mrityunjaymahanews
अन्य

रामतीर्थ यात्रेबाबत आजरेकर आक्रमक…

रामतिर्थ यात्रेबाबत आजरा तालुकावासीय आक्रमक

आजरा येथील महाशिवरात्र निमित्याने भरणारी श्री. रामतीर्थ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्यानंतर आजरा तालुकावासीय आक्रमक झाले असून या निर्णयाबबत संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. . आजरा नगरपंचायतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे यात्रा रद्द केली असल्याचे दोन दिवसापूर्वी जाहीर केले.

जिल्हाधिकारी कोल्हापूर याचे दि. ९ जानेवारी २०२२ रोजीचा आदेशान्वये कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दि. १, २ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री निमित्त होणारी रामतीर्थ यात्रा भरली जाणार नाही. व दि. २ मार्च २०२२ रोजी होणाऱ्या धार्मिक विधी पालखी सोहळा हा केवळ ५० भाविकांच्या मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडेल व रामतीर्थ परिसरामध्ये कोणतीही दुकाने विक्री स्टॉल लावण्यास परवानगी दिली जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

सलग दुस-या वर्षी भाविकांना यात्रेपासून वंचित रहावे लागत आहे. तालुका सध्या कोरोनामुक्त झाला असताना यात्रा रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार होण्याची मागणी तालुकावासीय करीत आहेत

इथेनाॅल व अन्य पदार्थ निर्मितीतूनच कारखान्याचे भवितव्य : विजय ओैताडे 

केवळ साखर उत्पादनातून भविष्यात कारखानदारी टिकवणे अडचणीचे ठरणार आहे. कारखान्यांनी उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधले पाहिजेत भविष्यात इथेनॉल निर्मिती व अन्य उपपदार्थ निर्मितीतून कारखान्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून सक्षम होता येईल असे शाहू कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक व अभ्यासक विजय औताडे यांनी स्पष्ट केले. 

आजरा साखर कारखान्याच्या वाटचालीचा आढावा त्यांनी पत्रकार बैठकीतद्वारे घेतला. आता कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजरा साखर कारखाना हा जिल्हा बँकेतून पुन्हा सहकारात चालवण्याकरिता येणे हे दुर्मिळ उदाहरण आहेत भविष्यातील तीन-चार वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने कारखाना चालवणल्यास कारखान्याला उज्वल भवितव्य निर्माण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष प्रा.सुनिल शिंत्रे यांनी स्वागत केले. औताडे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असल्याने सांगितले आजरा कारखान्याने १०९ दिवसात ३ लाख २० हजार मेट्रिक टन गाळपकेले आहे आणखी २० ते २५ दिवस हंगाम चालेल असेही सांगितले यावेळी संचालक मुकुंदराव देसाई, वसंतराव धुरे, एम.के. देसाई, कार्यकारी संचालक टी. एस. भोसले उपस्थित होते.

दलितांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष… डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचाआरोप

आजरा येथे डेमोकेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष सतीश भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रमग्रह येथे व्यापक बैठक पार पडली. या बैठकीसाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दीपक लोखंडे (जिल्हा उपाध्यक्ष) यांनी केले.

या वेळी बोलताना सतीश भांडारे म्हणाले, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील दलितांच्या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे टोकाचे दुर्लक्ष झाले आहे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सुद्धा काही गावामध्ये वीज व पाणी मिळत नसेल तर अशा या शासन व प्रशासनाचा आम्ही डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

हरपवडे हदीतील धनगर वाडा येथे जे नागरिक रहातात त्यांना गेल्या ७५ वर्षात पाणी, यीज, रस्ते, राहण्यासाठी घरे मिळाली नाहीत त्या धनगर वाढ्यावरील वरील लोक आदिवासी सारखे जीवन जगत आहेत या त्यांच्या प्रश्नासाठी डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एक मार्च पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.

या वेळी डीपीआयचे नेते बताश हेगडे, जिल्हा अध्यक्ष सुभाष साठे यांनी मार्गदर्शन केले . संदीप सकट,जिल्हा संपर्क प्रमुख यांनी आभार मानले.
यावेळी आजरा तालुका अध्यक्ष सुनील भोसले
शोमा पसारे,वंदना परकनाटी,भरत कांबळे,जयवंत झोरे,घोंडीबा झोरे,गंगाधरझोरे,नागोजीझोरे,सिमदेव येडगे,राजाराम जाधव,भिमराव कांबळे,संजय लोखंडे,नारायण लोखंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक… संभाजी चौकात केले जोडे मारो आंदोलन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!