
गॅस सिलेंडरच्या आगीतील जखमीचा मृत्यू

जाधेवाडी (ता. आजरा) येथे गॅस सिलेंडरचा भडका उडून जखमी झालेल्या श्रीपती भीमा सावंत या ८६ वर्षीय वृद्धाचे उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, २८ जुलै रोजी घरी असताना अचानकपणे गॅसचा टाकीला आग लागून भडका उडून भाजल्याने ते गंभीर जखमी झाले होते. औषध उपचार सुरू असताना उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबतची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.
……..
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मानवतेचे साहित्य आहे – डॉ .अशोक बाचुळकर

आजरा : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कायम मानवतेचा पुरस्कार केला म्हणूनच त्यांचे साहित्य हे खऱ्या अर्थाने मानवतेचे साहित्य आहे, असे प्रतिपादन आजऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक बाचुळकर यांनी नुकतेच येथे केले.
आजरा महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ आणि विद्यार्थी विकास कक्ष यांच्यावतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे, माजी प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
डॉ. बाचुळकर पुढे म्हणाले की, जसे हिंदी साहित्यामध्ये संत कबीर यांचे कार्य आहे, तसेच मराठी साहित्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. समाजातील अतिमागासलेल्या समाजातील व्यक्तींना अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याचे नायक केले. आपल्या साहित्यातून समाजातील विषमतेवर कडाडून प्रहार केला. स्वातंत्र्य आणि समानतेचे मूल्य त्यांनी जपले. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांचा सुंदर मिलाफ अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून दिसून येतो.
यावेळी उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले, अलका मुगुर्डेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन तर सानिका पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आजरा हायस्कूल आजरा मध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा मध्ये राष्ट्रीय सण सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल कुलकर्णी होते.
प्रतिमा पूजन मुख्याध्यापक कुलकर्णी, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण दरी, अजित तोडकर, मारुती गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळकांच्या कार्याची माहिती कुमारी सानिका माने हिने सांगितले, तर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा सण सांस्कृतिक विभाग प्रमुख गौतम कांबळे यांनी घेतला.
यावेळी संतोष कालेकर, रोहिता सावंत, माधवी शेलार सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाशीकर यांनी केले,तर आभार अर्जून बापट यांनी मानले.

उत्तूर येथे वृक्षारोपण शुभारंभ

ग्रामपंचायत उत्तूरच्यावतीने गारगोटी मार्गावर येथे वृक्षारोपण शुभारंभ आज करणेत आला.
एकूण २०० वृक्ष लावणेत येणार आहेत.त्यामध्ये आवळा.कडुलिंब,पिंपळ ,जांभूळ इत्यादी प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.
सरपंच किरण आमनगी यांनी स्वागत केले.,उपसरपंच समिक्षा देसाई,ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, राजू खोराटे,मिलिंद कोळेकर ,अनिता घोडके,आशा पाटील,सुनीता केसरकर ,सुनीता हत्तीरगे,लता गुरव,सरिता कुरूणकर ,सविता सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करणेत आले. तसेच गणपतराव यमगेकर ,प्रतीक यमगेकर व त्यांचे सर्व सहकारी ,वसंतरावदादा पाटील विद्यालयाचे विद्यार्थी ,ग्रामपंचायत कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
ग्रामविकास अधिकारी पी. के. पाटील यांनी आभार मानले.
…………………………

पोलिस पाटील कै. संदीप पाटील यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

पोवाचीवाडी ता. चंदगड येथील पोलीस पाटील, संदीप पाटील यांची कांहीं दिवसापूर्वी हत्या करण्यात आल्याने त्यांचे कुटुंबिय अडचणीत आले आहेत.
या कुटुंबाच्या दुःखात आजरा तालुक्यातील सर्व पोलिस पाटील सहभागी होत त्या कुटुंबाच्या मागे खंबीर पणे उभे राहुन
त्या कुटुंबाला या दुःखातून सावरायला सर्व पोलीस पाटील यांनी आर्थिक मदत गोळा करुन कै संदिप पाटील यांच्या पत्नी व मुलगा यांचेकडे सुपूर्द केली.
यावेळी आजरा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व पोलीस ठाणे कर्मचारी उपस्थित होते.

🛑स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी आजही सुनावणी नाही
राज्यातील महापालिका, नगरपालिका, झेडपीच्या निवडणुका कधी?

🔹राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न आजही अधांतरीच राहिला आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. पण आजही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी आलं नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता नवीन तारीख मिळण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रकरण सुप्रीम कोर्टात आज सुनावणीसाठी आठव्या क्रमांकावर होतं. पण आज ते कामकाजासाठी आलं नाही. त्यामुळे आता याची सुनावणी पुढे ढकलली गेल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवीन तारीख कधी मिळणार?
मुंबई पुण्यासह राज्यातील 25 पेक्षा अधिक महापालिका, 207 नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. गेल्या काही महिन्यांपासून या निवडणुकांबाबत सातत्याने तारीख पे तारीख असंच चित्र पाहायला मिळत आहे, पण कोणतंही कामकाज होत नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर क्रमांक आठवर हे प्रकरण सुनावणीसाठी होतं. पण आजही यावर सुनावणी झालेली नाही.
या मुद्द्यांवर एकत्रित सुनावणी
राज्यातील 92 नगरपरिषदांमधला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले अध्यादेश, नवीन सरकारने नव्याने प्रभागरचना करण्यासंदर्भातील अध्यादेश पारित केल्यासंबंधित मुद्दा, या सगळ्यांवर आज एकत्रित सुनावणी होणार आहे.
ऑगस्ट 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संपूर्ण प्रकरणाची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. या एका याचिकेवर 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.
कारभार प्रशासकांच्या हाती
कोविड महामारीचं संकट, त्यानंतर राज्यात सुरु झालेला सत्तासंघर्ष, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट यामुळे राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदांचा कालावधी अनेक महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे इथला संपूर्ण कारभार प्रशासकांच्या हाती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
सुप्रीम कोर्टाच्याच 2006 च्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने लांबवता येऊ शकतो. त्यानंतर निवडणुका या व्हायल्याच हव्यात. आता गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सगळा कारभार प्रशासकांच्या हातात गेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर पुढची तारीख कधी पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
News source:-
ttps://chat.whatsapp.com/
…………………



