mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यादेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार  दि.८ आक्टोंबर २०२५

रवळनाथ मंदिराची दानपेटी फोडली… एकास अटक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील ग्रामदैवत रवळनाथ मंदिराची दानपेटी कुलूप तोडून तोडून त्यातील ५० हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी गजेश भोला भारद्वाज (रा.गांधीनगर,आजरा) या उत्तर प्रदेशातील बांधकाम कामगारास पोलिसांनी अटक केली आहे.

मंदिराची दानपेटी ६ ऑक्टोबर रोजी फोडल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मंदिराचे पुजारी संदीप अशोक गुरव यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली . पोलिसांनी तातडीने हालचाली करत सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यास शोधून काढले व त्याला अटक केली आहे.

आज नगरसेवक पदाचे आरक्षण होणार जाहीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि.८ रोजी प्रभाग निहाय नगरसेवक पदाच्या आरक्षणासह मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या आरक्षणावर इच्छुकांचे भवितव्य भवितव्य असल्याने आरक्षण सोडतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

सकाळी ११:३० वाजता नगरपंचायतीच्या मुख्य इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी हरीष सूळ यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीचा व मावळत्या सभागृहातील यापूर्वीच्या आरक्षणाचा काहीही संबंध राहणार नसल्याने काही प्रभागात जुन्याच आरक्षणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

रस्त्याचे काम सुरू… त्रुटींचे काय…?
गांधीनगर वासीयांचा सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गांधीनगर मधील अंतर्गत रस्त्यांचं काम गतीने होत आहे यामुळे एकीकडे गांधीनगर ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात असताना दुसरीकडे या रस्त्यावरील त्रुटी न काढता व त्यात न बदल करता हा रस्ता बांधण्याचा व हे काम पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायत व संबंधित ठेकेदाराचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या पावसाळ्यात या रस्त्यातील पाण्याच्या निचऱ्या संदर्भात असणारे दोष दाखवून देऊनही घाईगडबडीने आहे त्या पद्धतीनेच याचा कोणत्याही प्रकारे विचार न करता काम सुरू केले आहे.

गांधीनगर धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रथमतः या रस्त्यावरील त्रुटी पूर्ण करून हा रस्ता पूर्ण करून द्यावा अशी विनंती संबंधित ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. या त्रुटी काढण्याच्या आधीच हा रस्ता पूर्ण करण्यात आला तर धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळाचा याला विरोध असेल व या कामाचा आंदोलन छेडून निषेध केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

निधन वार्ता
दशरथ कुंभार

श्री दशरथ रामा कुंभार आजरा ( वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक ७ रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , सुना , नातवंडे असून ते स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा चे सरव्यवस्थापक श्री. अर्जुन कुंभार यांचे ज्येष्ठ बंधू होत.

उत्तूरमध्ये संघशताब्दी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने उत्तूर मंडळात संघ शताब्दी वर्षानिमित्त आणि विजयादशमी शस्त्रपूजन सोहळ्यानिमित्त  स्वयंसेवकांनी उत्साहात पथसंचलन केले तसेच  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

 पथसंचलनादरम्यान स्वयंसेवकांनी एकसमान पोशाखात घोषणांच्या जयघोषात शहरात फेरी मारला. नागरिकांनी या पथ चलनाचे स्वागत फुलांच्या वर्षावाने केले.कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंडळ सदस्य युवराज कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संघाची कार्यपद्धती, स्वयंसेवकांचे समाजकार्यातील योगदान व राष्ट्रनिर्मितीतील भूमिका यावर सविस्तर भाष्य केले. या पथसंचलनात विविध वयोगटातील स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले होते. संपू

सरन्यायाधीश हल्ला प्रकरणी आरपीआय गवई गट यांच्याकडून निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सरन्यायाधीश बी. आर. गवई साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – गवई गट यांच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला.

या निवेदनावर इतर सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.तसेच आजरा शहरातील संभाजी चौकामध्ये येऊन सर्व संघटनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदन देते प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, सूर्यकांत कांबळे, चंदर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यंकटराव शिक्षण संकुलात महाहादगा निमित्त माता पालकांचा स्नेहमेळावा संपन्न


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील व्यंकटराव शिक्षण समूहात महाहादगानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींच्या माता पालकांना हळदी कुंकू व व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी उपस्थित होत्या.

सौ. कोरी यांनी आपल्या मनोगतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा जपत प्रत्येक विद्यार्थिनीने स्वकर्तृत्वावर स्वतःचे नाव निर्माण करावे. मन लावून शिक्षण घ्यावे आणि पुढे माता, माय भूमी, मातृशाळा आणि देशाची सेवा आपल्याला करणे हे आपले कर्तव्य मानावे. तसेच पालक मातांनीसुद्धा आपल्या मुलींना स्वयंपाक शिकवत आणि आपल्या संस्कृतीचीही ओळख करून द्यावी. कारण शिक्षणाबरोबर संस्कृती जपणे हे देखील स्त्रीचे कर्तव्य आहे असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका मजी जि प सदस्या सौ. अलकाताई जयवंतराव शिंपी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रशालेतील ज्या विद्यार्थिनींना अडचण येईल मदतीची गरज लागेल त्यांच्या मदतीला मी नेहमीच पुढे येईन असे सौ.शिंपी यांनी आश्वासित केले .

प्रशालेतील सर्व शिक्षिका,विद्यार्थिनी व माता पालक यानी हस्त नक्षत्रातील हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून हादग्याची गाणी म्हटली. हळदी कुंकू चा कार्यक्रम झाल्यानंतर माता पालकांना वाण देण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये माजी नगरसेविका सौ. सुमैय्या खेडेकर व सौ. माया विलास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संचालिका सौ.प्रियांका अभिषेक शिंपी, सौ.आशा सचिन शिंपी, सौ.सीमा पोवार माजी नगरसेविका, सौ.शोभा पटेकर, सौ.नंदाताई घोरपडे, सौ.पुष्पांजली जाधव, सौ.मेदिनी पाटील, सौ.सुगंधा जाधव, सौ.शालन घोरपडे, सौ.माया पाटील, सौ. कल्पना जाधव,  प्राचार्य श्री.एम. एम.नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. व्ही.ए. वडवळेकर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. ए.डी. पाटील, हादगा सणाची माहिती सौ. एस.डी. इलगे यांनी दिली. आभार श्रीम.आर.एन. पाटील यांनी मानले.

 

नवरात्र स्पर्धांचे बक्षिस वितरण…

आजरा ,: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आवंडी वसाहतीमध्ये शिवजन्मोत्सव व भावेश्वरी मंडळांने आयोजित केलेल्या नवरात्र विशेष खेळ पैठणीचा नऊ राञ नऊ पैठणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कोजागिरी पौर्णिमे निमित्त विजेत्या महिलांना पैठणीचे बक्षिसे वितरण मंडळाचे संयोजक सुभाष निकम यांचे हस्ते करण्यात आले. विजेत्या सौ. मनिषा निकम, ज्योती नितवडेकर, शिला राणे, स्नेहल निकम, भाग्यश्री निकम, अलका येसादे, अलका मांगले, जयश्री गावडे, स्मिता पाटील यांनी पैठणी पटकवल्या. या वेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आवंडी वसाहत चे सुपुत्र अनिल चौगुले यांना मिळाला त्या बद्दल त्यांचा ही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व आवंडी वसाहत मधील भारतीय डाक विभाग मुंबई मध्ये कार्यरत शितल संजय पाटील हिने राष्ट्रीय २०० मिटर धावणे स्पर्धेत अहमदाबाद मध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्या बद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन सुभाष निकम, वैभव बांदेकर, किरण निकम, अभिषेक चौगुले, साहिल भादवणकर, करण कोले, सुशांत बांदेकर, अंकुश मांगले, ऋतिक फगरे, दिनेश कालेकर, चेतन निकम, ओमकार मांगले, रघुनाथ ठिकार, विलास अस्वले, अमोल गावडे, शंकर सावंत, जयसिंग सावंत यांनी सुयोग्य नियोजन करुन कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

रस्ता प्रश्नी कोळिंद्रे ग्रामस्थांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

२०२६ ला होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेसाठी गावातील विकासकामांसाठी कोळिंद्रे ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

श्री महालक्ष्मीचा रथाच्या मिरवणूकीचा मार्गासाठी निधी देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी आरोग्य मंत्री आबिटकरा यांनी गावांतर्गत रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.

श्री.विजयकुमार पाटील, सुभाष सावंत, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, जोतिबा बोर हे निवेदन देताना उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आईच्या मृत्यूनंतर दोन महिन्यातच मुलाचाही मृत्यू …अमोल बांदेकर यांचा आकस्मिक मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही : खा. प्रा.संजय मंडलिक

mrityunjay mahanews
error: Content is protected !!