mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

सर्फनाला प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले…. आजऱ्यात विविध संघटनांच्या वतीने विजयी रॅली

.


शेतकरी आंदोलनाचा विजय हा लोकशाहीचा विजय : आजऱ्यात विविध संघटनांची विजयी रॅली

   दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनामधिल सहभागी आंदोलकांवर विविध आरोप करत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारकडून झाला. भाजपा सरकारने त्यांना खलिस्तानवादी ठरवण्याचा प्रयत्न केलाच परंतु त्याच बरोबर हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी त्यांच्यावर वाहने घालण्याचाही प्रयत्न झाला. अदानी- अंबानीच्या दलालीसाठी पुढाकार घेणाऱ्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याचा केलेला हा प्रयत्न केवळ एकजुटीच्या जोरावर शेतकऱ्यानीी हाणून पाडला आहे. हा विजय म्हणजे केवळ आंदोलकांचा नव्हे तर लोकशाहीचा विजय आहे,असे प्रतिपादन कॉ. संपत देसाई यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रा. राजा शिरगुप्पे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस सुरुवात झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीमध्ये शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते.संभाजी चौकात आल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या वेळी संपत देसाई, कॉ. अतुल दिघे प्रा. राजा शिरगुप्पे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तानाजी देसाई, शिवाजी गुरव, निवृत्ती कांबळे, शांताराम पाटील आदींनीही मार्गदर्शनपर भाषणे केली. या रॅली प्रसंगी सौ. पद्मिनी पिळणकर, गीता पोतदार, नारायण भडांगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर ‘डॉलर’मधील कारभाराची चौकशी सुरू

पेद्रेवाडी(ता.आजरा)  ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये काही वित्तीय फेरफार झाल्याच्या घटना घडल्या असल्याचा आरोप सदस्य अशोक लक्ष्‍मण लोहार यांनी करत ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. यातील काही रकमा तर डॉलरमध्ये अदा करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले असल्याचााचा लोहार यांनी आरोप केला होता. या मागणीकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने न पाहिल्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. यानंतर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या कामी भुदरगड पंचायत समिती मधील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के.ए. उपाध्ये यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानंतर लोहार यांनी उपोषण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘डॉलर’मधील झालेल्या खर्चाचा उलगडा या चौकशीनंतर स्पष्ट होईल असेही आता दिसत आहे.

खेडगे ग्रामस्थांनी सर्फनाला प्रकल्पाचे काम बंद पाडले.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न करताच सुरू झालेले सर्फनाला धरणाचे काम खेडगे ग्रामस्थांनी बंद पाडले. गेल्या आठवड्यात भुदरगड आजराच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांना खेडगे ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यापूर्वी जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य अभियंता कृष्णा खोरे, आयुक्त पुणे यांनाही खेडगे ग्रामस्थांनी निवेदन देऊन पुनर्वसनाची मागणी केली आहे. याबाबत चर्चा, निर्णय न करताच धरणाचे काम सुरू केल्यास ते करू न देण्याचा निर्णयही कळविला होता. प्रकल्पग्रस्तांशी कोणतीही चर्चा न करताच धरणाचे काम चालू केल्याने काम बंद केले गेले. जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्यासह पुनर्वसनाबाबत बैठक होऊन चर्चा झाल्याशिवाय धरणाचे काम होऊ द्यायचे नाही असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. धोंडिबा सावंत, शंकर ढोकरे, चंद्रकांत कविटकर, राजाराम अमुनेकर यांच्यासह अन्य प्रकल्पग्रस्तांनी धरणस्थळावर जाऊन धरणाचे काम बंद पाडले आहे.

‘युवासेने ‘ तर्फे  मडिलगे येथे रक्तदान शिबीर

युवासेना शाखा, मडीलगे यांच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले.यावेळी डॉ.सतिश नर्सिंग(युवासेना विस्तारक कोल्हापुर जिल्हा),दिनेश कुंभीरकर(युवासेना जिल्हा युवाअधिकारी)
महेश पाटील(युवासेना तालुका युवाआधिकारी),नितिन कातकर(तालुका समन्वयक),धनाजी बुगडे(जिल्हा उप समन्वयक)राजकुमार भोगण(तालुका समन्वयक)सुनिल सातवनेकर(तालुका सरचिटणीस),रोहित डावरे (उपतालुकाअधिकारी),तेजस लोहार(सोशल मिडिया समन्वयक),अमोल दिवेकर(उप शाखा अधिकारी) व इतर सर्व पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गडहिंग्लजच्या खेळाडूंचे घवघवीत यश

येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मिलींद आपटे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध गटात घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोशियन व मिलींद आपटे बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते. दिनांक १० ते १२ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत गडहिंग्लज, कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, पेठवडगांवसह विविध अकॅडमीच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी बसवराज हंजी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नोरेंज उपस्थित होते. संयोजक मिलींद आपटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अरूण परूळेकर, नअल्विन हंजी, प्रा. नोरेंज व बसवराज हंजी यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे बक्षिस वितरण संगाप्पा दड्डी, संग्राम कदम, सौ. श्वेता कदम, अमीत पेडणेकर, डॉ. किशोर घेवडे , विश्वराज चव्हाण, सचिन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व सूत्रसंचालन संजय सावंत यांनी केले. सौ. शितल आपटे यांनी आभार मानले. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून अजय चव्हाण यांनी काम पाहिले,स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- १० वर्षांखालील मुले शौर्य कदम (गडहिंग्लज) तन्मय पाटील (कोल्हापूर) १० वर्षांखालील मुली अंकिता मांगले (गडहिंग्लज) जान्हवी घारसे (पेठ वडगांव) १३ वर्षांखालील मुले चैतन्य तारे ( कोल्हापूर) शिवराम मोरे (कोल्हापूर) १३ वर्षांखालील मुली ऋतिका कांबळे, श्रेणिका हंजी (गडहिंग्लज) १५ वर्षाखालील मुले ऋषीकेश कांबळे, सिध्देश सावंत (गडहिंग्लज) १५ वर्षांखालील मुली श्रेणिका हंजी, ऋतिका कांबळे, (गडहिंग्लज) १९ वर्षांखालील मुले जय दडी (गडहिंग्लज) प्रथमेश मारे (कोल्हापूर) १९ वर्षांखालील मुली राधिका काणे (कोल्हापूर), श्रेणिका हंजी (गडहिंग्लज) पुरुष दुहेरी अक्षय – मनवाडकर व निनाद कामत (कोल्हापूर), ऋषीकेश माने व शुभम बुगडे (कोल्हापूर), पुरुष दुहेरी ४० वर्षावरील इम्रान जमादार व विनायक भोगण (कोल्हापूर), आनंद मनवाडकर व अरूण परूळेकर (कोल्हापूर)

स्पर्धेचे संयोजन मिलींद आपटे, सत्यजित मोहिते, स्वरूप पाटील, श्रीयश पाटील, स्मीथ सुतार, श्रुती घरपणकर, ऐश्वर्या सुतार, अन्वित मुळीक यांनी केले.

आजरा साखर कारखाना गाळप रिपोर्ट

दिनांक – १२.१२.२०२१
दिवस. – ४२
एकुण गाळप – १.११,१४० मे.टन.                        उत्पादित साखर – १,२२,९५० क्विंटल.                   सरासरी उतारा- ११.१०

निधन वार्ता……….

आजरा येथील मुक्ताबाई जगन्नाथ चिंडक (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील आजरा साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पांडुरंग हरेर यांच्या त्या सासू व माध्यमिक शिक्षिका सौ.विद्या हरेर यांच्या त्या मातोश्री होत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लोकाभिमुख कारभाराची हमी : अभिषेक शिंपी

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात जेऊरचा युवक ठार

mrityunjay mahanews

फड सांभाळ तुऱ्याला ग आला… आता फड सांभाळायचा कसा…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!