mrityunjaymahanews
अन्य

म्हैस दूध उत्पादनात आजरा तालुका अव्वल

म्हैस दूध उत्पादनात आजरा तालुका अव्वल :-

अरुण डोंगळे यांचे गौरवोद्गार

 

 

जिल्ह्यामध्ये म्हैस दूध उत्पादनात आजरा तालुक्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. इतर तालुक्यांनी आजरा तालुक्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन गोकुळ जिल्हा सहकारी दूध उत्पादक  संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. आजरा येथे दूध संघाच्या वतीने आयोजित संपर्क सभेमध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

 

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकपर भाषणात बोलताना संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी आजरा तालुक्यातील म्हैस व गाय दूध उत्पादनाचा आढावा घेतला. आजरा तालुक्याला सहकार, संस्कृती व साहित्यिक पार्श्वभूमी आहे. आजरा तालुक्यातील शेतकरी हा कष्टाळू आहे. त्यामुळे हा तालुका दूध उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तालुक्यातील दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यास आपण बांधील असल्याचेही यावेळी श्रीमती रेडेकर यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, दूध व्यवसाय हा एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आहे. सध्या असणारी मागणी लक्षात घेता म्हैशीचे दूध वाढवण्याची गरज आहे.संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे संचालक म्हणून या भागांमध्ये चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ व आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाचा काटकसरीने कारभार सुरू आहे. संचालक मंडळाकडून काही चुका झाल्या असल्यास सभासदांनी योग्य त्या सूचना वेळोवेळी कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष डोंगळे पुढे म्हणाले,तालुक्यातील सर्वच ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही.म्हैस दुधामध्ये आजरा तालुका पुढे आहे. परंतु अलीकडे दूध व्यावसायिकांना जागेचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. जागेच्या अभावामुळे इच्छा असूनही अनेकांवर हा व्यवसाय करताना मर्यादा येत आहेत. यामुळे उत्पादकांना जागा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा बँकेच्या माध्यमातून होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादकांकरता विविध योजना राबवल्या जात असून या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

 

सभेमध्ये के. व्ही.येसणे, सुभाष देसाई, राजू होलम, संकेत सावंत तुळसाप्पा पवार, गोविंद गुरव, आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला अधिकारी व अध्यक्ष डोंगळे यांनी उत्तरे दिली.

 

 

सभेस संचालक अजित नरके, शशिकांत पाटील, चेतन नरके, बाळासाहेब खाडे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, वसंतराव धुरे, उदय पवार, राजू पोतनीस, अनिरुद्ध रेडेकर, अनिल फडके, मुकुंदराव देसाई, दशरथ अमृते, रणजित देसाई,बाबासाहेब चौगुले, एस.आर. पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,अनिकेत कवळेकर ,अनिल फडके यांच्यासह मान्यवर, कर्मचारी – अधिकारी व विविध संस्थांचे सभासद उपस्थित होते.

आभार संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी मानले.

        आज-यात चोरी…

रोख रकमेसह साडे सहा            लाखांचा मुद्देमाल लंपास…

       श्वान पथक दाखल

गोठण गल्ली, आजरा येथे अज्ञात चोरट्यांनी विनायक संजय कामत( मूळ गाव बोरवडे ता.कागल) यांच्या राहत्या घराचे कुलूप व कोयंडा तोडून घरातील तिजोरीत असणारे सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेची नोंद आजरा पोलिसात होत असून पुढील तपासाकरिता श्वान पथकाला पाचारण करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टायर विक्री व पंक्चर व्यवसाय करणारे विनायक कामत हे गोठण गल्ली येथील केशव नेवरेकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहतात. त्यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बोरवडे हे आहे. नात्यातील कार्यक्रमानिमित्त ते बुधवारी गावी गेले होते. कुटुंबातील कोणीच घरी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने नेकलेस, ब्रेसलेट, कानवेल, अंगठी असा सोन्याचा सुमारे दहा तोळ्याचा ऐवज व दीड लाख रुपये रोख लंपास केले. पंधरा दिवसापूर्वीच कामत कुटुंबीय भाडेकरू म्हणून या घरी राहण्यास आले होते. आज सकाळी हे कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले.

चोरीची नोंद आजरा पोलिसात होत असून पुढील तपासाकरता श्र्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून जवळपास असणा-या सीसीटिव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

Breaking News

mrityunjay mahanews

आईचे दशकार्य करण्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू : आजरा येथील घटना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अजातशत्रू ‘ दादा ‘

mrityunjay mahanews

शुक्रवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दरोड्यातील मुद्देमालासह आठ जण पोलिसांच्या ताब्यात…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!