mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आंबेओहोळ वर धुमशान…

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर प्रकल्प ग्रस्तांचे जलसमाधी आंदोलत स्थगित


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेज बाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ प्रकल्प ता. आजरा येथे प्रकल्पग्रस्त न्याय मागण्यासाठी जलसमाधी घेण्यासाठी गेले असता पोलिसांनी जलसमाधीसाठी चाललेल्या प्रकल्पग्रस्तांना रोखले. संतप्त प्रकल्पग्रस्त व पोलिसांमध्ये यावेळी जोरदार धुमश्चक्री झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले .

     प्रकल्प एक निवाडा एक, जमिनीही एकच मग स्वेच्छा पुर्नवसन व आर्थिक पॅकेज याच्यात एवढा फरक का ? असा प्रश्न शेतक-यांना पडल्यानंतर यातील जवळ जवळ २०० लोकांनी याबाबत उच्चन्यायालय, मुंबई येथे अनेक दावे दाखल केले होते. यावर मुंबई उच्चन्यायालयाने ते प्रकल्पग्रस्त आहेत का हे तपासा व असतील तर त्यांचे ६५ टक्के रक्कम भरून घ्या असा आदेश केला असतानासुध्दा तत्कालीन जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

     तसेच याबाबत मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी अनेक बैठका घेवून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासन याबाबत कोणताच निर्णय घेण्यास तयार अथवा जबाबदारी घेत नसल्याचे स्पष्ट केले . त्यामुळे जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

      शंकर पावले, संजय येजरे, यांनी मनोगते व्यक्त केली . पाणीसाठा होऊनही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

     यावेळी पांडुरंग पाटील, जोतिबा गुरव, काशिनाथ तेली,संभाजी पाटील, शिवाजी खवरे, विलास पाटील, विश्वनाथ आजगेकर आदीसह धरण ग्रस्त उपस्थित होते .
यावेळी पाटबंधारे च्या पाटबंधारे अभियंता शिल्पा राजे मगदूम , उपभियंता दिनेश खट्टे , कनिष्ठ अभियंता गणेश खोत , शाखा अभियंता श्रींकात पाटील , प्रांताधिकारी मल्लिकार्जून खोत , तहसिलदार समीर माने आदीसह धरणग्रस्त उपस्थित होते .

पालक मंत्र्यांची शिष्टाई उपमुख्यमंत्री यांचे समवेत बैठक

धरणग्रस्त आक्रमक होत असल्याची माहिती काशिनाथ तेली यांनी मोबाईलवर पालकमंत्री मुश्रीफ यांना दिली.मंत्री मुश्रीफ यांनी पुण्याला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत बैठक.घेऊन धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवू असे सांगितल्या नंतर धरणग्रस्तांनी आंदोलन स्थगित केले. पालकमंत्र्यांच्या या शिष्टाईनंतर प्रकल्पग्रस्त थोडे शांत झाले.

आजरा आगाराचा कारभार सुधारा…
प्रवासी संघटनेची मागणी

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा आगाराकडे बसेस उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील एस.टी. महामंडळाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गासह ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आगाराने तातडीने नवीन १५ बसेस मागून घ्याव्यात व तालुक्यातील एस.टी.चे वेळापत्रक सुरळीत करावे. कोरोना कालावधीत ग्रामीण भागातील बंद झालेल्या बसलेल्या सुरू कराव्यात व आगाराचा कारभार सुधारावा यासंबंधीच्या मागण्या आजरा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने आजरा आगाराकडे करण्यात आल्या आहेत.

       याबाबतचे लेखी पत्र आगाराला देण्यात आले असून त्यावर तालुकाध्यक्ष सचिन इंदलकर,नाथ देसाई आदींच्या सह्या आहेत.

पाणी व पर्यावरणाचे संवर्धन करून ग्रामीण जीवन उंचविण्याची गरज : डॉ. दिवाकर

मलिग्रे येथे पर्यावरण संवर्धन विषयावर शिबीर

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांचा विकास करण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक अंगाने गावपातळीवर लोकसहभाग आवश्यक असून गावे विकसित करण्यासाठी सुक्ष्म नियोजन व मूल्यमापन करण्यासाठी गावातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व पर्यावरणाचे संवर्धन करून ग्रामीण जीवन उंचविण्याची गरज असल्याचे मत आय आय. टी. पवई, मुंबई येथील प्रमुख डॉ. यतिन दिवाकर यांनी व्यक्त केले. मलिग्रे येथे आयोजित शिबीरामध्ये बोलत होते. येथील मलिकार्जुन मंदिर येथे मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आजरा साखर कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर होते.

      उपस्थितांचे स्वागत करून तर्डेकर यांनी मलिग्रे गावाबरोबर आजरा तालुक्यातील गावामधील भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी आय. आय. टी. संस्थेच्या माध्यमातून या भागातील गावांना लाभ या संस्थेने द्यावा असा मनोदय व्यक्त केला. तसेच येत्या १२ ऑगस्टला डॉ. भारत पाटणकर यांच्यासोचत मलिग्रे येथे शेतीला हक्काचे बारमाही पाणी या भागाला मिळावे यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले.

     प्रस्ताविक अशोक शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. दिवाकर म्हणाले, ग्रामीण भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेतीला लागणारे पाणी असे अनेक प्रश्न असून गावपातळीवर लोकसहभागातून व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी काही टप्पे समजावून घेणे आवश्यक आहे. ते कृतीत आणण्यासाठी कागदोपत्री व्यवहार करावा त्याच्या नोंदी घेऊन पाठपुरावा करीत राहिल्यास गावचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. येथील शेतकरी युवकांना शेती संवर्धनाचरोबर उद्योजिके ज्ञान मिळाल्यास गावचा विकास होतो. त्यातून शाळा, कॉलेज, आरोग्य सेवा व वाचनालय समृद्ध होतात. यासाठी गावचे मुल्यमापन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

     अध्यक्षीय मनोगतात सरपंच गुरव यांनी गावच्या विकासासाठी अंत्यत चांगली माहिती दिली असून या महितीचा गावच्या विकासासाठी उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच सुरेखा तर्डेकर, माजी सरपंच समीर पारदे, गजानन देशपांडे, विष्णू जाधव, शिवाजी कागिनकर, केशव बुगडे, मारुती इक्के, परशराम बुगडे, चालू केंगारे, शिवाजी मगुत्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कॉ. संजय घाटगे यांनी केले तर विश्वास बुगडे यांनी आभार मानले.

आजरा हायस्कूलचे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा हायस्कूलने पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

     आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत २२ पैकी १३ विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र ठरले आहेत तर ४ विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे.

      यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे….
अक्षता विजय कांबळे – राज्यात दहावी,२७४),राजेश सुधीर पाटील – राज्यात सोळावा (२६८),गतीमा हंबीरराव आडकुरकर- राज्यात सोळावी (२६८),खादिजा शाहनवाज मुल्ला – राज्यात अठरावी(२६६)

      जिल्हा गुणवत्ता यादी-
चैत्राली शामराव पाटील,वैष्णवी युवराज पाटील,श्रावणी संभाजी पाटील,गीतांजली बबन पाटील,आर्यन अवधूत सबनीस,अनुष्का अनिल निर्मळे,आशुतोष अजितकुमार वांद्रे ,सिद्धेश महादेव गुरव,ज्ञानेश्वरी जालंदर येसणे सौ. एम. एस. शेलार ,सौ . व्ही .पी. हरेर, श्री. एस. बी. पाटील,श्री. व्ही . एन. वाशीकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी

राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थी…
अथर्व प्रकाश बडे – राज्यात ११ वा,सक्षम जयसिंग खवरे- राज्यात १५ वा,आराध्य विशाल कांबळे- राज्यात १९ वा

     जिल्हा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
श्रीराम राजेंद्र पटेकर,आरव कुंडलिक पाटील,समीक्षा गणपती पाटील,स्वरा प्रदीप चोडणकर,पराग राहुल पाटील ,आदिती रामचंद्र यादव,रोचक सर्जेराव पाटील

     श्री. ए. एस. नाईक,श्री. के. के. कांबळे, सौ. यु.डी. देसाई यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक श्री. बी. एम. दरी,उपमुख्याध्यापक – श्री. एस. पी. होलम ,
पर्यवेक्षक श्री. ए. एल. तोडकर यांचे प्रोत्साहन लाभले.

पाऊस-पाणी

आजरा मंडल मध्ये गेल्या २४ तासात ३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आंबे ओहोळ प्रकल्पामध्ये ८१ टक्के तर चित्री प्रकल्पामध्ये ६० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.उचंगी ३२.४० टक्के.


 

संबंधित पोस्ट

बैलाच्या हल्ल्यात पारपोलीत शेतकऱ्याचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रशीद पठाण म्हणजे स्वच्छ कारभाराचा ब्रँड

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हात्तीवडे येथे महिला नदीत बुडाली…?

mrityunjay mahanews

राजकीय घडामोडी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!