mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दि.३१ मे २०२५       

आजरा तहसीलसमोर बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन

वन्यप्राण्यांबाबत ठोस उपाय योजनांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        वन्यप्राण्यांकडून पिकांची नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. वन्यप्राणी व माणसांचा संघर्ष ही दिवसागणिक वाढत असून वन्यप्राण्यांबाबत वनविभागाने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करीत बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने शुक्रवारी आजरा तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.

        वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिक नुकसानी बरोबरच मनुष्यहानी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या प्रश्नाबाबत ठोस उपाय योजना करण्याची मागणी वन्यविभागासह शासनाकडे वारंवार केली आहे. मात्र याकडे शासन तसेच वनविभागाचा कानाडोळा होत असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे कोल्हापूर जिल्हा प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले.

        वन्यप्राणी जंगलातून शेती आणि मानवी वसाहतीमध्ये येऊ नयेत, वनविभागाने आपले प्राणी आपल्या हद्दीतच ठेवावेत. वन्यप्राण्यांना जगंलात पाणी व चाऱ्याची उपलब्धता करून द्यावी. आजरा तालुक्यासाठी मंजूर असलेली ३० वनतळी तयार करावती, याबरोबरच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिक नुकसानीची भरपाई इरमा कायद्यानुसार बाजारभावाप्रमाणे द्यावी. वन्यप्राणी जंगलातून बाहेर येऊ नये याकरीता मोठ्या चरी खोदाव्यात व संरक्षक सौर कुंपणही करण्यात यावे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ आर्थिक मदत मिळावी. हल्यात एखादा व्यक्ती मयत झाला तर त्याच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.

       यावेळी जिल्हाध्यक्ष किरण के. के., तालुकाध्यक्ष डॉ. सुदाम हरेर, कॉ. शिवाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. वन्यप्राणी आणि माणसांमधील संघर्ष संपविण्यासाठी शासनस्तरावरून ठोस पाऊले उचलली पाहिजेत. या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येत आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले असून आगामी काळात आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

       या आंदोलनात ॲड. विद्या त्रिरत्ने, किरण केके, राहुल मोरे, अमित सुळेकर, दशरथ सोनुले, संदीप दाभिलकर, काशिनाथ मोरे, शिवाजी गुरव, मसणू सुतार, द्वारका कांबळे, नाहिदा महागोंडे, नाझिया शेख, नितीन राऊत, सूर्यकांत कांबळे, दत्तराज पाटील, इत्यादींनी सहभाग नोंदवला.

कॅश्यू मॅन्युफॅक्चुअर्स वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका कॅश्यू मॅन्युफॅक्चुअर्स वेल्फेअर असोसिएशनची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

      उपस्थित सभासदांचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष श्री. प्रकाश कोंडूसकर यांनी केले.

      आजरा तालुका असोशिएशन स्थापन होऊन तिन वर्षे झाली. यामध्ये नोंदणीकृत एकूण १७३ सभासद आहेत. तालुक्यात छोटे मोठे मिळून अंदाजे ३०० ते ३५० उद्योजक या काजू प्रक्रिया व्यवसायात आहेत. या उद्योजकांच्या अडी अडचणी, समस्या तसेच शासकीय पातळीवरील प्रश्न सोडवण्याचे काम या असोसिएशन मार्फत अगदी चोखपणे केले जात असल्याचे सांगण्यात आले. या असोसिएशन मार्फत जवळ जवळ ४५ उद्योजकांना २.५%एस. जी. एस. टी. परतावा मिळणेकामी सहकार्य केले. त्याचप्रमाणे उद्योजकांनी आपले व्यवहार जी. एस. टी. बिलानुसारच करावीत. बिलानुसार व्यवहार केला तर कायदेशीर कारवाई करणे सोयीचे होईल व फसवणूक होणार नाही असे ते म्हणाले.

      त्याचप्रमाणे परदेशी काजू बी,तयार माल खरेदी -विक्री व आयात -निर्यात संदर्भात आनंद भेसडिया यांनी मार्गदर्शन केले. तर वीज वितरण कंपनीकडून वारंवार होल्टेज कमी जादा झालेने यंत्रावर परिणाम होऊन नुकसान होते यासाठी क्रायकार्ड या कंपनीचे रिजनल मॅनेजर मानस पॉल यांनी स्टॅबिलायझचे महत्व याबाबत विशेष मार्गदर्शन केले.

      वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचन सचिव परेश पोतदार यांनी केले. याबरोबरच संचालक मंडळास असोसिएशच्या हिताचे निर्णय घेणे व पोटनियम दुरुस्तीचे अधिकार देणेची मान्यता एकमताने या सभेत मंजूर करणेत आली. यावेळी पांडुरंग जोशीलकर, अमोल मुरुकटे, दशरथ बोलके, भूषण नांदवडेकर, उत्तम सलामवाडे यांनी आपली मनोगत व्यक्त करीत असोसिएशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.सभेस विकास फळणेकर, संदीप पवार, निशांत जोशी, दयानंद देवलकर, विश्वास जाधव, सुरेश चौगले, भास्कर निकम, उद्योजक महादेव पवार, बाबुराव मांजरेकर यासह सर्व सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

कोणतीही कल्पना नाही… रस्ता खुदाई केली… मुजवणार कोण…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील शिवाजीनगर स्मशान भूमीकडे जाणारा शासकीय गोदामाशेजारील रस्ता स्थानिक रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता पाणी दुरुस्तीच्या नावाखाली जेसीबीच्या सहाय्याने खोदून तो तसाच ठेवण्याची किमया नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे. यामुळे एखादे मयत झाल्यास या मार्गावरून ते न्यायचे कसे ? खुदाईच्या पलीकडील बाजूच्या लोकांनी वाहनांची वाहतूक कशी करायची ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

      वेगवेगळे व्यवसायिक वाहतूक करता येत असल्याने वाहने अडकल्याने अडचणीत आले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी प्रथम पाणी गळती शोधण्याच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर करून खुदाई करण्यात आलेल्या रस्त्यावर तब्बल तीन महिन्यानंतर दोन दिवसापूर्वी चक्क जेसीबीच्या सहाय्याने खुदाई करण्यात आली आहे. ही खुदाई तशीच ठेवण्यात आली असल्याने आणखी किती दिवस नगरपंचायत ही खुदाई तशीच ठेवणार? असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

निधन वार्ता
चंद्राबाई आजगेकर

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पेंढारवाडी ता.आजरा येथील चंद्राबाई गणपती आजगेकर ( वय ७८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.जिल्हा शिक्षक समिती कोल्हापूर चे उपाध्यक्ष एकनाथ आजगेकर व आजरा शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुभाष आजगेकर यांच्या आई होत.

      रक्षा विसर्जन रविवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी आहे.

फोटो क्लि

महत्वाच्या हेडलाईन्स…

♦ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) नूतन अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांची एकमताने निवड

♦ आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून गुजरात पराभूत…

♦ शेअर बाजारात घसरण होऊन सेन्सेक्स १८२ अंशांनी घसरला...

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लढण्याचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात : सूर्यकांत नार्वेकर

mrityunjay mahanews

रमेश राठोडला लाच घेताना रंगेहात पकडले:महसुलमध्ये खळबळ

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

बनावट सोने ठेवून २१ लाखांचा चुना

mrityunjay mahanews
error: Content is protected !!