mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्या

इटे येथे घरफोडीत दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

 

 

इटे येथे घरफोडीत दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

इटे (ता. आजरा) येथे झालेल्या घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा रुपये दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की इटे (ता. आजरा) येथील श्रीमती सावित्रीबाई गणपती फगरे या औषधोपचारासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. दरम्यानच्या कालावधीमध्ये फगरे यांच्या घराची कौले काढून अज्ञात चोरट्यांनी घरांमध्ये प्रवेश केला व त्यांच्या पेटीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. फगरे या मुंबईहून गावी परत आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. याबाबतची वर्दी पोलिसात देण्यात आली असून पुढील तपास आजरा पोलिस करत आहेत.

मुंबईस्थित आजरेकरानो सावधान..
आजरा तालुक्यातील अनेक मंडळी मुंबई येथे नोकरी व्यवसायानिमित्य मुंबई येथे रहातात. नेमका याचाच गैरफायदा घेत मूळ गावी चोरीसारखे प्रकार होताना दिसतात. त्यामुळे ‘मुंबईकरांनो सावधान…’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!