mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


तालुक्यात धरणे तुडुंब…
घरांची पडझड सुरूच…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     आजरा तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सर्फनाला प्रकल्पासह चित्री प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सर्फनाला प्रकल्पामध्ये यावर्षी प्रथमच ७० टक्के इतका पाणीसाठा झाला असून चित्री प्रकल्पामधून खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आंबे ओहोळ व उचंगी मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. नद्या अद्यापही पात्राबाहेर असून सर्फनाला व चित्री प्रकल्प तुडुंब झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तालुक्यामध्ये सुमारे ३५ घरांची पडझड झाली असून यामध्ये एका गोठ्याचाही समावेश आहे.

             (सर्फनाला मध्यम प्रकल्प)

      साळगाव बंधारा  वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे तर पावसाचा जोर थोडा ओसरल्याने दाभिल व किटवडे बंधाऱ्यावरील पाणी कमी झाले असून हे बंधारे वाहतुकीकरता खुले करण्यात आले आहेत.

             (रामतीर्थ धबधबा परीसर)

    आजरा शहर व आजरा मंडल परिसरात गेल्या २४ तासात ६८ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. उचंगी मध्यम प्रकल्पामध्ये १२२७ दशलक्ष घनफूट (९९%) इतका पाणीसाठा झाला असून आंबेओहोळ मध्यम प्रकल्पामध्ये १६६७ दशलक्ष घनफूट(८७.८६ %) टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

रस्त्यांची दुर्दशा …

शिवसेनेचा नगरपंचायतीवर मंगळवारी मोर्चा

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायतीवर मंगळवार दिनांक २३ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजरा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी संभाजी पाटील, समीर चांद, रोहन गिरी, ओंकार माद्याळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भटक्या कुत्र्यांना आवरा…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे शाळकरी विद्यार्थी, महिला वर्गासह वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यावरून जाताना बरीच कसरत करावी लागत आहे सर्व शहरभर भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून या भटक्या कुत्र्यांना आवरा अशी मागणी आता शहरवासीय करू लागले आहेत.

    यापैकी कांही कुत्री ही जखमी अवस्थेत असून त्याच अवस्थेत शहरातून वावरत आहेत. गेले काही दिवस कुत्र्यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आजूबाजूच्या मोठ्या शहरातून पकडलेली भटकी कुत्री आजरा शहरांमध्ये आणून सोडली जात असल्याची शंकाही शहरवासीय व्यक्त करत आहेत.

      नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांबाबत उपाययोजना करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आडवी बाटली उभी होणार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

अशोकअण्णा यांना विधानपरिषद अथवा महामंडळावर संधी द्यावी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!