


आज-यात चोरी…
सोन्या चांदीचे दागिने लंपास

आजरा येथे गोठण गल्लीतील कृष्णा गणपती पटेकर यांच्या रहात्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले.
पटेकर कुटुंबीय हे २९ जुलै रोजी बाहेरगावी गेले होते. दोन दिवसानंतर ते घरी परतल्यानंतर बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी घरामध्ये प्रवेश करून सुमारे चार तोळे सोन्याचे छोटे-मोठे दागिने लंपास केले असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी कृष्णा पटेकर यांनी आजरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे पुढील तपास करीत आहेत.




