
संकेश्वर -बांदा रस्त्याचे काम रोखण्यासाठी मशिनरीना बांधली जनावरे
खेडे व मडीलगे येथील शेतकरी आक्रमक
शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांची बैठक
संकेश्वर- आजरा-आंबोली – बांदा या राष्ट्रीय महामार्गबाधित शेतकऱ्यांनी खेडे येथे सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडले. शेतकऱ्यांनी आपली जनावरे मशिनरीला बांधून दिवसभर काम करण्यास विरोध दर्शवला. याप्रकरणी पोलिसांनी पाच शेतकऱ्यांना ताब्यात देखील घेतले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने आजरा- भुदरगडच्या उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी शुक्रवारी संबंधित शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे महामार्गाला आपला विरोध नाही. मात्र, महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या जमिनीचा सर्व्हे झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून दिल्या पाहिजेत. शासनाचा २०१३ च्या भूमिअधिग्रहण कायद्याप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रमाणे अथवा रेडिरेकनरच्या पाचपटीने नुकसानभरपाई मिळावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
काम बंद केल्याचे समजताच पुन्हा सुरू करण्याबाबत तहसीलदार विकास अहिर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, राष्ट्रीय महामार्गचे कनिष्ठ अभियंता अनिल पाटील, मदन फडतरे यांची चर्चा झाली त्यानंतर संबंधित आंदोलकांवर कारवाईच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पत्रानंतर कामात अडथळा न आणण्याच्या सूचनेबरोबरच शुक्रवारी बैठकीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावेळी शिवाजी इंगळे, शिवाजी गुरव, दत्तात्रय नेसकर, बाळू चव्हाण, रवी जाधव, श्रीपती पाटील,विष्णू पालकर, दशरथ मोरे, महंमद पठाण, बाळू पाटील, विष्णू कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होत
राज्यात काजू पीक विकास योजना लागू करणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय …आजरा तालुक्याचा समावेश

राज्यात काजू पीक विकास योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या १३ डिसेंबर रोजी च्या बैठकीत घेण्यात आला आहे.संपूर्ण कोकणासह कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आजरा तालुक्यात सदर योजना राबविण्यात येणार आहे.
पाच वर्षासाठी ११७५ कोटी रुपयांची तरतूद याकरिता करण्यात आली आहे. कृषी, पणन, सहकार हे तीन विभाग मिळून ही योजना राबवणार असून यामध्ये रोपवाटिका सुविधा निर्माण करणे, काजू उत्पादकात वाढ करणे, काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योगांना चालना देणे व त्याकरिता अर्थसहाय्य करणे, प्रक्रिया मार्केटिंग आणि रोजगार निर्मिती यासाठी सदर योजना प्राधान्य देणार आहे
अशा आहेत आजरा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाच्या लढती…
१.सरंबळवाडी
( अनुसूचित जाती स्त्री राखीव)
मंगल मारुती कांबळे
सुनीता मारुती कांबळे…
२.कानोली
(सर्वसाधारण स्त्री राखीव)
सुप्रिया ज्योतिबा पाटील
सुषमा सुभाष पाटील
मनीषा संतोष रेडेकर…
३.खेडे- मुंगूसवाडी
(सर्वसाधारण प्रवर्ग )
संदीप बाबुराव देशपांडे
सुनील कृष्णा पाटील…
४.लाकूडवाडी
(सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग)
जयश्री धोंडीबा गिलबिले नंदाताई हिराचंद गिलबिले रूपाली अमर मोरे
…
५.पेंढारवाडी
(सर्वसाधारण स्त्री)
कविता रामदास आजगेकर
सिंधुताई रामचंद्र आजगेकर
….
६.मासेवाडी
( सर्वसाधारण प्रवर्ग)
पांडू शंकर तोरगले
संजीवनी सुदाम सावर्डे…
७.दाभिल
(सर्वसाधारण प्रवर्ग)
अनिल लक्ष्मण नार्वेकर
युवराज दत्तू पाटील…
८.सुळेरान
(अनुसूचित जाती प्रवर्ग)
शशिकांत बाळकू कांबळे
देविदास कृष्णा सूर्यवंशी
शाहू कृष्णा सूर्यवंशी…
९.कोरिवडे
(नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव)
शिवाजी गणपती पाटील
संतोष शामराव पाटील…
१०.किटवडे
(सर्वसाधारण प्रवर्ग)
सहदेव सखाराम कांबळे
लहू रामचंद्र वाकर
श्रीधर रामचंद्र सावंत
सिताराम लक्ष्मण पाटील…
११.चितळे
(सर्वसाधारण महिला प्रवर्ग)
विजया विजय नेवरेकर
रत्नप्रभा आनंदा भातुर्ले…
१२.वझरे
(नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव)
वैशाली दयानंद इंगळे
लता निलेश गुरव
शांताबाई रामचंद्र गुरव…
१३.सोहाळे- बाची
( नागरिकांचा मागास स्त्री राखीव प्रवर्ग)
कल्पना प्रकाश गुरव
भारती कृष्णा डेळेकर…
१४.हाजगोळी बुद्रुक
(सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्ग)
सवीता सुनील जाधव
सुप्रिया पवन होडगे…
१५.खानापूर
(सर्वसाधारण महिला राखीव )
प्रभावती नामदेव गुरव
कल्पना रामचंद्र डोंगरे…
१६.कोळींद्रे
( सर्वसाधारण महिला राखीव)
शीला आनंदराव पाटील
रेखा शिवाजी जाधव
वंदना सुभाष सावंत…
१७.वडकशीवाले
(अनुसूचित जाती महिला राखीव)
मयुरी मारुती कांबळे
सविता सागर कांबळे…
१८.भादवणवाडी (सर्वसाधारण प्रवर्ग)
महादेव संभाजी दिवेकर
राजाराम बाळकृष्ण पाटील
सुरेश परशूराम मगदूम
…
१९.झुलपेवाडी
( नागरिकांचा मागास प्रवर्ग)
प्रतापसिंह पांडुरंग अस्वले
अर्चना विजय सुतार
…
२०.धामणे
(अनुसूचित जाती महिला राखीव)
पूजा अमोल कांबळे
प्रियांका विनायक घोडगे
माया अशोक माने
…
२१.बहिरेवाडी
(सर्वसाधारण महिला राखीव)
अर्चना शिवानंद गडकरी
रत्नजा प्रल्हाद सावंत
…
२२.शेळप
(नागरिकांचा मागास प्रवर्ग)
शंकर भीमा गुरव
अर्जुन रामा बागडी
…
२३.होण्याळी
(सर्वसाधारण महिला राखीव)
स्मिता काशिनाथ तेली
स्मिता नामदेव पाटील
…
२४.उत्तूर
( नागरिकांचा मागास प्रवर्ग)
किरण शंकर अमनगी
विठ्ठल महादेव उत्तुरकर
प्रकाश कृष्णा कुंभार
धोंडीराम भीमा सावंत
…
२५.मडीलगे
( सर्वसाधारण प्रवर्ग)
आनंदा कृष्णा घाटगे
बापू भीमराव नेउंगरे
कृष्णा विठोबा येसणे
मारुती ज्ञानबा येसणे
…
२६.भादवण
(सर्वसाधारण महिला प्रवर्ग)
जयश्री गजानन गाडे
माधुरी रणजीत गाडे
छाया जयंत देसाई
…
२७ हाजगोळी खुर्द
( सर्वसाधारण प्रवर्ग)
धनंजय मारुती जाधव
कुंडलिक संभाजीपाटील
…
२८.साळगाव
(सर्वसाधारण प्रवर्ग)
विलास लक्ष्मण दोरुगडे
धनंजय मनोहर पाटील
मारुती लक्ष्मण पारखे
संदेश बाबुराव लोहार
…
२९.गजरगाव
(अनुसूचित जाती प्रवर्ग)
आनंदा रवळू कांबळे उदय मारुती कांबळे संजयकुमार आत्माराम कांबळे
तानाजी बंडू दावणे
…
३०.आरदाळ
(सर्वसाधारण महिला राखीव)
रूपाली सूर्यकांत पाटील
गीता विजय वागणेकर
…
३१.शृंगारवाडी-उचंगी
(सर्वसाधारण प्रवर्ग )
समीर पांडुरंग देसाई
सुरेश आप्पा चौगुले
…
(एकूण उमेदवार संख्या-८०







