mrityunjaymahanews
अन्य

आजरा नगरपंचायतीची बदनामी थांबवा… अमरीन मुल्लाचे यश… शृंगारवाडी ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी तपासणी

आजरा नगरपंचायतीची बदनामी थांबवा.. प्रमुख कारभा-यांचे आवाहन

आजरा नगरपंचायतीकडून शहरामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. केवळ राजकीय व व्यक्ती द्वेषातून काही मंडळी नगरपंचायतीच्या या विकासकामांबाबत जाणीवपूर्वक नगरपंचायतीची बदनामी होईल अशी विधाने व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संदेश पसरवत आहेत.नगरसेवक व नगरपंचायतीची बदनामी करून आगामी निवडणूक लढविण्याचा हा प्रयत्न निश्चितच चुकीचा आहे. नगरपंचायतीची बदनामी करण्यापेक्षा विकास कामात योगदान द्या,असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्य नगरसेवक अशोक चराटी, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, विरोधी गटनेते किरण कांबळे यांनी केले आहे. विकास कामाबाबत काही मंडळींनी व्हिडीओ क्लिप द्वारे नगरपंचायतीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सदर व्हिडिओ तयार करून बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही या नगरसेवकांनी दिला आहे.

राज्य सशक्तीकरण पुरस्कारासाठी शृंगारवाडी ग्रामपंचायतीची तपासणी

ग्रुप ग्रामपंचायत शृंगारवाडीची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपाली पाटील व पथकाने पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार व चाईल्ड फ्रेंडली ग्रामपंचायत पुरस्कारासाठी तपासणी केली सदर तपासणी राज्यस्तरीय नामांकनासाठी करण्यात आली असून राज्यातून केंद्र स्तरावर पुरस्कारासाठी १४ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. ज्यावेळी गटविकास अधिकारी बी बी बी वाघ ग्राम विस्तार अधिकारी अभिजीत चव्हाण सरपंच अंबुताई सुतार, उपसरपंच शामराव हरेर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमरीन  मुल्लाचे यश


आजरा तालुक्यातील विशेषतः मुस्लिम समाजामध्ये उच्च शिक्षण घेत महिला वकील होण्याचा मान येथील आमरीन अक्रम मुल्ला यांनी संपादन केला. या संस्मरणीय यशाबद्दल परिवारासह आजरा पंचक्रोशीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
आमरीन मुल्ला यांचे महाविद्यालयीन शिक्षण येथील आजरा महाविद्यालयात झाले. इंग्रजी साहित्यातील पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून त्या पुढील शिक्षणासाठी आणि स्वाभाविक आवड म्हणून कायद्याची पदवी मिळविण्यासाठी त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत सिंहगड लॉ कॉलेजमध्ये दाखल झाल्या. कायदा अभ्यासक्रमातील एलएलबी ही पदवी त्यांनी क्रिमिनल लॉयरमधून विशेष प्राविण्यासह (डीस्टिंक्शन) मिळविली आहे.
त्यांचे वडील मुल्ला कुटुंबातून तर आई सायरा या येथील नाईकवाडे कुटुंबातील आहेत. पण या दोन्ही कुटुंबातून इतके उच्च शिक्षण आजतागायत कोणीही घेतलेले नाही. या पदवी संपादनातून त्यांना त्यांच्या समाजामध्ये उच्च शिक्षणाचे महत्व अधोरेखित करावयाचे होते. त्यामध्ये त्या यशस्वी ठरल्या असल्याचे समाधान त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
आजवरच्या यशात कुटुंबासह विशेषतः आई – वडिलांचे प्रोत्साहन अत्यंत महत्वाचे ठरले. तर आजरा महाविद्यालयातील इंग्रजी विभागाकडील प्रा. रमेश चव्हाण यांनी विशेषतः इंग्रजी भाषेतील वक्ता म्हणून माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमतेस न्याय देत त्यातील पैलू ओळखून मोठे ध्येय बाळगण्याची प्रेरणा दिल्याने आपण येथवर पोहोचल्याचे सांगितले. याशिवाय आर्षद मुल्ला, ऍड. ओमरशरीफ मुजावर, ऍड. एस. एम. नाईकवाडे, तसेच सिंहगड कॉलेजचे प्राध्यापकगण शिल्पा गायकवाड, सोनाली वाघचौरे, कीर्ती कांबळे, नितीन भंडारे, मंजुषा मुगदलकर आदींसह अनेकांनी मार्गदर्शन केले. यापुढे क्रिमिनल लॉयर म्हणून हायकोर्ट अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत राहणार असून कायद्यातील पदव्युत्तर शिक्षणही घेणार आहे, असा मनोदय त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

 

 

संबंधित पोस्ट

तीन लाख ५५ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक धुमशान सुरू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!