आंबेओहळ धरणग्रस्तांचे आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित

आज शिवजयंती असल्याने आंबेओहळचे पाणी रोखण्याचे आजचे आंदोलन मंगळवारी होणार आहे. धरणग्रस्तांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा स्थगित केली मात्र त्याची सूचना धरणग्रस्तांना दिली नाही त्यामुळे धरणग्रस्तांचा वेळ आणि कोल्हापूरचा प्रवास वाया गेला. धरणग्रस्तांची कुचेष्टा झाल्याची भावना धरणग्रस्तांनमध्ये निर्माण झाली. 14 तारखेला झालेल्या बैठकीनंतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे एकही काम झाले नाही. कागदी घोडे नाचवणेचे काम मात्र चालू आहे. धरणग्रस्तांची हेलपाटे मारून त्यांचं खच्चीकरण केले जात आहे, त्यांची कुचेष्टा केली जात आहे हे खपवून घेतले जाणार नाही. याचे परिणाम वेगळे होत जातील त्यामुळे धरणग्रस्तांची कुचेष्टा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी थांबवावी असे आवाहन बैठकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी केले आहे.बैठकीला कॉ. संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, शिवाजी येजरे, महादेव खाडे, बाबुराव नाईक , शशिकांत तोरस्कर, शंकर पोटे, सदू शिवणे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते धरण स्थावर जाण्यासाठी आरदाळ येथील भैरीदेव मंदिर येथे सदरची बैठक घेण्यात आली.
व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिवजयंती साजरी
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर,कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करणेत आले.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष व विद्यमान जि. प.उपाध्यक्ष श्री.जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करणेत आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.आण्णासो पाटील,सचिव श्री.एस.पी.कांबळे , प्राचार्य व संचालक श्री सुनील देसाई, प्र.प्राचार्य श्री.एस.जी.खोराटे, श्री.आर.जी.कुंभार, श्री.एस.एन.पाटील,सर सौ. व्ही.जे.शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.यावेळी प्रशालेचे शिक्षक, सर्व शिक्षिका,विध्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
आंबेओहळ धरणग्रस्तांचे आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित
आज शिवजयंती असल्याने आंबेओहळचे पाणी रोखण्याचे आजचे आंदोलन मंगळवारी होणार आहे. धरणग्रस्तांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा स्थगित केली मात्र त्याची सूचना धरणग्रस्तांना दिली नाही त्यामुळे धरणग्रस्तांचा वेळ आणि कोल्हापूरचा प्रवास वाया गेला. धरणग्रस्तांची कुचेष्टा झाल्याची भावना धरणग्रस्तांनमध्ये निर्माण झाली. 14 तारखेला झालेल्या बैठकीनंतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे एकही काम झाले नाही. कागदी घोडे नाचवणेचे काम मात्र चालू आहे. धरणग्रस्तांची हेलपाटे मारून त्यांचं खच्चीकरण केले जात आहे, त्यांची कुचेष्टा केली जात आहे हे खपवून घेतले जाणार नाही. याचे परिणाम वेगळे होत जातील त्यामुळे धरणग्रस्तांची कुचेष्टा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी थांबवावी असे आवाहन बैठकीच्या वेळी कार्यकर्त्यांनी केले आहे.बैठकीला कॉ. संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, शिवाजी येजरे, महादेव खाडे, बाबुराव नाईक , शशिकांत तोरस्कर, शंकर पोटे, सदू शिवणे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते धरण स्थावर जाण्यासाठी आरदाळ येथील भैरीदेव मंदिर येथे सदरची बैठक घेण्यात आली……..

देवर्डे शाळेत शिवजयंती उत्साहात

*छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या *३९२ व्या जयंती* निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौथीच्या वर्गातील अथर्व पाटील शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत, तर सातवीची प्रीती पोवार जिजाऊंच्या वेषभूषेत होती. पहिलीपासून सातवीपर्यंतची मुलं-मुली पारंपरिक वेषभूषेत होती. मुख्याध्यापक नामदेव माईनकर, सुनील सुतार, राजेंद्र पाटील, संयोगिता सुतार व प्रीती पोवार यांच्या हस्ते प्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सातवी व चौथीच्या मुलींनी ‘दैवत छत्रपती’, ‘महाराष्ट्र गीत’ ही गीतं सादर केली; तर चौथीच्या मुलांनी शिवरायांचा पोवाडा सादर केला. सातवीच्या मुलींनी शिवबाचा पाळणा सादर केला. पहिलीच्या शर्वरी तानवडे व श्रेया चाळके या मुलींनी भाषणे सादर केली.
आजरा येथे शिवजयंतीनिमित्त संपन्न झालेल्या खुल्या गटातील लेझीम स्पर्धेमध्येही शाळेच्या मुलींनी सहभाग नोंदवून तृतीय क्रमांक पटकावण्याची किमया केली.
संयोगिता सुतार, वंदना जाधव, रेश्मा बोलके, सरोजिनी कुंभार, महादेव तेजम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या प्रसंगी मारुती बुरूड, धनाजी चाळके, राजू गुरव यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.






