mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी मंगळवारी…. विश्वनाथ गुंजाटी यांचे निधन …

आजरा नगरपंचायतीच्या विशेष समिती सभापती निवडी मंगळवारी : ऑनलाईन पद्धतीने होणार निवड

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आजरा नगरपंचायतीच्या तब्बल चार महिने रखडलेल्या विविध विषय समित्यांची रचना व सभापती निवड मंगळवार दिनांक १८ रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या विशेष सभेसाठी जिल्हाधिकारी यांचे प्राधिकृत पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी,भुदरगड- आजरा यांची नियुक्ती करणेत आली आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी बहुतांशी नगरसेवकांना यापूर्वी विविध समित्यांवर सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे तरीीदेखील यावेळी बांधकामसह पाणीपुरवठा समितीवर वर्णी लाागण्यासाठी काही नगरसेवकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. विषय समिती सदस्य निवडीनंतर आवश्यकता भासल्यास सभापतींची निवडणूक घेवून निकाल जाहीर करतील. नगरपंचायती मध्ये सत्ताधारी व विरोधी गट एकत्र आल्याने या निवडीमध्ये फारसा संघर्ष होणार नाही असे दिसते सर्वानुमते या निवडी बिनविरोध पार पडतील असे चित्र सध्या आहे. एकूण सहा समित्यांची रचना व सभापती निवड यावेळी होणार आहे.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेमार्फत विविध सुविधा उपलब्ध

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या आजरा या संस्थेच्या सर्व शाखांमध्ये व मुख्यकार्यालय आजरा येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करणेत आली. बँकाप्रमाणे ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून आरटीजीएस / एनईएफटी, आय. एम. पी. एस., मोबाईल बँकीग, एटीएम कार्ड व क्युआर कोड सुविधांचा शुभारंभ करणेत आला. त्याचे उद्घाटन जेष्ठ मार्गदर्शक श्री. महादेव (बापू) केशव टोपले व संस्थेचे चेअरमन श्री. जनार्दन विठ्ठल टोपले यांचे शुभहस्ते करणेत आले. संस्थेचे चेअरमन श्री. जनार्दन विठ्ठल टोपले यांनी सध्या संस्थेच्या ठेवी रुपये १४६ कोटी, कर्ज वाटप १२० कोटी, गुंतवणूक ४४ कोटी असून एकूण व्यवसाय २६६ कोटीचा आहे. बदलत्या काळा प्रमाणे ग्राहकांना जलद सुविधा देणेत आली पाहीजे व संस्थेचा व्यवसाय वाढविला पाहीजे असे त्यांनी सांगितले त्यावेळ जेष्ठ संचालक श्री. मलिककुमार गणपतराव बुरुड, श्री. रविंद्र दामोदर दामले, श्री. राजेंद्र परशुराम चंदनवाले, संचालिका सौ. माधवी रमेश कारेकर, मुंबई शाखेचे चेअरमन श्री. दत्तात्रय वासुदेव सातोसे, आयसीआयसीआय बँकेचे शाखा आजराचे शाखाधिकारी टीलसाहेब, संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. अर्जुन रामा कुंभार व कर्मचारी वर्ग उपस्थित ते. संस्थेचे सर्व ग्राहक, सभासद, कर्जदार, ठेवीदार, हितचिंतक यांनी या सुविधांचा घ्यावा असे चेअरमन जनार्दन विठ्ठल टोपले यांनी आवाहन केले आहे.

मराठा महासंघातर्फे जिजाऊ जयंती उत्साहात…

अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका आजरा यांचे वतीने आजरा येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महासंघाच्या वतीने जिजाऊमाता यांच्या प्रतिमेचे
पूजन, आजरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. ज्योत्स्ना चराटी – पाटील व मराठा महासंघाच्या महिला अध्यक्षा सौ. रचना होलम व उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते करणेत आले.

छत्रपति शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊ जयंती निमित्य आजरा तालुक्यातील कष्टकरी घरेलू कामगार महिला यांना मराठा महासंघातर्फे ब्लँकेंट भेट देणेत आल्या.

राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास अखिल भारतीय जिल्हा संघाचे प्रमुख श्री. मारुती मोरे, आजरा तालुका अध्यक्ष श्री. बंडोपंत चव्हाण व सर्व सदस्य व महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संभाजीराव इंजल यांनी केले. आभार तालुका अध्यक्ष बंडोपंत चहाण यांनी मानले.

कु.खदिजा मुल्ला हिचे कौतुकास्पद यश

येथील सुलगाव प्राथमिक विद्यामंदिरची विद्यार्थीनी कु. खदिजा शहानवाज मुल्ला, हीने ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २७८ गुणांसह राज्यात नववा क्रमांक पटकावला. तिला रवींद्र दोरुगडे व बाबासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

नगरसेवक आलम नाईकवाडे, पं. स. सदस्य बशीर खेडेकर, ऍड. जावेद दिडबाग,मजीद पठाण,अबूसईद माणगांवकर आदींनी मुस्लिम समाजातर्फे तिचा विशेष गौरव केला. यावेळी इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आजरा साखर कारखान्यामार्फत स्व. भिमराव  चव्हाण यांना आदरांजली 

आजरा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव आबासो देसाई (भाजी आमदार) यांचे सहकारी स्व. भिमराव तुकाराम चव्हाण यांच्या   स्मृतीदिना निमित्य हात्तीवडे येथील निवासस्थानी उपस्थित राहून स्व. भीमराव  चव्हाण यांना कारखान्याचे वतीने चेअरमन प्रा.सुनिल शिंत्रे यांनी आदरांजली वाहिली.

स्व. भिमराव  चव्हाण यांचा कारखाना उभारणीमध्ये मोलाचा वाटा आहे. स्व. वसंतराव  देसाई यांच्या खांदयाला खांदा लावुन आजरा तालुक्याच्या डोंगराळ भागात कभी ऊसाचे उत्पादन असतांना देखील आजरेवासीयांनी पाहीलेले साखर कारखाना उभारणीचे स्वप्न साकार करणेत स्व. भिमराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. त्यांच्यावरील असलेल्या जनतेचे अतुट प्रेम आणि विश्वासामुळेच विकमी भागभांडवलाची उभारणी करणेसाठी यांचे कारखान्यास मोलाचे सहकार्य लाभले आहे.

यावेळी  श्री. विश्वास चव्हाण, हात्तीवडे हायस्कुलचे मुख्याद्यापक श्री. आमणगी, अॅड. श्री. सुर्यकांत कडाकणे, श्री. नागेश चौगले. श्री. राहुल शिरकोळे, कारखाना शेती विभागाकडील ओव्हरसिअर व कर्मचारी इत्यादी उपस्थित राहून आदरांजली अर्पण केल

निधन वार्ता 

विश्वनाथ गुंजाटी ……

आजरा येथील प्रतिथयश कापड व्यापारी विश्वनाथ शिव पुत्राप्पा गुंजाटी(वय ७२) यांचे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील श्री. रवळनाथ सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक संचालक होते.

.

संबंधित पोस्ट

२३ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला… आजरा तालुक्यातील घटना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!