


उचंगी प्रकल्पातील जलसाठ्याचा आज पाणी पूजन समारंभ
माजी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व माजी ग्रामविकासमंत्री हसनसो मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती
गेल्या वीस वर्षापासून तारओहोळ खोर्यातील शेतकर्यांचे अपुरे असणारे उचंगी प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असून आज (शुक्रवारी ) या प्रकल्पातील जलसाठय़ाचा पाणी पूजन समारंभ राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडत आहे.
गेली वीस वर्षे हा प्रकल्प पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू होते. गतसाली प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पाबाबत सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर यावर्षी पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
चंदगड- गडहिंग्लज चे तत्कालीन आमदार व माजी विधानसभा सभापती के. बाबासाहेब कुपेकर, माजी आमदार नरसिंगराव पाटील , विद्यमान खासदार संजय मंडलिक विद्यमान आमदार राजेश पाटील, यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आजरा तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, रामाप्पा करीगार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सुधीरभाऊ देसाई,भिकूमामा गावडे, बाबासाहेब पाटील, एम. के. देसाई ,सौ. रचनात्मक होलम,दिपकराव जाधव यांच्यासह तालुक्यातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमास हजर रहाणार आहेत.

चितळे येथे 43 हजार 750 रुपयांचा बेकायदेशीर धान्य साठा पकडला
पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

चितळे (तालुका आजरा) येथे रास्त भाव धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना वाटपासाठी आलेले धान्य बेकायदेशीररित्या विक्रीच्या दृष्टीने साठा करून ठेवल्या प्रकरणी आजरा पोलिसांनी शिवाजी तुकाराम खवरे, दशरथ तुकाराम खवरे यांच्यासह पाच जणांविरोधात पुन्हा नोंद करून त्यांच्याकडून अकरा पोती गहू व 20 पोती तांदूळ ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चितळे येथे रास्त भाव धान्य दुकानातून विक्रीसाठी आलेले धान्य हे खाजगी व्यापारी, हॉटेल व्यवसायिक यांच्यासह संबंधितांचया मित्रपरिवाराला वाटप केले जात असल्याच्या तक्रारी गेले काही दिवस होत होत्या. यामुळे शिधापत्रिकाधारकांना कमी प्रमाणात धान्य मिळत होते. मंगळवारी रात्री स्थानिक नागरिकांनी पाळत ठेवून सुमारे एकवीस पोती धान्य साठा करून ठेवल्याचे शोधून काढले व तातडीने त्यांनी पोलिसांची व पुरवठा विभागाशी संबंधित संपर्क साधला. पोलिसांनी मनोज कौतिक दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संबंधिताविरोधात गुन्हा नोंद करून सदर धान्य ताब्यात घेतले आहे.

निधन सुनिता : सौ.सुनीता सुतार

आजरा येथील ज्येष्ठ चित्रकार,मूर्तिकार , कलाकार व व्यंकटराव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बाबुराव (बी.टी.) सुतार यांच्या पत्नी सौ. सुनिता बाबुराव सुतार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुली ,आप्पा, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


NMMS परीक्षेत आजरा हायस्कूलचे यश

येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा च्या विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत घवघवीत यश संपादन केले ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना या नावाने शासनाच्या वतीने घेतली जाते या परीक्षेत आजरा हायस्कूल आजरा चे एकूण 80विद्यर्थी बसले होते तर 68विद्यर्थी उत्तीर्ण झाले असून तब्बल 20विदयार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत विभाग प्रमुख एन. आर. कांबळे,एन. बी. पाटील,आर. पी. केसरकर , बी. पी. पाटील, एम. एन. कांबळे या विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले.



गेल्या वीस वर्षापासून तारओहोळ खोर्यातील शेतकर्यांचे अपुरे असणारे उचंगी प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असून आज (शुक्रवारी ) या प्रकल्पातील जलसाठय़ाचा पाणी पूजन समारंभ राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडत आहे.