mrityunjaymahanews
अन्य

रामतीर्थ यात्रा अखेर रद्द

आजरा येथील रामतीर्थ यात्रा अखेर रद्द

येथील महाशिवरात्र निमित्ताने भरणारी श्री. रामतीर्थ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती आजरा नगरपंचायतीीतीीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर याचे दि. ९ जानेवारी २०२२ रोजीचा आदेशान्वये कोरोणाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दि. १, २ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री निमित्त होणारी राम तीर्थ यात्रा भरली जाणार नाही. याची सर्व भाविक भक्तांनी नागरिकांनी नोंद घ्यावी दि. २ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या धार्मिक विधी पालखी सोहळा हा केवळ ५० भाविकांच्या मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडेल तथापि रामतीर्थ परिसरामध्ये कोणतीही दुकाने विक्री स्टॉल लावण्यास परवानगी दिली जाणार नाही याची सर्व भाविकांनी नागरिकांनी व व्यापारी बंधूंनी नोंद घ्यावी असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

……….

कोरोनावर नियंत्रण… तरीही यात्रा रद्द

आजरा तालुक्यामध्ये कोरोना  रुग्णामध्ये कमालीची घट झाली असून सद्यस्थीतीत केवळ एकच रुग्ण उपचाराखाली आहे असे असतानाही रामतीर्थ यात्रेवर निर्बंध आल्याने भाविकामधून व शहरवासीयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

……….

संबंधित पोस्ट

‘छावा’ मुळे आजऱ्याच्या मातीचा सुगंध जगभर दरवळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शुक्रवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!