mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजरा साखर कारखान्याचे नाव आता वसंतराव देसाईसो साखर कारखाना

                  आजरा: प्रतिनिधी

      आजरा साखर कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरीने आपल्या साखर कारखान्याचे नावात बदल करण्यात आला असून आजरा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माजी.आमदार.स्व.वसंतराव देसाईसो यांचे नाव कारखान्यास देण्याचे ठरले आहे त्यास प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्या आदेशाने मंजुरी मिळाली आहे.

      त्या नुसार आजरा साखर कारखान्याचे नाव वसंतराव देसाईसो आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर-गवसे ता. आजरा जि.कोल्हापूर असे करण्यात आले आहे.

     सभासदांची गेली कित्येक वर्षांची मागणी पूर्णत्वास लागल्याने सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.


आजरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

                    आजरा: प्रतिनिधी

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकार होणार असून हा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी नगरविकास विभागाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

     प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम देशवासीयांसाठी अस्मीता आहे. आजरा शहरामध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा अश्वारुढ करण्याची मागणी शहर वासियांसह तालुक्यातील नागरीकांच्या वतीने वारंवार होत होती. त्या मागणीच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसून परिसर सुशोभिकरण करण्याकरीता निधी मिळावा याकीरता नगरविकास विभागाकडे गेली अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश आले असून छ.शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व परिसर सुशोभिकरण करण्यासाठी नगरविकास विभागाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. हा पुतळा शहराचे वैशिष्ट्य आहे असे आपल्याला आता सांगता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न या माध्यमातून साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले आहे.


गवसे येथे कायमस्वरुपी डॉक्टर उपलब्ध करून द्या…

मनसेच्या जनहित कक्षाची मागणी


                    आजरा: प्रतिनिधी

      डॉक्टर अभावी गवसे गावच्या पंचक्रोशीतील रुग्णांची हेळसांड होत असून शासनाने तातडीने येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेच्या जनहित पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

      आजरा तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ ,दुर्गम असा तालुका असून जिल्ह्यापासून या तालुक्याचे अंतर खूप आहे. रुग्ण सेवेच्या दृष्टीने तत्कालीन राजकर्त्यांनी तालुक्यातील गवसे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आयुर्वेदिक दवाखाना मंजूर केलेला आहे. या ठिकाणी डॉक्टरसह सर्व कर्मचारी यांची पदेही मंजूर आहेत.

      गवसे या ठिकाणी मंजूर असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्याकडे एक डॉक्टर पद शासनाने भरलेले आहे. मात्र सदर पदावर कार्यरत असणारे डॉक्टर यांनी आपल्या सोईकरीता वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून आपली ऑर्डर कोल्हापूरात करून घेतली आहे. त्यामुळे गवसे व आसपासच्या गावातील गोरगरीब रुग्णांना शासनाने डॉक्टरची सुविधा उपलब्ध करुन देऊनही रुगणसेवा होत नाही. त्यामुळे गोरगरी रुणांचे हाल होत आहेत. तसेच पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी वारंवार सर्पदंश होत असतात. त्यामुळे वेळीच उपचार न झाल्याने गोरगरिबांना जीवाला मुकावे लागत आहे.

     तेंव्हा शासनाने नियुक्त केलेले अधिकारी तात्काळ गवसे याठिकाणी उपलब्ध करून द्यावेत आणि रुग्णसेवा होईल असे पहावे अन्यधा नाईलाजास्तव या ठिकाणी नेमणुक केलेल्या डॉक्टरवरती कारवाई करावी लागेल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला आहे.

याबाबत लेखी निवेदनही देण्यात आले असून निवेदनावर जिल्हा अध्यक्ष परशुराम बामणे,पुनम भादवणकर,वर्षा चव्हाण ,वर्षा पाटील,रिक्सन डिसोझा, सरपंच सौ.रेखा पाटील, देवदास शेटगे,समीर मुल्ला आदींच्या सह्या आहेत.


श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे सुगम व उपशास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन


                    आजरा: प्रतिनिधी

      श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे कै. सौ. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०१४ रोजी महिलांकरिता सुगम गायन स्पर्धा तर रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी शालेय विद्यार्थ्यांकरिता उपशास्त्रिय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

      महिलांची सुगम गायन स्पर्धा आजरा तालुका मर्यादित असून २० वर्षावरील महिलांना या स्पर्धेत भाग घेता येईल. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु ७०१, ५०१, ३०१/- रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. दिनांक ३ फेबुवारी २०२४ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता वाचनालयाच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न हाईल.

      मुलांची उपशास्त्रिय गायन स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादित असून वय वर्ष १८ पर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. इयत्ता पहिली ते सातवी व इयत्ता आठवी ते बारावी अशा दोन गटात या स्पर्धा होणार आहेत. दोन्ही गटातील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु. १०००/-, ७००/-, ५००/- रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. दिनांक ४ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी ठिक १०-३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न हाईल.

      स्पर्धकांनी आपली नावे शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०१४ पर्यंत वाचनालयाकडे नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर, उपाध्यक्षा गीता पोतदार, सहकार्यवाह विनायक आमणगी यांनी केले आहे.


आगळं-वेगळं

हात्तीवडे त्या.आजरा गावच्या सरपंच सौ. शकुंतला सुतार ,डे. सरपंच पांडूरंग पाटील व ग्रामपंचायत सदश्य य्ंनी स्वत्ः ग्रामसफाई करून संक्रांत साजरी केली.त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा प्रसंग आला.


निधन वार्ता...

सौ.मंगल कातकर


खेडे ता.आजरा येथील सौ.मंगल शंकर कातकर (वय ५५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार असून बुधवार दिनांक १७ रोजी रक्षा विसर्जन आहे.


कै.रमेश टोपले नाट्य महोत्सव

आजचा नाट्यप्रयोग

सारी रात्र 
(लेखक-बादल सरकार)

सायं.७ वाजता…
आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर


 

संबंधित पोस्ट

लव्हरला फोन …? आजऱ्यात मारामारीत दोघे जखमी… तिघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद….देवर्डे येथून तरूण बेपत्ता..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!