
पावसाचा जोर कायम… नद्यांचे पाणी पात्राबाहेर...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हिरणीकेशी व चित्रा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून साळगाव, किटवडे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या २४ तासात आजरा मंडल मध्ये ७२ मिलिमीटर पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुवाधार पावसामुळे आज-याचा आठवडा बाजारात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर बाजारासाठी आलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले. अनेक ठिकाणी घरांची पडझडही सुरू झाली आहे.

दोन दिवस पावसाचा जोर प्रचंड वाढला असून विविध प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. आंबेओहोळ ,सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. किती व उत्साही प्रकल्पामध्येही पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

चित्री मध्यम प्रकल्पामध्ये ७५०.९० मीटर इतकी पाणी पातळी असून एकूण १५९२ दशलक्ष घनफूट ८४.३७ % इतका पाणीसाठा झाला असून गेल्या २४ तासात १०५ मिनिटे इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून पासून आजतागायत १६३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उचंगी प्रकल्पामध्ये २१९.०६७ दशलक्ष घनफूट ( ६५.३१ %) इतका पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी ७९४.२० मीटर इतकी आहे.

आंबेओहोळ मध्यम प्रकल्पामध्ये ६८५.३० मीटर इतकी पाणी पातळी असून ११८५ दशलक्ष घनफूट (९६%) इतका पाणीसाठा आहे गेल्या २४ तासांमध्ये पाणलोट क्षेत्रात ६५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर एक जून पासून एकूण ९७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सर्फनाला प्रकल्प तुडुंब…
यावर्षी प्रथमच सर्फनाला प्रकल्पामध्ये पाणी साठवले जात असून पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस सुरू असल्याने सर्फनाला प्रकल्प तुडुंब भरला आहे. यावर्षी ६६% इतका पाणीसाठा करण्याचे नियोजन असून कोणत्याही क्षणी सर्फनाला प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

आपत्ती काळात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा मोठा फायदा :डी.के. गोर्डे-पाटील
आजऱ्यात ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत प्रशिक्षण

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करावा असे आवाहन.के. गोर्डे-पाटील यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत माहीती व प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यामस्रक्षा यंत्रणेचे संचालक डि.के. गोर्डे-पाटील यांनी ॲपबाबत माहीती व प्रशिक्षण दिले. तहसीलदार श्री.समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बालविकास प्रकल्प अधिकारी बापू शिनगारे, तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे, आजरा नगरपंचायत करविभागाचे अधिकारी निहाल नायकवडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी आदी उपस्थित होते.
या यंत्मुरणेळे चोरी, पूर परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यासह ग्रामसभा, सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती तात्काळ देणे शक्य होणार असून तातडीने इतर ग्रामस्थांची मदत मिळणार आहे.
श्री. यमगर म्हणाले, चोरांना जेरबंद करण्यासाठी गावामध्ये अलर्ट राहन यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा. आपलं गाव स्रक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपलं गाव आपली जबाबदारी आहे.

गटविकास अधिकारी श्री. ढमाळ म्हणाले, ग्रामपंचायतीनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरु करून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा. आपत्कालीन व्यवस्थेसह महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा महत्वाची आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर मा. श्री महेंद्र पंडित, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर मा.श्री. एस कार्तिकेन यांच्या प्रयत्नातून व संयुक्त विद्यमाने आजरा पोलीस स्टेशनकडून ग्राम सुरक्षा यंत्रणा कायर्यान्वित करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास संजयभाऊ सावंत, विलास जोशीलकर, लहू पाटील, प्रभाकर कोरवी,जी.एम. पाटील, पेरणोली सरपंच प्रियांका जाधव, कानोलीच्या सरपंच सौ.सुषमा पाटील, मडईलगए सरपंच बापू नेऊंगरे, रणजीत सरदेसाई यांच्यासह आशा स्वयंसेविका विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा… टोलमुक्त
संघर्ष समितीचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोमवार दिनांक २२ जुलै रोजी आजरा तहसील कार्यालयासमोर अन्यायकारक टोल लागू नये या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर टोलमुक्त संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व हा डाव हाणून पाडावा असे आवाहन समितीच्या विठ्ठल मंदिर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले.
संभाजी चौक येथे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन मोर्चा ने तहसील कार्यालयासमोर जातील व तेथे धरणे आंदोलनाला सुरुवात होईल. यावेळी ज्या ग्रामपंचायतींनी टोल रद्द च्या पार्श्वभूमीवर ठराव केलेले आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीने आपले ठराव जमा करावेत असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई ,काशिनाथ मोरे, परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, प्रभाकर कोरवी, बंडोपंत चव्हाण,युवराज जाधव(खानापूर ),समीर मोरजकर, आदित्य रेडेकर, प्रकाश मोरुसकर ,रवींद्र भाटले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


