mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

गुरूवार  दि.२३ आक्टोंबर २०२५

पाडव्याच्या आनंदावर पावसाचे विरजन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पाच महिन्यांचा कालावधी होत आला तरीही पावसाने आजरा तालुकावासियांची पाठ सोडलेली नसून गणेशोत्सव, दसऱ्यानंतर दिवाळीतही पावसाने हजेरी लावली. यामुळे पाडव्याच्या उत्साहावर पाणी पडले.

काल बुधवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. भाताची सुगी सुरू असतानाच पावसाच्या या हजेरीमुळे शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.

निंगुडगे येथील अमृतेश्वर मंदिर सुशोभीकरणाचा शुभारंभ


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

निंगूडगे ता.आजरा येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून अमृतेश्वर देवालयाच्या परिसर सुशोभिकरणासाठी माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून १ कोटीची निधी मंजूर करून दिला होता. त्याच कामातील कुस्तीच्या आखाड्याचा लोकार्पण सोहळा आज माजी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल फडके, के. डी. सी.सी बँकचे संचालक सुधीरभाऊ देसाई,कारखान्याचे संचालक. एम. के.देसाई, शिवराज कॉलेजचे प्रा. किसनराव कुराडे,सरपंच मारुती कुंभार, व निंगुडगे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये दीपावली पाडवा मुहूर्तावर २ कोटी ७६ लाख ४९ हजार १११ रुपये ठेव संकलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथे स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संस्थेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाच्या जोरावर संस्थेने एका दिवसात तब्बल रू. २ कोटी ७६ लाख ४९ हजार १११ इतके ठेव संकलन करत संस्थेच्या आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे.

सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी यांनी सांगितले. या ठेव संकलनामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्यात आणखी भर पडली आहे. तसेच समाजाला आर्थिकदृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले

संस्थेकडे रू. ४ कोटी ५६ लाख वसुल भागभांडवल, रू. १८० कोटी २५ लाख ठेवी, रू. १५१ कोटी २८ लाख कर्जवाटप, रू. ४४ कोटी १४ लाख बँक गुंतवणूक व ऑडिट वर्ग सत्तत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, सोनेतारण कर्जाची सोय, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद सिध्दाप्पा भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन रामा कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.

आजरा अर्बन बँकेकडे दीपावली पाडव्यानिमित्त ९ कोटी ५४ लाखांच्या ठेवी जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एका दिवसात १२५८ नवीन खाती उघडून तब्बल ९ कोटी ५४ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे १०८२ कोटी ०२ लाख रूपयाच्या ठेवी व ६७७ कोटी ०४ लाख रुपयाची कर्जे असून एकूण मिश्र व्यवसाय १७८९ कोटी ०६ लाख इतका झाला आहे. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख श्री.अशोकअण्णा चराटी, व्हा. चेअरमन श्री. संजय चव्हाण व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

बँकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना राबविल्या असून आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे. केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोक चराटी यांनी केले.

रवळनाथ ही सहकारातील सकारात्मक ऊर्जा डॉ. शैलेश ढबू

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सहकाराच्या माध्यमातून श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसयटीने सर्वसामान्यांची हजारो घरे उभारली आहेत. निवारा ही मानवाची मुलभूत गरज असून ती पुर्ण झाल्यास जे समाधान मिळते ते मानवी जीवनात महत्वपुर्ण आहे. या कार्याबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम ही संस्था राबवित असते. त्यामुळे रवळनाथ ही सहकारातील आदर्शवत सकारात्मक ऊर्जा देणारी संस्था आहे. असे गौरवोद्गार गडहिंग्लज येथील प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. श्री. शैलेश ढबू यांनी व्यक्त केले.

श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या गडहिंग्लज येथील प्रधान कार्यालयात श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स, ज्ञानदीप प्रबोधिनी व श्री महालक्ष्मी वुमेन्स को ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली निमित्त लक्ष्मीपूजन व श्री रवळनाथ संस्था समुह सदिच्छा भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले होते. डॉ. सौ. स्मिता ढबू यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. एम. एल. चौगुले म्हणाले, रवळनाथने स्थापनेपासूनच सहकारातून सहकार्य आणि समाजकार्य असे धोरण ठेवले आहे. बँकिंग व्यवसायामध्येही मोबाईल बँकिंग, सी. बी. एस. याद्वारे डिजीटल सेवा दिली जाते. तसेच RTGS/NEFT सुविधा, वीज बीलभरणा यासह पेन्शनधारक व जेष्ठ नागरिक तसेच गंभीर आजारी व वयोवृध्द ग्राहकांना घरपोच सेवा सुरु आहे. त्यामुळे संस्थेची गेल्या २९ वर्षांची वाटचाल यशस्वी झाली आहे.

प्रारंभी डॉ. डॉ. श्री. शैलेश ढबू व डॉ. सौ. स्मिता ढबू या उभयतांच्या शुभहस्ते विधीवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी रवळनाथचे सीईओ श्री. डी. के. मायदेव यांनी स्वागत केले. उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे यांनी प्रास्ताविक केले. सीमा माने यांनी सुत्रसंचलन केले. संचालक प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास संचालक डॉ. संजय चौगुले, श्री. महेश मजती, प्रा. डॉ. मनोहर पुजारी, प्राचार्य एस. एन. देसाई, सौ. रेखा पोतदार, ज्ञानदीप प्रबोधिनीचे सचिव श्री. संदीप कागवाडे, श्री. बाबासाहेब आजरी, डॉ. समिधा चौगुले, प्रा. मनोहर गुरबे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हत्तीचा वावर आणि पावसाचा दणका
शिरसंगी येथील भात उत्पादक शेतकरी जेरीस


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शेती पिकामध्ये तर ठोकून बसलेला हत्ती काही केल्या तळ हलवत नसतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शिरसंगी येथील भात पिकांचे मोठे नुकसान सुरू आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी वर्ग हातबल झाला असून हातात तोंडाशी आलेले भात वाया जात असताना पाहण्याची वेळ आली आहे.

गेले कांही दिवस हत्तीने शिरसंगी येथील शिवारांमध्ये मुक्काम ठोकला आहे. हत्तीच्या वावराने पोसावलेले भात पीक आडवे होऊ लागले आहे. वारंवार हत्तीचे येणे व वावरणे यामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक वाया जात आहे. गेले दोन दिवस पावसानेही हजेरी लावली आहे. आडवे झालेले भात पीक व त्यावर पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्याचे मेहनत वाया जात आहे. बाबुराव बुडके या शेतकऱ्याचे तर मोठे नुकसान झाले आहे.

वनविभागाने हत्ती हाकारा टीमच्या मतीने या भागातून हत्ती हुसकावून लावावा अशी मागणीही पुढे येत आहे.

‘ पार्वती-शंकरच्या दोन विद्यार्थिनींची शासकीय योगा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ‘

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट आणि पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेच्या विद्यामंदिर व विद्यालयातील कु. स्वरा विक्रम गोडसे इ.६ वी व कु. नव्या विनायक देवर्डे इ.८वी या दोन विद्यार्थिनींची शासकीय योगासन स्पर्धेत विभागीय स्तरावर रिदमिक पेअर या प्रकारात प्रथम क्रमांकाने राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.नुकत्याच इचलकरंजी येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत या विद्यार्थिनींनी चमकदार आकर्षक सादरीकरण करून वरील प्रकारात सुवर्णपदक मिळवले. याशिवाय आर्टिस्टिक पेअर प्रकारातही द्वितीय क्रमांक घेऊन रौप्य पदकाच्या त्या मानकरी ठरल्या. कु.नव्या विनायक देवर्डे हिने वैयक्तिक योगा प्रकारात ब्राँझ पदक मिळवून तीन पदकांची कमाई तिने केली.

छायावृत्त…

‍ आजरा व पेरणोली येथे दीपावली पाडव्यानिमित्त भाविकांच्या उपस्थितीत डोक्यावरील आरतीच्या कार्यक्रम पार पडला.

 

संबंधित पोस्ट

पेदात गोम्स यांचे निधन… शिवजयंतीनिमित्त होणार महिलांच्या लेझीम स्पर्धा… तर सर्फनाला धरणाचे काम १४ फेब्रुवारी पासून बंद करणार… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

महाविद्यालयीन तरुणीची इटे येथे आत्महत्या…

mrityunjay mahanews

स्वामी विवेकानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!