mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.७ जानेवारी २०२६

राजे गटाचा निर्धार मेळावा

जि. प.,पं. स. निवडणूक स्वबळावर लढण्यावर कार्यकर्ते ठाम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर जिल्हा परिषद राजे गटाचा कार्यकर्ता मेळावा शनिवार, दिनांक ३ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणाशीही युती न करता स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी  घेतला.मेळाव्यात उत्तूर जिल्हा परिषद व भादवण पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार विठ्ठल उत्तूरकर तसेच भादवण पंचायत समितीचे संभाव्य उमेदवार जनार्दन निउंगरे हे प्रत्येक विभागात भेटी देत असून संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने तयारी करत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून भाजपाच्या माध्यमातून समरजीत राजे यांनी या गटाची भक्कम पायाभरणी केली आहे. प्रस्थापित गटांच्या विरोधात सक्षम असा युवा गट उभा करण्याचे कार्य त्यांनी केले असून, याच ताकदीवर आता राजे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. या लढतीत समरजीत राजे यांचे पाठबळ लाखमोलाचे ठरणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना जनार्दन नेऊंगरे यांनी आपण पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने व प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चितच विजय मिळवता येईल, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी उत्तूरचे उपसरपंच डी. बी. सावंत, ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर, भादवणचे नेते रणजीत गाडे, आर्दाळचे सूर्यकांत पाटील, मंदार हळवणकर, प्रदीप लोकरे, पराग देशमाने, बाळू सावंत, प्रशांत पोतदार अशोक करंबळे आदींनीही स्वबळावर लढण्याचा नारा देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास संदीप गुरव, सुदाम सावर्डे, सनी आमनगी, चंद्रकांत देसाई, संजय चौगुले, बाळकृष्ण पाटील, रणजीत गाडे, बाळासो सावंत, सुभाष पाटील, रघुनाथ सावंत, अशोक करंबळे, जोतिबा नाधवडेकर, महादेव रामाने, संतोष अस्वले, संजय आजगेकर, संतोष पाटील,अमित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हा मेळावा राजे गटाचे जयवंत नरके व कृष्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

गॅस एजन्सींच्या मनमानीविरोधात तहसीलदारांना निवेदन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहर व ग्रामीण भागातील गॅस एजन्सीकडून ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयींबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या वतीने तहसीलदार आजरा यांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील बहुतांश सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर गॅस सिलेंडर वाहनातून थेट ढकलून उतरविले जात असल्याने रस्त्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सिलेंडर उतरविताना संरक्षक साहित्याचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना गॅस एजन्सींना देण्यात याव्यात, अशी मागणी समितीने केली आहे.

तसेच आजरा शहरात वाढत असलेल्या बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घराच्या दारापर्यंत सिलेंडर पोहोचविण्याची जबाबदारी गॅस एजन्सीची असताना प्रत्यक्षात या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी वरच्या मजल्यावर सिलेंडर नेण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

या सर्व बाबींची दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सी व ग्राहक यांची बैठक घेऊन नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने केली आहे.

या निवेदनावर नगरसेवक परशुराम बामणे अध्यक्ष, पांडुरंग सावरतकर सचिव, रामचंद्र पंडीत, जोतीबा आजगेकर, महांकाळी चौगुले,संजय जोशी, दिनकर जाधव, बंडोपंत चव्हाण, संतोष बांदिवडेकर, मिनीन डिसोझा, मदन तानवडे, महादेव राणे, अभिजीत संकपाळ, सुरज पाटील ,महेश खेडेकर, नगरसेवीका आसावरी खेडेकर यांच्या सह्य़ा आहेत.

आजपासून कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सव..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील नवनाट्य कलामंच, आजरा यांचे वतीने १२ व्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवास आज बुधवार दि. ७ जानेवारी पासून सुरुवात होत आहे. मंगळवार दि. १३ जानेवारी पर्यंत विविध नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाटय रसिकांनी याचा लाभ घ्यावा असें आवाहन नवनाट्य कलामंचचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, नाट्य समितीचे अध्यक्ष अण्णा फडके, उपाध्यक्ष मंगेश तिऊरवाडकर यांनी केले आहे.

या नाट्य महोत्सवात सादर होणारी नाटके :

बुधवार ७ जानेवारी : जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन संचलित आनंदरंग कोल्हापूर संस्थेचे “भांडा सौख्यभरे”

गुरुवार ८ जानेवारी : लोकरंगभूमी शांतिनिकेतन सांगली संस्थेचे “इटोपिया

शुक्रवार ९ जानेवारी : शिवशक्ती तरुण मंडळ सातारा संस्थेचे “पोकळ घिस्सा “

शनिवार १० जानेवारी : पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा संस्थेचे “खानदानी”

रविवार ११ जानेवारी : अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली संस्थेचे “संगीत कट्यार काळजात घुसली”

सोमवार १२ जानेवारी : निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी संस्थेचे “मी कुमार”

मंगळवार १३ जानेवारी : बक्षीस वितरण समारंभ व संयोजक संस्था नवनाट्य कला मंच आजरा संस्थेचे “काळोख देत हुंकार”

दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकाचा प्रयोग सुरू होईल. सर्व नाटके आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर होणार आहेत.

उत्तूरच्या उपसरपंचपदी सौ. सुनिता संजय हतिरगे यांची बिनविरोध निवड

उत्तूर : मंदार हळदणकर

उत्तूर ता. आजरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुनिता संजय हतिरगे यांची बिनविरोध निवड आज झालेल्या विशेष बैठकीत करण्यात आली. माजी उपसरपंच सौ. समिक्षा देसाई यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते.

स्वागत व प्रास्ताविक महेश करंबळी यांनी केले तर ग्रामपंचायत अधिकारी पी. के. पाटील यांनी विषयाचे वाचन केले. यावेळी सरपंच किरण आमणगी, माजी उपसरपंच समिक्षा देसाई, मारुती घोरपडे, गणपतराव सांगले यांनी मनोगते व्यक्त केली.

या निवडीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य संजय उत्तूरकर, राजू खोराटे, भैरू कुंभार, सनी आमणगी, संभाजी कुराडे, संदेश रायकर, सुवर्णा नाईक, अनिता घोडके, आशा पाटील, सुनिता केसरकर, लता गुरव, सरिता कुरुणकर, सविता सावंत, उमेश आपटे, वसंतराव धुरे, शिरीष देसाई, शिवाजी कुराडे, पांडुरंग खोराटे, जोतिबा सपकाळ, कल्लाप्पा नाईक, जानबा कुरुणकर, दत्तात्रय केसरकर, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, हतिरगे परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

कानोली येथे व्यायामशाळा इमारत भूमिपूजन सोहळा संप्पन्न…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कानोली (ता. आजरा ) येथे जिल्हा नियोजन मंडळ यांचे कडून ना. प्रकाश आबिटकर यांचे माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत नवीन व्यायाम शाळा बांधकाम कामी निधी मंजूर झाला असून त्या कामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमा पाटील होत्या.

स्वागत व प्रास्तविक सुभाष पाटील यांनी केले, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय पाटील, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, शिरसंगी सरपंच संदीप चौगुले, तसेच संजय गांधी निराधार समितीचे सदस्य संतोष चौगुले या मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले, या मतदार संघात आम. शिवाजीराव पाटील आणि ना. आबिटकर यांचे माध्यमातून विकासकामे चालू असून, या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम करावे, यापुढेही गावागावात विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, कानोलीतील प्रलंबीत विकास कामासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. यावेळी संदीप चौगुले, संतोष चौगुले, सौ. सुषमा पाटील शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसरपंच चंद्रकांत पाटील, सदस्य, अनिल पाटील, सुधीरकुमार पाटील, स्वप्निल आर्दळकर सौ. आरती देसाई, सारिका भोसले, दिपाली सुतार सौ. शुभांगी पाटील,यांच्यासह तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीपती देसाई, पोलीस पाटील अनिल मुरुकटे, बाजीराव पाटील, दिनकर पाटील बाळासाहेब सुतार, चंद्रकांत आ.पाटील, पी. एम. आपगे, रमेश भोगण, शंकर पाटील, पंडितराव पाटील शहाजी भोसले,दिपक देसाई,आनंदा देसाई, अमरदीप आपगे शिवाजी पाटील, जयसिंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आभार ग्रामविकास अधिकारी स्नेहदीप सरदेसाई यांनी मानले.

आजरा साखर कारखान्याची डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर. कारखान्याकडे दि.१ डिसेंबर ते १५ डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाच्या बिलाची प्रतिटन रू. ३४००/- प्रमाणे विनाकपात होणारी रू.१६ कोटी १ लाख इतकी रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी दिली.

कारखान्याकडे करार झालेल्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाची उचल केली जात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जात आहेत.

कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतक-यांचा ऊस कारखान्याकडे गळीतास आणन्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी केले.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. सुभाष देसाई यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.

आजचा नाट्यप्रयोग 

भांडा सौख्यभरे…

लेखक/दिग्दर्शक:-विपुल देशमुख

सादरकर्ते :- जाणीव चारिटेबल फाउंडेशन संचलित आनंदरंग, कोल्हापूर

वेळ :- सायं.७-०० वा.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मसोली नजीक मालवाहू टेम्पो खड्ड्यात कोसळला… एक जखमी

mrityunjay mahanews

म्हैस दूध उत्पादनात आजरा तालुका अव्वल

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डासांसाठी केलेल्या धूमीत पाच म्हैशिंसह शेळ्या व कोंबड्यांचा गुदमरून मृत्यू….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!