mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि.३ मार्च २०२५

एक अकेला थक जायेगा…

मिलकर बोझ उठाना..

साथी हात बढाना...

                  ज्योतिप्रसाद सावंत 

       शुक्रवारी गांधीनगर येथील आरती व राहुल गायकवाड कुटुंबियांच्या घराला लागलेली आग संपूर्ण संसार उध्वस्त करणारी ठरली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून उभारलेल्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. संसार मोडून पडलेल्या या कुटुंबीयांना स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक, सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन उभारी देण्याची गरज प्रकर्षाने पुढे येत आहे.

      रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीने पहिले पाऊल उचलत गायकवाड कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे केला आहे. असेच जर दातृत्वाचे हात पुढे आले तर गायकवाड कुटुंबीयांना नव्याने संसार उभारणे फारसे अवघड नाही. संसार उभारण्यासाठी गायकवाड कुटुंबीय धडपडत आहेच. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्थिक स्वरूपात तर ज्यांना आर्थिक स्वरूपात शक्य नाही त्यांनी वस्तू रुपात मदत केल्यास हे कुटुंब निश्चितच नव्या जोमाने पुन्हा उभे राहील.

एक अकेला थक जायेगा…
मिलकर बोझ उठाना…

 तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल फडके यांची निवड

           आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाच्या आजरा तालुका अध्यक्षपदी आजरा साखर कारखान्याचे संचालक श्री. अनिल भीमा फडके यांची निवड करण्यात आली आहे.

       सदर निवडीचे पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आले.

       यावेळी माजी आमदार राजेश पाटील,बाबासाहेब पाटील असुर्लेकर,जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुधीर देसाई, जिल्हा बँक संचालक , वसंत धुरे ,अध्यक्ष, आजरा साखर कारखाना , सुभाषराव देसाई ,उपाध्यक्ष आजरा साखर कारखाना, विठ्ठलराव देसाई माजी चेअरमन आजरा तालुका संघ, काशिनाथ तेली, राजू मुरुकटे, संचालक आजरा कारखाना किशोर जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

नुसता अपव्यय…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शहरामधील उपनगरांसह विविध भागातील नागरीक पाण्यासाठी चिंतेत असताना शहरात ठीक- ठिकाणी हजारो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे. एकीकडे पाण्यासाठी करावी लागणारी वणवण तर दुसरीकडे खुलेआम वाया जाणारे पाणी असा विचित्र विरोधाभास शहरात पहावयास मिळत आहे.

        शहरात आजही पाणीपुरवठा सुरळीत नाही. नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लागलेली नाही व जुन्या पाणीपुरवठा योजनेला प्रचंड गळत्या लागलेल्या आहेत. परिणामी तीन ते चार दिवसाआड नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवले जात आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातून एकदा पाणी मिळत असल्याने या कृत्रिम पाणीटंचाईने शहरवासीय वैतागून गेले आहेत.

       असे असताना शहरात अनेक ठिकाणी पाण्याच्या गळत्या सुरूच आहेत. गांधीनगर येथील पंप व संप हाऊस मधून हजारो लिटर पाणी शेजारच्या क्रीडा संकुल मैदान परिसरात गेल्या सहा महिन्यापासून वारंवार साचत असल्याचे दिसते.

       नगरपंचायतीला पाण्याचे महत्व कळणार तरी कधी ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

इ व्ही एम विरोधात आणि वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या समस्यांसाठी ९ एप्रिलला जेलभरो आंदोलन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बहुजन मुक्ती पार्टी इ व्ही एम विरोधात आणि वन्य प्राण्यांच्या निर्माण होत असलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर ९ एप्रिल रोजी जेलभरो आंदोलन करणार आहे.या अनुषंगाने मौजे हत्तिवडे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोपरा सभा घेतली.

      वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तसेच त्यांच्यावर प्राण्यांचे हल्ले होत आहेत. सरकारला याबद्दल काहीही देणे घेणे नाही. परंतु शेतकऱ्याला याचा खूप मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. वन्यप्राण्यामुळे शेतीबरोबरच प्रसंगी शेतकऱ्यांना जीव सुद्धा गमवावा लागत आहे. त्याचबरोबर इ व्ही एम विरोधातही आंदोलने करण्यात येणार आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमधून याविषयी निवेदने दिलेली आहेत .यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तसेच संविधानप्रेमी जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

      यावेळी बहुजन मुक्ती पार्टी, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष किरण के के, अमित सुळेकर, डॉ. उल्हास त्रिरत्ने आदी उपस्थित होते.

 

आजरा महाविद्यालयात एचआयव्ही जनजागृती पर व्याख्यान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि रेड रिबन क्लब यांनी संयुक्तरित्या एचआयव्ही/एड्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्याख्यान आयोजित केले. मुख्य वक्ते हरीश पाटील यांनी एचआयव्ही/एड्सच्या प्रसाराविरुद्ध लढ्यातील नवीन संशोधन आणि जागरूकतेचे महत्त्व सांगितले. विशेषत: ग्रामीण भागात जागरूकतेच्या अभावामुळे या आजाराचा प्रसार वाढत असल्याचे निदर्शनास आणले.

      अलीकडील संशोधनाचा उल्लेख करताना, त्यांनी एंटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) मधील सुधारणांमुळे रुग्णांना दीर्घ आणि आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे एचआयव्हीच्या लसीकरणाच्या दिशेने चाललेले प्रयत्नही आशादायक आहेत असेही स्पष्ट केले.

      सामाजिक कलंक आणि भेदभावावर बोलताना श्री. पाटील यांनी एचआयव्ही/एड्सच्या रुग्णांना समाजात समानतेने वागणूक मिळावी यासाठी जागरूकतेच्या महत्त्वावर जोर दिला. ग्रामीण भागात चाचणी आणि उपचार सुविधांचा अभाव, युवकांमध्ये जागरूकतेची कमतरता आणि सामाजिक कलंक या समस्यांवर मात करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रणजीत पवार यांनी केले, तर स्वागत डॉ. धनंजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल हाके यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक उदय किल्लेदार, महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

काय आहे 5G नेटवर्क… सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथील दोन बैलांना ‘लम्पी’

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!