mrityunjaymahanews
अन्य

BREAKING NEWS

दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजऱ्याहून गडहिंग्लजच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या विक्रम कुडाळकर यांच्या दुचाकीवर मागील सीटवर बसलेल्या त्यांच्या पत्नी सौ. सुरेखा कुडाळकर (वय ५२ वर्षे ) यांचे  चालत्या दुचाकीवरून पडल्याने  व डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी बारा वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज मार्गावरील सोहाळे – मुंगूसवाडी नजीक सदर अपघात घडला.

विक्रम कुडाळकर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे मेहुणे आहेत. अपघातानंतर तातडीने सौ. सुरेखा यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला

    सौ. सुरेखा यांच्या पश्चात पतीसह एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

धोकादायक ठिकाण…

आज झालेल्या अपघाताच्या ठिकाणी वेळोवेळी अनेकांना दणका बसला आहे. या परिसरातील रस्त्याची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews

गवसेत आमदार आबिटकर यांच्या हस्ते आरोग्यकेंद्राचे उद्या भूमीपूजन

mrityunjay mahanews

शेतकऱ्याच्या सोळा बकऱ्यांवर अज्ञातांनी मारला डल्ला… सुळे येथील प्रकार…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!