mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


 

महामानवास अभिवादन…

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आजऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन. आज मिरवणूक 

     आजरा येथील जयभीम तरूण मंडळाने १३ एप्रिल पासूनच विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.१३ एप्रिल रात्री पाळणा कार्यक्रम,१४ एप्रिल रोजी फोटो पूजनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता सत्यशोधक चित्रपट,१५ एप्रिल सायं.५ वाजता भव्य मिरवणूक व जेवण,१६ एप्रिल रात्री ९ वाजता ‘ माझा भीमराया एक महानायक ‘ हा सामाजिक कार्यक्रम व दि.१७ एप्रिल संध्या.८ वाजता डान्स स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.१५ एप्रिल रोजी आयोजित भव्य मिर्वणुकीमध्ये एन के लाईट्स गडहिंग्लज यांचा लेजर शो, सोहंम डॉल्बी आणि हलगी घोडा हे मुख्य आकर्षण असणार आहे असे नगरसेवक किरण कांबळे यांनी सांगितले. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आकाश कांबळे, अक्षय माळी, भूषण, मयूर, सतीश, सुशांत, गौरव, अश्विन, आखिल, रुपेश, आशुतोष, श्रीधर, सुजल तसेच भरत कांबळे हे मेहनत घेत आहेत.

प्रवाशांना पाणी व जिलेबी वाटप

     जय भीम तरुण मंडळ आजरा मार्फत आजरा बस स्थानक परिसरात प्रवासी तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष यांना पाणी तसेच जिलेबी व बिस्किटे वाटप करण्यात आले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे, सचिन कांबळे सतीश सुर्वे विशाल कांबळे, शिवाजी कांबळे, नितीन यादव आजरा व बुरुडे मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यंकटराव हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न

      येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा या प्रशालेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांची हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. शिंपी डॉ. बाबासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाचा ध्यास आणि वाचनाचे अपार वेड असल्यामुळे बालपणातील सर्व इयत्ता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतं त्यांनी मिळविलेले ज्ञान हे कायमस्वरूपी लक्षात ठेवत अनेक पदव्या भारतात आणि भारताबाहेरील विद्यापीठातून संपादन केल्या. आपण मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या अस्पृश्य समाजातील गोरगरीब जनतेला एकत्रित करून त्यांना शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण दिली. व विश्रांत परिश्रमातून सर्व जगातील संविधानांचा अभ्यास करून भारताचे एक आदर्श संविधान लिहिण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केल्याने त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माजी प्राचार्य व संचालक श्री. एस. जी. देसाई, श्री. पांडूरंग जाधव, श्री. अभिषेक शिंपी, श्री. सचिन शिंपी, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार, श्रीम.एन.ए.मोरे, श्री. एम. एम. देसाई , श्री. शिवाजी पारळे, श्री एम.ए.पाटील, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संस्कृतिक विभागाने केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी. व्ही. पाटील यांनी व आभार श्री.व्ही.एच. गवारी यांनी मानले.

गजरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात 


     गजरगाव ता. आजरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करून यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या विषयी अन्नपुर्णा कांबळे यांच्यासह प्रमुख मंडळींनी आपले विचार मांडले. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

     यावेळी सरपंच- अनिल कांबळे, उपसरपंच -महादेव पाटील, प्रकाश देसाई, गजानन कुलकर्णी, भुषण भिऊंगडे, , दशरथ कांबळे, परशुराम कांबळे, इंद्रजीत कांबळे, विठ्ठल चव्हाण, सुगंधा सावंत, अजीत कांबळे, सुरेश कांबळे, संंजय कांबळे, बाळू चव्हाण, अंजन पवार, आशा मोहन कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गव्याच्या हल्ल्यातील जखमी म्हैशीवर यशस्वी उपचार

 

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मौजे मुरुडे येथील श्री रामचंद्र धाकलु पाटील यांच्या घर परड्यात आंब्याच्या झाडाला बांधलेली म्हैशीवर हल्ला करुन गव्याने जखमी केले.

     तात्काळ घटनास्थळी वनक्षेत्रपाल आजरा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दक्षिण आजरा एस. के. निळकंठ, वनरक्षक पोळगाव पताडे ,पशुसंर्वधन अधिकारी डॉ .पी.डी.ढेकळे, डॉ.आकाश वाघमोडे यांनी पाहणी करून म्हैशीवर उपचार केले
सुदैवाने या हल्ल्यात म्हैस बचावली आहे.

श्री रवळनाथ प्रकट दिन उत्साहात


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथे रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी श्री रवळनाथ प्रकट दिन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता अभिषेक व पादुका पूजन करण्यात आले .सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी श्री रवळनाथ प्रकट सोहळा झाला. सायंकाळी स. ७ ते ७.३० या कालावधीत श्री केदार कवच पठण व त्यानंतर महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले. रवळनाथ मंदिर, आजरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      गेल्या ६ वर्षांपासून हा उत्सव सुरू असून गेल्या २ वर्षात याला मोठे स्वरूप प्राप्त होत आहे.

सुशांत पारपोलकर यांचा सत्कार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     सुशांत लक्ष्मण पारपोलकर यांची एम.पी.एस.सी.मार्फत सांखिकी अधिकारी पदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचा मराठा महासंघ आजरा तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण व गोवा राज्य समन्वयक श्री. गावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     यावेळी प्रकाश देसाई , राजेंद्र सावंत, बंडोपंत कातकर,शिवाजी पाटील यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews
error: Content is protected !!