बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२४

के. पी. साहेब दहा वर्षे तुम्ही काय केले ? कुठे होता ?
आम.प्रकाश आबिटकर यांचा सवाल

राधानगरी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सलग दहा वर्षे विश्वासाने तुम्हाला जनतेने सत्ता दिली होती . या दहा वर्षाच्या कालावधीत आपण कोणती विकास कामे केलीत. केवळ गोड बोलून वेळ मारून नेण्यापलीकडे आपले कर्तृत्व काय ? दहा वर्षे तुम्ही कुठे होता ? असा सवाल आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के.पी. पाटील यांना केला आहे. समाजाशी कोणतेही देणे-घेणे नाही. निवडणूक आली की सोयीनुसार एखाद्या पक्षाचा स्वतःवर शिक्का मारून घ्यायचा आणि केवळ मते मागण्यासाठी लोकांच्याकडे जाऊन बुद्धिभेद करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायचा त्यांचा नेहमीचाच उद्योग आहे. हे उद्योग आता बंद करा असेही आमदार आबिटकर म्हणाले.
निष्क्रीय उमेदवार के.पी.पाटील यांनी आमदार असताना काय दिवे लावलेत ? हे राधानगरी विधानसभा मतदार संघातील स्वाभिमानी जनतेला चांगलेच माहीत आहे. के.पी. पाटील यांनी मतदार संघाचे कागल करतो असे वारंवार सांगून तोंडाची वाफ घालवली पण त्यांनी १० वर्षाचा कार्यकाळात लबाडी करण्यात घालवला.
मी माझ्या आमदारकीच्या मागील १० वर्षात मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉक भरुन काढला. राज्यातील सर्वोत्तम मतदार संघ करण्यासाठी प्रयत्न केला. उत्कृष्ठ संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवणारा मी कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार हा तुमचा आमदार आहे. यापुढे देखील मतदार संघाचे अविरतपणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून मला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील ठिकपुर्ली, चांदेकरवाडी, चंद्रे, माजगांव, पालकरवाडी, शेळेवाडी, कसबा वाळवे आदी गावांचा दौरा केला. यावेळी उपस्थित नागरीक, कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांशी संवाद साधला.

घराणेशाहीसाठी नाही तर कामाच्या जोरावर समाजकारणासाठी उमेदवारी : डॉ .नंदाताई बाभुळकर

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घराणेशाहीचा आपल्यावर होत असणारा आरोपात चुकीचा आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचा संपन्न वारसा आपणाला असून गेली नऊ ते दहा वर्षे या मतदारसंघांमध्ये सक्रिय आहे. मतदारसंघांमध्ये ठोकशाही व गुंड प्रवृत्तीचा बिमोड करून पुढची पाच वर्षे सुरक्षित करण्यासाठी आपणाला निवडून द्यावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी केले. चंदगड विधानसभा मतदारसंघातील नूल परिसरामध्ये आयोजित प्रचार दौऱ्यामध्ये त्या बोलत होत्या. नूल जिल्हा परिषद मतदार संघातील त्यांच्या प्रचार दौऱ्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
घराणेशाहीचा आरोप हा चुकीचा असून आपली उमेदवारी ही केवळ बाबांची पुण्याई म्हणावी लागेल. प्रत्येक गावात विकास कामाच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचलो आहोत. आपण केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर मतदारासमोर जात आहे. आपले या मातीशी ऋणानुबंध आहेत. आतापर्यंतच्या आयुष्य हे कुटुंबासाठी घालवले परंतु या पुढचे आयुष्य आपणाला समाजकार्यासाठी घालवायचे आहे. मतदारसंघात स्वतःचे एक सुसज्ज हॉस्पिटल उभा करून उर्वरित आयुष्य मतदारसंघात घालवायचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे दौऱ्यात सहभागी झाले होते.

उत्तूर जि.प. मधून मंत्री मुश्रीफ यांना मताधिक्य देण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कागल- गडहिंग्लज- उत्तूर विधानसभा मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्यतो अशी विकास कामे मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून झाली आहेत. महायुती धर्म पाळण्याबरोबरच कर्तव्य भावनेतून मंत्री मुश्रीफ यांना घसघशीत मताधिक्य देण्याचा निर्धार उत्तूर येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.
महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांचे प्रचारार्थ आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघामधील उत्तूर मध्ये भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती .
महाराष्ट्रात पुन्हा एक वेळ भाजपाचे सरकार आणण्यासाठी मंत्री मुश्रीफ हे विजयी होणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे तअसे आवाहन यावेळी सुधीर कुंभार यांनी केले.
या बैठकीस अरुण देसाई,उदयराज चव्हाण, संजय सांबरेकर, श्रीपती यादव तसेच उत्तूर जि.प.मधिल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वाभिमानी मंडळी सोबत असल्यामुळे आपला विजय निश्चित :अप्पी पाटील

नूल : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
समविचारी स्वाभिमानी मंडळी आपल्या सोबत आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये निसटत्या मतांनी आपणाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मात्र मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने आपला विजय निश्चित आहे असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी केले ते गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदार संघामध्ये प्रचार दौऱ्यात बोलत होते.
मतदारांनी पाटील यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले. यावेळी पाटील म्हणाले, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. यापूर्वीही मतदारांनी आपल्यावरील विश्वास वेळोवेळी सिद्ध करून दाखवला आहे.या निवडणुकीतही प्रस्थापितांना खड्यासारखे बाजूला करून मतदार आपल्या पाठीशी राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी समविचारी आघाडीची सर्व मंडळी त्यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी झाली होती.

सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार तरी कधी ?
ए.वाय.पाटील यांचा सवालआजऱ्यातील कोपरा सभेला उदंड प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राधानगरी- भुदरगड आजरा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांची आजरा येथील छत्रपती संभाजी चौकातील कोपरा सभा जनतेच्या व युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रचार फेरीला सुरवात झाली आणि छत्रपती संभाजी चौकात कोपरा सभा घेण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग दोरुगडे यांनी केले.
ए.वाय.पाटील म्हणाले,आमच्या पाठीशी जनता असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे. पाटगावचे पाणी अदानी समूहाला देण्याचे काम केले परंतु सुज्ञ जनतेने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. माझ्या हातात त्यांचा ४० हेक्टरचा आता हा सात बारा आहे. विरोधातील मंडळी एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. माझ्या पाठीशी सर्व जाती धर्माची लोकं आहेत. आपला विजय निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले.
संतोष मासोळे (बहुजन वंचित पार्टी ), दशरथ दीक्षांत (वंचित ), दीपक लोखंडे (डेमोक्रेटीक पार्टी )आदींची भाषणे झाली. यावेळी इम्रानभाई लमतुरे (संस्थापक इम्रानभाई युवा मंच आजरा ), अरिफभाई दरवाजकर व एन ए दोस्ती दरबार ग्रुपनी पाठिंबा जाहीर केल्याबद्दल त्यांचा ए. वाय. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जेष्ठ मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई दरवाजकर यांनी ए. वाय. यांचे स्वागत केले.
यावेळी सईद मुल्ला, सलाउद्दीन लाडजी, आदमभाई पटेल, तबरेज तकीलदार, साकिब पटेल, समी तकीलदार, लोमान तकीलदार,दत्तात्रय कांबळे (वंचित जिल्हा उपाध्यक्ष ), संदीप कांबळे (तालुका उपाध्यक्ष वंचित ), मिलिंद कांबळे, मोहन कांबळे, शशिकांत कांबळे, अभिजित कांबळे, बाळू कांबळे, मारुती कांबळे, लहू कांबळे, अंकुश कांबळे, सागर कांबळे,हसनआली पटेल,बशीर निजाम काकतिकर, कैफ खेडेकर, नविद इनामदार, शौकत हिंग्लजकार, जुबेर आगा, सलीम वाडीकर, अबू शेख, सर्फराज राजगुरू, अझरुद्दीन खेडेकर, भिकाजी कांबळे (वंचित बहुजन ),विजय येरंडोळकर, सहदेव कांबळे, सलीम मुल्ला, जावेद मुल्ला, काजीम पटेल, राजू शेख, आकील दरवाजकर, अझरुद्दीन खेडेकर , अनिस दरवाजकर, साद तळगुळे, जाऊल वाडीकर, समीर पटेल, अर्षद वाडीकर, अन्सार आगा अनिसशेठ, यासिन लाडजी, कैफ खतीब,साद तकीलदार, रसूल मुल्ला, बबलू पटेल अकबर पटेल, हुसेन पटेल,याबरोबर ए. वाय. प्रेमी आजरेकर व युवक प्रचंड गर्दीत उपस्थित होते.

चिंचणे सरपंच संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवाजीभाऊंना पाठिंबा

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रस्ते आणि गटर्स म्हणजे विकासकामे नव्हेत. एकीकडे तालुक्यात प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. भूमिपुत्र शहरांच्या दिशेने स्थलांतरित होत आहेत. अशावेळी तालुक्याला शिवाजीराव पाटील हे एकमेव आशेचा किरण दिसत आहेत त्यामुळे उज्वल भविष्यासाठी आपण शिवाजीभाऊ पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे चिंचणे सरपंच संतोष पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शंकर पाटील, अरुण पाटील, कृष्णा पाटील, संतोष पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, गणपती पाटील, नारायण सुतार, कल्लाप्पा नाईक, भरमु चौगुले, शामराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लाकूरवाडी येथे आमदार राजेश पाटील यांच्या प्रचार दौऱ्यास उस्फुर्त प्रतिसाद

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ज्यावेळेस भागातील जनतेला पक्के रस्ते कसे असतात हे माहीत नव्हते त्यावेळेस स्व.नरसिंगराव पाटील यांनी दौलत साखर कारखाना सुरू केला. मतदारसंघाचा विकास व्हावयाचा असेल तर आमदार राजेश पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन नामदेव निट्टूरकर यांनी केले. लाकूरवाडी तालुका चंदगड येथील आमदार राजेश पाटील यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते. या दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जनतेला पक्के रस्ते कसे असतात हे माहीत नव्हते त्यावेळेस स्व.नरसिंगराव पाटील यांनी दौलत साखर कारखाना सुरू केला आहे. त्यावेळेपासून या भागातील जनतेला नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या.चंदगड तालुका खरेदी विक्री संघ, तुलसी बाजार, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था या सर्वांच्या माध्यमातून अनेक लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत.
आमदार राजेश पाटील म्हणाले,पैशाच्या आमिषाला, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडतात काम करणाऱ्याच्या पाठीशी राहा. नको त्या लोकांच्या हाती सत्ता दिली तर तरुणाई, पुढची पिढी माफ करणार नाही. भागाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा.
यावेळी,संग्रामसिंह कुपेकर, भरमाण्णा गावडा, राजेंद्र गड्ड्यानावर, अनिल सुरूतकर, शिवाजी नवकुडकर, अभय देसाई, पवार गुरुजी, केरबा राजगोळकर, भीमराव राजगोळकर, संजय निट्टूरकर, गंगाराम कोळशेकर, विष्णू राजगोळकर आदींसह प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.



लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969


