mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६

चार चाकी वाहनांकरता साळगाव मार्ग बंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गारगोटी – आजारा रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने साळगाव – आजरा मार्गावर मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली असल्याने हा मार्ग चार चाकी व अवजड वर्णन करता बंद करण्यात आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण होताच पुन्हा हा मार्ग वाहतुकीकरता खुला होईल. केवळ दुचाकी वाहने या मार्गावरून ये-जा करू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे.

नागरिकांनी व वाहन चालकांना इतर मार्गांचा वापर करण्याशिवाय सध्या तरी पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.

रवळनाथ’च्या आजरा शाखा चेअरमनपदी प्रा. डॉ. जनार्दन दळवी यांची नियुक्ती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि.,आजरा (मल्टी-स्टेट) या संस्थेच्या आजरा शाखेच्या चेअरमनपदी प्रा. डॉ. जनार्दन दळवी यांची नियुक्ती केलेली आहे. अशी माहिती संस्थेचे नूतन चेअरमन प्राचार्य डॉ. आर.एस. निळपणकर यांनी दिली.

संस्थापक अध्यक्ष श्री.एम.एल. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच प्रधान कार्यालय संचालक मंडळाची सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठीची बिनविरोध निवडणूक पार पडली. प्रत्येक शाखेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीत शाखा सल्लागार मंडळाची नियुक्ती करण्यात आली. प्रा. डॉ. जनार्दन दळवी आजरा ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच संस्थेचे संस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शैक्षणिक, सामाजिक व सहकार चळवळीतील त्यांचे योगदान विचारात घेऊन संस्थेने त्यांची आजरा शाखा चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे, तर शाखा सल्लागर मंडळात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ माजी वित्तीय सल्लागार  श्री. गणपती केशव नाईक, आजरा येथील श्री. गौतम सुतार, श्री. बाळकृष्ण महादेव दरी, प्रा. राजीव सावंता करपे, सौ. वर्षा जितेंद्र शेलार, व सौ. शामल सुनिल हरेर यांचा समावेश करण्यात आला आहे असेही प्राचार्य डॉ. आर.एस. निळपणकर यांनी सांगितले.

सन्मित्र पतसंस्था आजरा शाखेचे आज स्वमालकीच्या जागेत स्थलांतर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी येथील सन्मित्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या आजरा शाखेचे स्वमारतीच्या जागेमध्ये स्थलांतर आज शुक्रवार दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होत आहे.

येथील लिंगायत गल्लीमध्ये दूरदुंडेश्वर मठासमोर सदर जागा स्थलांतर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते व आजरा नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तहसीलदार समीर माने, सहाय्यक निबंधक सुजय येजरे, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अनिल फडके, सुभाष देसाई, राजू मुरकुटे, संजय चव्हाण, दिगंबर देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजाराम होलम, विठ्ठलराव देसाई, नामदेवराव नार्वेकर, एम.के. देसाई, मधुकर यलगार, प्रकाश कुंभार, जयराम संकपाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी दिली आहे.

सदर कार्यक्रमानिमित्त २ जानेवारी रोजी ठेवीदारांकरता एक वर्षाकरिता दहा टक्के इतका व्याजदर देण्यात येणार असल्याचेही डिसोझा यांनी सांगितले.

निधन वार्ता
अनिल करंबळी

लिंगायत गल्ली , आजरा येथील अर्बन बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल धुळाप्पा करंबळी (वय ७० वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा रोहित, विवाहित मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.

वैभव यमगेकरचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर येथील केंद्रशाळेत शिक्षण घेत असलेल्या वैभवराज यमगेकर याने जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यापूर्वी तालुकास्तरीय स्पर्धेतही त्याने द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली होती.

यासाठी त्याला वर्गशिक्षक संतोष गुरव तसेच मुख्याध्यापक बाळगोंडा कोकितकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वैभवच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून तसेच ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

 शंकर बुडके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तु वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सिरसंगी येथील शंकर कृष्णा बुडके यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसनिमित्त सिरसंगी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेपोयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी आनंदराव जोशीलकर होते .

स्वागत मुख्याध्यापक शिवाजी बोलके यांनी तर प्रास्ताविक उत्तम कोकितकर यांनी केले . सूत्रसंचालन संतरांम केसरकर यांनी केले.

सुरुवातीला विद्यार्थ्यानी लेजीम पथकाद्वारे बुडके गुरुजीना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत मिरवणुकीने आणले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी आनंदराव जोशीलकर यांनी गोवा शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले बुडके गुरुजी यांनी निवृत्ती नंतरही आपली शिक्षणाविषयी ओढ जपली असल्याचे सांगून त्यातूनच त्यांनी गेल्या पाच वर्षंपासून प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना ठेवली असल्याचे नमूद केले.

यावेळी शिवाजीराव पंडित, आजरा कारखाना संचालक शिवाजीराव नांदवडेकर , पत्रकार महादेव कुडव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मच्छिंद्र पाटील आजार कारखाना संचालक शिवाजीराव नांदवडेकर , अप्पासाहेब बेळगुंद्कर, सिरसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी बोलके, संजय केसरकर , लक्ष्मण कुंभार ,अप्पा बुडके, विजय बुडके उपस्थित होते ,

आभार सुप्रिया पाटील यांनी मानले

विशेष सूचना…

मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु  संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.

यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. 

…मुख्य संपादक

 

संबंधित पोस्ट

बाळासाहेब आजगेकर यांचे निधन

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!