून सुरू केलेल्या कामावरून जनतेचा भ्रमनिरास होत आहे. मलिग्रे येथील काळीमाणीचे वळण तसेच काळकाईच्या ओढ्या जवळचे यु आकाराचे वळण, वन विभागातील चाफ्याच्या भावीचे वळण व होणेवाडी गावाकडे जाणारे लागून असणारे एल आकारचे वळण, हात्तीवडे – मेंढोली ओढ्याचे वळण ही वेडी वाकडी वळणे दुरूस्ती करणे आवश्यक आहेत.

हलकर्णी-आजरा रस्ता वळण काढून रस्ता काँक्रटीकरण मजबुत करणे आवश्यक असताना रस्त्यावर पाणीच मारले जात नाही. रस्ता कामात फसवणूक केली जात आहे.
केशव बुगडे
चेअरमन भावेश्वरी पत संस्था मलिग्रे.

आज शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन एमआयडीसी आजरा येथे आज बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.

या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात पाण्याची स्त्रोत वाढवणे, शेतमाल उत्पादनात वाढ करणे व शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती साधने या विषयावर सविस्तर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी केले आहे.

निधन वार्ता
जोतिबा कोकितकर

हारूर (ता.आजरा ) येथील जोतिबा शंकर कोकितकर ( वय ७६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

कानोली – हारूर ग्रुप ग्रामपंचायतीचे ते माजी उपसरपंच होत, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

रक्षविसर्जन गुरुवार दि. २७ रोजी आहे.



प्रभाग १० मध्ये ताराराणी आघाडीला भरघोस प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक १० मधील ताराराणी आघाडीचे उमेदवार सिकंदर दरवाजकर, प्रभाग क्रमांक
९ मधील उमेदवार सौ. यास्मिन कुदरत लतीफ तसेच ताराराणी आघाडीचे प्रमुख आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांच्या समर्थनार्थ वाडा गल्ली, दर्गा गल्ली व मेन रोड परिसरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीदरम्यान घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत विकासकामांची माहिती देण्यावर उमेदवारांकडून विशेष भर देण्यात आला. या प्रचार रॅलीमध्ये विलासराव नाईक, डॉ. अनिल देशपांडे, डॉ.दीपक सातोसकर, वसीम दरवाजकर, शोएब दरवाजकर, मोहम्मद दरवाजकर,शरीफ खेडेकर, भरत कांबळे, बाळू कुंभार, मजिद दरवाजकर, दाऊद दरवाजकर, कादिर दरवाजकर, नौशाद चांद, जहिद जमाल, अय्याज माणगावकर, उजेर दरवाजकर, रेहान दरवाजकर, रसूल आगा, शोकात चांद, गणी खेडेकर, अब्दुल रहीम खेडेकर, नईम मुराद, सिद्दिक माणगावकर, असिफ दरवाजकर, दानिश लतीफ, इमाम नेसरीकर, आरिफ मालदार, रिजवान फकीर, इरफान मुल्ला, इजाज माणगावकर, असिफ मुल्ला, मतीन मुराद, हुरेर माणगावकर, जैद माणगावकर, जब्बार तकिलदार, हुसेन पटेल मोठ्या संख्येने कार्यकर्त्यासह तरुण वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

परिवर्तन विकास आघाडीने गांधीनगर भागातील मतदारांशी साधला संवाद


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गांधीनगर प्रभाग सोळा मधील मतदारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.

विकास प्रक्रियेपासून दूर गेलेले आजरा शहर स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच गांधीनगर परिसरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत यांनी सांगितले.

गांधीनगर वासीयांनी आघाडीच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करून उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी आजरा कारखाना संचालक अशोक तर्डेकर, युवराज पोवार, अशोक जांभळे, प्रभाकर कोरवी यांच्यासह आघाडीतील प्रमुख मंडळी उपस्थित होती.

आज चिन्ह वाटप कार्यक्रम

आजरा नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच व प्रलंबित असणारा चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आज बुधवार दिनांक २६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय आजरा येथे पार पडणार आहे.

पाठिंबा…

प्रभाग एक मधील भारत नगर येथील मकसूद माणगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी ताराराणी विकास आघाडीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याचे ऊस बिल व तोडणी वाहतुक बिल जमा-अध्यक्ष आजरा कारखान्याचे ऊस बिल व तोडणी वाहतुक बिल जमा-अध्यक्ष शिंत्रे यांची माहिती

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विजेचा धक्का बसून आज-यात एकाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!