
एसटीची धडक बसून एक जण ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रस्ता ओलांडताना एसटीची धडक बसून मडिलगे ता. आजरा येथील बाबू भाऊ येसणे (वय ६५ वर्षे) यांचा मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी…
माद्याळ येथे लग्न समारंभ आटोपून चोथ्याची खोप येथे बस स्टॉप वर येसणे थांबले होते. रस्ता ओलांडत असताना त्यांना एसटीची धडक बसून ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी,पत्नी असा परिवार आहे.


