


तुम्ही पाठीशी रहा..
कारखाना सक्षमपणे चालवू : अशोकअण्णा चराटी यांचे ‘आजरा ‘ च्या कर्मचाऱ्यांना आवाहन

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखान्याच्या वाटचालीत कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान आहे. कर्मचारी वर्गाने आपल्या पाठीशी रहावे कारखाना सक्षमपणे चालवूया असे आवाहन अण्णा-भाऊ संस्था समूह प्रमुख व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केले. ते आजरा साखर कारखान्याच्या कर्मचारी वर्गाच्या बैठकीत बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अशोकअण्णा चराटी म्हणाले, राज्यात व केंद्रात सत्ता असल्याशिवाय कारखान्याची चाके फिरती ठेवणे शक्य नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून एखादे मोठे आर्थिक पॅकेज आणण्याबरोबरच कारखान्याकरीता डीस्टीलरी प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी सांगितले.
संचालक दिगंबर देसाई यांनी गेल्या पाच वर्षातील कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेतला.
जयवंतराव शिंपी म्हणाले, कारखाना निवडणुकीत अशोकअण्णा चराटी व आपण एकत्र रहाणार आहोत. कामगार वर्गाने सहकार्य केल्यास कारखान्याची निवडणूक जिंकणे फारसे अवघड नाही. सत्तेवर आल्यानंतर कारखान्याच्या कामगारांची थकीत देणी देण्यास आपण बांधील आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय पाटील म्हणाले, कारखान्यातील बेरिंग चोरी प्रकरणावर आम्ही आवाज उठवला. आमच्या रेट्यामुळे अध्यक्ष व संचालक मंडळांनी फिर्यादी दाखल केल्या परंतु जे या प्रकरणात गुंतले आहेत त्या मंडळींना पुन्हा कामावर घेण्यात आले. असाच प्रकार साखर वाहतुकीच्या वेळीही उघडकीस आला याची जबाबदारी चालकावर निश्चित करून त्याला पाच हजार रुपयांचा दंड केला. असे प्रकार जर परत परत घडत असतील तर सभासदांनी नोंद घेण्याची गरज आहे.इतरत्र पदे भूषविणा-या व पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या मंडळींनी आता कारखान्यापासून बाजूला व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.
स्वाभिमानीचे संचालक तानाजी देसाई म्हणाले, कारखान्याचा एकंदर कारभार हा अभ्यासू सभासदाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. यावर आपण आवाज उठवला परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
यावेळी आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी,सुरेश डांग, संचालक मलीककुमार बुरुड, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, विलास नाईक,जी.एम.पाटील, किरण कांबळे, अभिषेक शिंपी, राजू जाधव, सहदेव नेवगे, बयाजी मिसाळ,विश्वास कांबळे,अशोक जाधव,भिकाजी गुरव,संदीप कांबळे यांच्यासह मान्यवर व आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.



आज-यात आज साखळी उपोषण

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्याला आजरा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला असून यासाठी आज सोमवार (ता.३०) रोजी आजरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाणार आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत उपोषण केले जाईल. तालुक्यातील सर्वच गावातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपोषणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देवून पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देण्यासाठी आपण शासनाला कळवावे अशी विनंती तहसीलदाराना करण्यात येणार आहे.



वाटंगीतील ठिणगीचे जिल्हाभरात वणव्यात रूपांतर ..

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
रविवारी वाटंगी (ता.आजरा ) येथील जल जीवन योजनेअंतर्गत सुरू होणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन करण्यापासून मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांना रोखल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभर उमटू लागले असून जिल्ह्यातील अनेक गावांनी राजकीय नेते मंडळींना गावात प्रवेश बंदीचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे.

रविवारी वाटंगी खासदार व आमदारांना रोखण्याबरोबरच त्यांच्या गाडीखाली आडवे जाण्याचा प्रयत्न मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला. सुदैवाने पोलिसांनी हा प्रयत्न वेळीच रोखला.

वृत्तवाहिन्यांवरून सदरची बातमी प्रसिद्ध होताच जिल्हाभर याचे पडसाद उमटू लागले आहेत. आजरा तालुक्यातील बहुतांशी गावांनी आता मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय नेतेमंडळीला गावात प्रवेश नाही अशा आशयाचे फलक गावाच्या वेशीवर लावण्यास सुरुवात केली आहे. तर जिल्हाभर विविध प्रकारची आंदोलने करून मराठा आरक्षण प्रश्नाला धार आणली जात आहे.
नेतेमंडळींच्या नियोजित कार्यक्रमांबाबत संभ्रमावस्था
जिल्हाभरामध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसह साखर कारखाना व सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार – खासदारांसह मंत्री महोदय यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु मराठा समाज आक्रमक झाल्याने या कार्यक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.



‘ प्रयोगशील शेतकरी म्हणजे शास्त्रज्ञच” : जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आर. आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार अभियान अंतर्गत, आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आजरा तालुक्यातील खानापुर या गावाची प्रत्यक्ष पाहणी केली.
दुर्गम खेड्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणजे कृषी विद्यापीठातील एक शास्त्रज्ञच” असे यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.
कृषी पदवीधर असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यानी प्रयोगशील शेतकरी रामदास पाटील यांच्या शेतीस भेट दिली. या शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वी १८ गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या विदेशी फळभाजी पिक ” झुकिणी” विषयी सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. हा शेतकरी वर्षभरात त्याच्या ०३ एकर शेती मध्ये रोटेशनप्रमाणे अन्नधान्ये, भाजीपाला, फळपिकांची लगवड करत असतो. त्याने आत्तापर्यंत कलिंगड, स्ट्रॉबेरी, हळद इ. पिकांची यशस्वी लागवड केली आहे. सद्या लागवड केलेल्या झुकिणी ची फळे दररोज मुंबई येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवीत असल्याचे त्यांनी सांगितले.ही शेती फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर पाटील यांनी ग्रामपंचायत कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर गावामध्ये प्रत्यक्ष पाहणी करुन व माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गट विकास अधिकारी सुभाष सावंत, सहायक गट विकास अधिकारी दिनेश शेटे, उपअभियंता पी.डी.माने, श्री.सूर्यकांत नाईक, सरपंच सौ.कल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे, ग्रा प सदस्य श्री.विश्वास जाधव,माधुरी गुरव,अलका चव्हाण,सुशीला जाधव, सीताबाई दोरुगडे,धनाजी डोंगरे, ग्रामसेवक विशाल दुंडगेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




ग्रामपंचायत बुरुडे – दुरंगी लढत
🟣अशी आहे लढत🟣
◼️◼️◼️प्रभाग १.
भवेश्वरी हनुमान परिवर्तन ग्रामविकास आघाडी
◾विलास अर्जुन बागवे
◾सारिका विजयसिंह कांबळे
◾सुनीता बबन होण्याळकर
विरुद्ध
श्री भावेश्र्वरी जांभूळदेव विकास आघाडी
◾धोंडीबा गोपाळ होण्याळकर
◾सौ.विजया सुरेश कांबळे
◾सौ.पद्मजा पांडुरंग बागवे
◼️◼️◼️प्रभाग २
भावेश्वरी हनुमान परिवर्तन ग्रामविकास आघाडी
◾सुनील रामचंद्र बागवे
◾सौ.मानसी मंदार पेंडसे
विरुद्ध
श्री भावेश्र्वरी जांभूळदेव विकास आघाडी
◾महेश राऊ कांबळे
◾सौ शेवंता आनंदा तेंडुलकर
◼️◼️◼️प्रभाग ३
भावेश्वरी हनुमान परिवर्तन ग्रामविकास आघाडी
◾संजय अण्णा कांबळे
◾सौ.मनिषा मच्छिंद्रनाथ तेंडुलकर
विरुद्ध
श्री भावेश्र्वरी जांभूळदेव विकास आघाडी
◾दशरथ रामचंद्र कांबळे
◾सौ.शेवंता आनंदा तेंडुलकर
🟣🟣सरपंच लढत…
◾सौ.वैशाली नेताजी गुरव
भावेश्वरी हनुमान परिवर्तन ग्रामविकास आघाडी
विरुद्ध
◾सौ.ज्योती दिनकर जोशिलाकर
श्री भावेश्र्वरी जांभूळदेव विकास आघाडी


आज शहरात…
स्व. बाबुरावजी कुंभार यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त खा. धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुकुंदराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांना कार्य गौरव पुरस्कार वितरण
स्थळ : श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर
वेळ : सकाळी १०.३० वाजता




