mrityunjaymahanews
कोल्हापूर

ओ शेठ… तुमचा नादच केलाय थेट..

ओ शेठ… तुमचा नादच केलाय थेट..

ज्योतिप्रसाद सावंत

 

शेठजींचा नाद करायचा म्हणजे तो दहावेळा विचार करूनच करायला पाहिजे. शेठजी म्हणजे केवढ मोठे प्रस्थ..? सहकारी संस्थांरुपी साम्राज्याचे सम्राटच. त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची संस्थां नाही असं नाही. अशा शेठजींचा नाद आमच्या दादांनी केला. आता नाद करताना समोर शेठजीनी आपल्या बेडरपणामुळे किती जणांना यापूर्वी अंगावर घेतलं याचं भान ठेवायला नको का? बरं नाद केला तो कसा… ‘खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी’ अशा आणीबाणीच्या वेळी.एवढ मोठ साम्राज्य पाठीशी असल्यानंतर शेठजी कसे शांत बसतील? ‘दबंग’अशी पहिल्या पासून त्यांची ओळख. पुन्हा एक वेळ त्यांनी युद्धाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. युद्ध काय शेठजिंना नवीन नाही आणि हार-जीत याच्याशी काही त्यांच देणे-घेण नाही. आखाड्यात उडी घेताना समोर विरोधात जरी ‘भाऊ’ असले तरी भाऊंच्या पाठीशी फणाधारी नाग असल्यामुळे भाऊ बिनधास्‍त आहेत याचा विसर शेठजींना पडला. बोलण्याच्या नादात त्यांनी थेट नागाला हात घातला. वास्तविक शेठजींनी गडुळाच पाणी कशाला ढवळायचं? नागाच्या पिल्लाला खवळिल तर गोष्ट वेगळी होती. थेट नागाशीच पंगा…? मग दंगा हा होणारच . हा नाग कांही साधा नाही. केवळ फणाधारीच नाही तर ‘इच्छाधारी नाग’ अशीही त्याची ओळख.या इच्छाधारी नागाने भल्याभल्यांना गुडघ्यावर आणलय आणि त्यांची कळ शेठजींनी का बर काढावी?? आता नागाच्या शेपटीवरच पाय ठेवलाय त्यामूळे शेठजींची संगत केले त्यांना,ओ शेठ.. तुमचा नादच केलाय थेट’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. नुसता नागाने फणा काढल्यावर लोकांची पांगापांग झाली. पांगापांग सोडाच तर काही मंडळी आठवडाभरापासून चक्क अंडरग्राउंड झाली आहेत. काहींनी फ्रॉग जम्प मारल्या आहेत.आता शेठजिंचा दादांनी केलेला नाद तडीला जाणार की अंगलट येणार…? हे समजायला फारसा वेळ लागणार नाही.कारण घोडा-मैदान जवळ आहे.

 

संबंधित पोस्ट

वाटंगी(ता.आजरा) येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह विहिरीत आढळला.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सरंबळवाडी येथे गोठा कोसळून म्हैस मृत्यूमुखी.. 50 हजारांचे नुकसान

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

साधनाताई : प्रभाग सहाच्या विकासाचे नवे पर्व

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातून जिल्हा बँकेकरीता अशोक चराटी, सुधिर देसाई यांच्यासह पाच जणांचे अर्ज दाखल

mrityunjay mahanews
error: Content is protected !!