सोमवार दि. २० जानेवारी २०२५

कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ सितारों से आगे ‘ ची बाजी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे पार पडलेल्या कै . रमेश टोपले राज्यस्तरीय नाटयमहोत्स्वात
लोकरंगभूमी सांगली च्या ‘ सितारों से आगे ‘ या नाटकाने प्रथम क्रमांकासह विविध पारितोषिके पटकावित या महोत्सवात बाजी मारली.
आजरा येथील नवनाटय कलामंच संस्थेच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .या महोत्सवात दाडोबा क्रिएशन मोरजी संस्थेच्या ” कधी तरी कोठे तरी ” या नाटकाला द्वितीय तर जागृती कलामंच कुसवडे (सातारा ) या संस्थेच्या ” गुपित तुमच्या आमच्या जिव्हाळयाच ” या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला. याबरोबरच दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार इरफान मुजावर ( सितारों से आगे ) , पायल पांडे ( तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ) , उदय गोडबोले देहभान ) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक देण्यात आले .
स्री अभिनयासाठी वैष्णवी शेटे (सितारों से आगे ) , मानसी कुलकर्णी (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ), शारदा शेटकर (कधी तरी कोठे तरी ) तर पुरुष अभिनयासाठी
मयूर पाटील (सितारों से आगे ),संतोष उबाळे (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ) नेपथ्य विभागासाठी संजय सुतार (सितारों से आगे ) , निखिल शिंदे (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ) , लखन जगताप (गुपित तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे ) यांनी तर प्रकाश योजना विभागासाठी विक्रांत जावडेकर (सितारों से आगे ) , आशीष भागवत (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ) , अश्वेक निमोणकर (कधी तरी कोठे तरी ) संगीत योजनेसाठी सत्यवान नाईक (कधी तरी कोठे तरी ) , मयुरेश पाटील ( सितारों से आगे ) , प्रताप सोनाळे (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ) यांनी अनुकमे पहिले तीन क्रमांक पटकाविले.
विजेत्या स्पर्धकांना समारंभ पूर्वक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ सूतगिरणीचे अध्यक्ष अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ, अनिल देशपांडे, वासुदेव मायदेव, डॉ. श्रद्धानंद ठाकूर, अनिल कांबळे, बाळासाहेब आपटे, वामन सामंत , डॉ. अशोक बाचूळकर, आय. के. पाटील, ज्योत्स्ना चराटी, योगेश पाटील, अण्णा फडके, वासुदेव मायदेव यांच्यासह नवनाट्य मंडळाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. 
क्राईम न्यूज…
एकाला मारहाण दोघां विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किरकोळ वादातून हाळोली ता. आजरा येथील अभिषेक अर्जुन कांबळे यांना मारहाण केल्या प्रकरणी रवी उदय कांबळे व जयेश अमर कांबळे या राजेंद्र नगर कोल्हापूर येथील दोघांविरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद
करण्यात आला आहे.
१८ जानेवारी रोजी रात्री आजरा बस स्थानक परिसरात सदर प्रकार घडला असे पोलिसांनी सांगितले.

स्वतःमधील क्षमता ओळखायला शिका : अजितकुमार कोष्टी
आजरा महाविद्यालयात पारितोषक वितरण समारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पुस्तकी ज्ञान व व्यवहार ज्ञान यामध्ये फरक आहे. अनुभवातून शहाणपण येते.प्रत्येकाकडे वेगवेगळी क्षमता असते, स्वतःमधील क्षमता ओळखता आली पाहिजे. या क्षमतेनुसार काम केल्यास कर्तृत्वान व्यक्ती निर्माण होतील. अलीकडे गॅदरिंग संस्कृती सध्या लोक पावत चालली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी गॅदरिंग गरजेचे आहे. वाचन संस्कृतीची अवस्थाही कांही फारशी वेगळी नाही. पुस्तक वाचण्यात एक वेगळीच मजा आहे. सध्या समाजाला अनेक गोष्टीतील नाविन्याच्या संशोधनाची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जगण्याचे साधन प्रत्येकाने तयार करावे. प्रत्येकाच्या हातात शून्य असते या शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद प्रत्येकात आहे. प्रत्येकांने आपल्यातील क्षमता आळखून त्या विकसीत केल्यास समाजात आपली ओळख निर्माण करता येते. स्वतःमधील गुणाची लहानपणी आळख झाल्याने हास्यसम्राट होता आले. असे प्रतिपादन हास्यसम्राट प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी केले.
आजरा महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण समारंभ प्रसंगी श्री. कोष्टी बोलत होते. त्यांनी ‘ आमचं गण्या ‘ या आपल्या विनोदी शैलीने सभागृहात हास्याचे फवारे उडवले. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते. या वेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोष्टी म्हणाले, विनोद म्हणजे मानवी प्रवृत्ती होय. प्रत्येक गोष्टीत विनोद आहे. मार्मिकता वेचतांना हास्य फुलते. प्रवासात माणसं वेचावीत असे आपण म्हणतो, पण मी व्यवहार ज्ञान वेचतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टाची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते. यावेळी श्री. चराटी यांचे भाषण झाले.
यावेळी डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोस्कर, विलास नाईक, सुरेश डांग, विजयकुमार पाटील, ज्योत्स्ना चराटी, अनिकेत चराटी, योगेश पाटील, आय .के. पाटील,प्रा. विजय बांदेकर, अर्जुन भुईंबर ,प्रा.दिलीप भालेराव यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्रा.रत्नदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली देसाई व डॉ. अशोक बाचूळकर यांनी पारितोषिक वितरणाचे वाचन केले. उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी आभार मानले.


वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत ‘आजरा’चे
चे वजन काटे निर्दोष
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे आदेशाने निरीक्षक वैद्यमापन शास्त्र व इतर अधिकारी यांचे भरारी पथकाने वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे दोन्ही ऊस वजन काटयाची तपासणी करण्यासाठी सकाळी अचानक भेट दिली व दोन्ही वजन काट्यांची संपुर्ण पडताळणी केली. त्यांनी तपासणी कामी ट्रक व ट्रॅक्टर अशा पुर्वी वजन केलेल्या व नविन वाहनांची वजने घेतली. तसेच ८ टनाची वजने प्रत्यक्षात ठेवून पडताळणी केली त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. त्यामुळे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक व निर्दोष असलेचे स्पष्ट झाले. काटे बिनचूक असलेचा अहवाल भरारी पथक अधिकारी यांनी कारखान्यास सादर केला.
भरारी पथकाचे अधिकारी श्री. एम.व्ही.देसाई, निवासी नायब तहसिलदार, आजरा, श्री.व्ही.एल.लाखे, पोलिस स्टेशन प्रतिनिधी, आजरा, श्री. शिवदास भिवसन सोनवणे, लेखापरिक्षक श्रेणी-१ अधिन, तृतीय विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ सह.संस्था (साखर) कोल्हापूर, श्री. अविनाश अरूण शिंगाडी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज, श्री. नजिर महमद लमतुरे, श्री. विनोद प्रभाकर चव्हाण, श्री.अब्दुल रशिद नौरूद्दीन, शेतकरी प्रतिनिधी, श्री. तुकाराम मारूती मोळे, केनयार्ड सुपरवायझर यांचे समक्ष काटयांची तपासणी केली.
श्री. वसंतराव धुरे, चेअरमन, संचालक श्री. मुकूंदादा देसाई, श्री. अनिल फडके, तज्ञ संचालक श्री. रशिद पठाण, प्र.कार्यकारी संचालक श्री. व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेंजर (प्रोडक्शन) श्री.एस. के. सावंत ऊस पुरवठादार शेतकरी, केनयार्डचे कर्मचारी, सर्व वाहन मालक व चालक प्रत्यक्ष उपस्थित होते.


निधन वार्ता
चंद्रकांत मांगले

आजरा येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गणपती मांगले (वय ६३ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, विवाहित मुलगी, जावई सून, असा परिवार आहे.
शांताबाई कुंभार

रामदेव गल्ली,आजरा येथील शांताबाई तुकाराम कुंभार ( वय ९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. महसूल विभागातील कर्मचारी रमेश तुकाराम कुंभार यांच्या त्या मातोश्री होत .
त्यांच्या पश्चात चार विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शशिकांत भातखंडे

आजरा येथील ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी शशिकांत उर्फ कृष्णाजी भातखंडे (वय ७४ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सोमवार पेठ येथील अभिजीत भातखंडे यांचे ते वडील होत.

आज शहरात…
♦ आजरा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम वेळ : दुपारी चार वाजता



