

हरपवडे येथे टँक्टर ट्राँलीतील गवत जळून खाक गवताच्या ४०
भा-यासहीत ट्राँलीचे ४० हजाराचे नूकसान

आजरा : प्रतिनिधी
हरपवडे ता. आजरा येथे ट्रँक्टर ट्राँलीमधून गवत आणत आसताना अचानक झालेल्या विजेच्या शाँर्ट सर्किटमूळे गवताला आग लागून ट्रँक्टर ट्राँलीसहीत ४० हजाराचे नूकसान झाले.
याबाबत अधिक माहीती अशी,हरपवडे येथील धाटोंब्याचे कोंडार नावाच्या शेतातून पेरणोली येथील पांडूरंग शंकर देसाई यांच्या मालकिचे गवताचे भारे माजी सरपंच दिनकर कांबळे घेऊन येत होते.ट्रँक्टर ट्राँलीमधून मालक सयाजी देसाई भारे घेऊन येत असताना हरपवडे येथील पेरणोलीचे राजेंद्र सावंत यांच्या शेतात ट्राँली आल्यानंतर भा-यांना विजेचे शाँर्ट शर्किट होऊन अचानक आग लागली.
या आगीत ४० भारे जळून खाक झाले.यामध्ये ट्राँलीचेही नूकसान झाले आहे.दरम्यान तात्काळ हरपवडे ,पेरणोली येथील तरूण व ग्रामस्थांनी धाव घेतल्याने ट्रँक्टरला आग लागण्यापासून वाचल्याने पुढील अनर्थ टळला.



तालुक्यातून दोन तरुणी बेपत्ता

आजरा:प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील धनगरमोळा व लाकूडवाडी येथील दोन तरुणी बेपत्ता झाल्याची वर्दी आजरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
धनगरमोळा येथील २३ वर्षीय तरुणी दि.२२ रोजी कॉलेजला जातो म्हणून घरातून बाहेर पडली ते अद्याप परत आलेली नाही.
लाकूडवाडी येथील १८ वर्षीय तरुणी कामानिमित्त महागाव येथे जातो म्हणून घरातून बाहेर गेली ती अद्याप परतलेली नाही.
दोन्हीही मुलींची बेपत्ता वर्दी आजरा पोलीस ठाण्यात पालकांकडून देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.



गवत चोरीप्रकरणी गुन्हा नोंद

आजरा : प्रतिनिधी
आरदाळ ता.आजरा येथील गट नंबर ३५३ व ३६३ मधील सुमारे दहा हजार रुपये किंमतीचे गवत चोरीला गेले असल्याचे फिर्याद सौ.सुचिता सुभाष गोईलकर ( रा. बारामपुर, वसई वेस्ट, सध्या रा. भादवण ता. आजरा) यांनी पोलिसात दिली आहे.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.



‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार संजय महल्ले यांना प्रदान

आजरा : प्रतिनिधी
चांगले व संस्कारक्षम वाचक घडविण्यासाठी आजऱ्यातील गंगामाई वाचन मंदीरची चळवळ समाजोपयोगी आहे. विविध साहित्य पुरस्कार देऊन समाजाच्या कल्याणासाठी सुरू असलेले प्रयत्न यापुढेही अखंडपणे सुरू राहावेत असे प्रतिपादन ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्या कन्या ज्येष्ठ लेखिका पारू नाईक यांनी केले.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या ‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजी सावंत उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार संजय महल्ले यांना देऊन गौरवण्यात आले. यावेळी इतर पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.अशोक बाचुळकर होते.
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार अमरावतीचे संजय महल्ले, दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार पालघरचे सुनील जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्य साहित्य पुरस्कार चंदगडचे डॉ. गोपाळ गावडे, बालसाहित्य पुरस्कार नागपूरच्या डॉ.वसुधा वैद्य, मैत्र काव्य पुरस्कार जळगावचे शशिकांत हिंगोणेकर तर भूमिपुत्र साहित्यिक गौरव पुरस्कार आजऱ्याचे डॉ. शिवशंकर उपासे यांना पारू नाईक यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, ग्रंथ भेट व रोख पाच हजार रुपये रक्कम देऊन करण्यात आले.
माता गौरव पुरस्कार खानापूरच्या शोभा जाधव, काशिनाथ चराटी उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार वारणानगरचे शारदा वाचन मंदिर, माधवराव देशपांडे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार चंदगडचे सर्वोदय वाचनालय, बळीरामजी देसाई उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार चाफवडेचे अक्षय सार्वजनिक वाचनालय यांना देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट बालवाचक आदिती भातकांडे, अभ्यासिका वाचक अनिल होलम, महिला वाचक जया आपटे, पुरुष वाचक भिमराव पुंडपळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय महल्ले, सुनील जाधव, डॉ.वसुधा वैद्य, डॉ. गोपाळ गावडे, डॉ. शिवशंकर उपासे, शशिकांत हिंगोणेकर, भीमराव पुंडपळ, बाबासाहेब कावळे यांनी मनोगत व्यक्त केले.
हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या संगमावर आजरा तर ताम्रपर्णी व घटप्रभा नदीच्या काठावर कोवाड वसलेले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा ऋणानुबंध व आजऱ्याचे ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत तर कोवाडचे ‘स्वामी’कार रणजीत देसाई यांनी जपला आहे. ते यापुढील काळातही वाचन चळवळीतून वृद्धिंगत करूया असेही आवाहन जेष्ठ लेखिका पारू नाईक यांनी केले.
कार्यक्रमास गंगामाई वाचन मंदिरचे सर्व संचालक व आजऱ्यातील नागरिक उपस्थित होते.
निधन वार्ता
सौ.पद्मावती पाटील

‘गोडसाखर’चे माजी संचालक आणि जनता दलाचे माजी अध्यक्ष बी.टी. पाटील यांच्या सुविद्य पत्नी आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मातोश्री सौ.पद्मावती भिंमगोंडा पाटील (गिजवणे, वय ७२) यांचे आज अल्पश: आजारांने निधन झाले.अंत्यविधी सकाळी नऊ वाजता गिजवणे येथे आहे.






