mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शनिवार  दि. ९ ऑगस्ट २०२५         

तीन लाखांची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांकडून लंपास


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बहिरेवाडी ता. आजरा येथील पत्र्याचे शेड तोडून ट्रान्सफॉर्मर मधील २ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत सागर वसंत गाडगीळ रा. पाचगाव, करवीर/ कोल्हापूर यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे.

अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून सदर तांब्याची तार चोरून नेल्याची घटना घडली आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

पुणे पदवीधर साठी चाचपणी सुरू…

भैय्या माने यांच्या आजऱ्यात भेटीगाठी 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

पुणे पदवीधर विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे कामाला लागलो असून मतदार नोंदणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे. या मतदार संघात उमेदवारी करण्याची संधी मिळेल. असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी व्यक्त केला.

येथील जनता बँक आजराच्या सभागृहात पुणे पदवीधर मतदार नोंदणी अभियानसाठी मेळावा झाला. राष्ट्रवादीचे दोनही गट, कॉंग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई अध्यक्षस्थानी होते. माजी सभापती विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, अल्बर्ट डिसोझा, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, बिद्रीचे संचालक रंगराव पाटील, रणजित सुर्यवंशी आदी प्रमुख उपस्थित होते.

श्री. माने म्हणाले, पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणुक तशी सोपीही नाही आणि अवघडही. ही निवडणुक जिंकण्यासाठी मतदार नोंदणी महत्वाची आहे. कोल्हापुर जिल्ह्यामधे जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्यावर भर देणार आहे. यासाठी मतदार संघात दौऱ्याचे
नियोजन केले आहे. पदवीधरसाठी उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगीतले आहे. या वेळी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल माहीती दिली.

मुकंदराव देसाई, सुधीर देसाई, संभाजी तांबेकर यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा सहकार बोर्डाचे नुतन सदस्य श्री. तांबेकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नुतन तालुका युवा अध्यक्ष संजय येजरे, आजरा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाच्या नुतन महीला अध्यक्षा रेजीना फर्नांडीस यांचा यावेळी सत्कार झाला. मलिग्रे सेवा संस्थेची निवडणुक जिंकल्याबद्दल आजरा कारखाना संचालक अशोक तर्डेकर, अशोक शिंदे तसेच शिरसंगी सेवा संस्थेचे नुतन अध्यक्ष मधुकर यलगार, सुभाष देसाई यांचाही सत्कार झाला.

एम. के. देसाई, मारुती घोरपडे, विठ्ठलराव देसाई, डी. ए. पाटील, शिरीष देसाई, राजू होलम, संजय देसाई, जनार्दन बामणे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष अनिल फडके यांनी स्वागत केले. गणपती सांगले यांनी सुत्रसंचालन केले. तालुका संघाचे अध्यक्ष महादेव पाटील धामणेकर यांनी आभार मानले.

 मेरे पास हसन मुश्रीफ है…

श्री. माने यांनी दिवार चित्रपटातील एका संवादाची ची आठवण करून देत मेरे पास वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ है… त्यांच्या पाठबळावरच पदवीधरची निवडणुक लढवणार असल्याचे सांगीतले.

शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द करा…
शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे आजरा तहसीलदाराना निवेदन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर पिकावू जमीन संपादित होणारच आहे. याबरोबर पर्यावरणाची होणारी हानी, नद्यांना येणारे पूर असे अनेक प्रश्न उभा करत लाखो शेतकरी त्याविरोधात लढत आहेत. आजरा तालुक्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा असे निवेदन आज आजरा तहसीलदार यांना शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातून व्हावा यासाठी पर्यायी चार मार्गाची मांडणी करत रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार यांची भेट घेऊन मागणी केली असल्याचे वर्तमानपत्रातून समजते. आ. पाटील यांनी रस्ते विकास महामंडळासमोर पीपीटी द्वारे सादर करून चार पर्यायी मार्ग सुचविले आहेत. त्यापैकी गारगोटी-पिंपळगाव-मडिलगे-आजरा-चितळे-इब्राहिमपूर-नागनवाडी-आसगाव-कोकरे-जांबरे-इसापूर ते गोवा या पर्यायाचा त्यांनी आग्रह धरला आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी या विभागातील हजारो शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार असून हजारो शेतकरी उध्वस्त होणार आहेत.

याबरोबरच नद्यांच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होऊन या विभागातील जनतेला सातत्याने पुराचा सामना करावा लागेल. चंदगड आणि आजार या दोन्ही तालुक्यांचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील पट्ट्यात येत असल्याने अनेक पर्यावरणीय प्रश्न नव्याने उभा राहणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करून हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा. इथला निसर्ग, इथले पर्यावरण अजूनही टिकून आहे. शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांनी त्याला धक्का लागणार आहे म्हणूनच आमचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध आहे.पर्यावरणाची विशेषतः पश्चिम घाटाची प्रचंड हानी करणारा शक्तीपीठ महामार्ग हवाच कशाला असा आमचा प्रश्न आहे. म्हणूनच शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी सोमवार दि १८ ऑगस्ट २०२५ रोजी आम्ही सर्व शेतकरी मोर्चाने तहसील कार्यालयावर येत आहोत निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक, श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, शिवसेनेचे युवराज पोवार, काँग्रेसचे संजय सावंत, रवींद्र भाटले, गिरणी कामगारचे शांताराम पाटील, कॉ संजय तरडेकर, शिवाजी इंगळे, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे,युवराज जाधव, संजय देसाई, सुयश पाटील, प्रकाश शेटगे, गंगाराम डेळेकर, अमित गुरव इत्यादींच्या सह्या आहेत.

सिटु सारख्या लढाऊ कामगार संघटनेमुळेच महाराष्ट्रातील कामगारांना न्याय : अॕड. दशरथ दळवी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा/मंदार हळवणकर

सिटु सारख्या लढाऊ कामगार संघटनेमुळे महाराष्ट्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळाल्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अॕड. दशरथ दळवी यांनी व्यक्त केले. ते लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्याच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीने झाली.

ॲड.दळवी म्हणाले, बांधकाम, ऊसतोडणी, शालेय पोषण आहार अशा विविध क्षेत्रांतील कामगारांसाठी सिटुने सातत्याने लढा देऊन न्याय मिळवून दिला आहे. भविष्यात सर्व घटकांना सोबत घेऊन संघटना बळकट करावी, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात काँग्रेसचे जेष्ठ नेते उमेश आपटे यांनी योजना लाभ घेताना कामगारांचा विचार करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांनी गेल्या १५ वर्षांत संघटना मजबूत झाल्याचे नमूद केले. अधिवेशनात प्रीपेड वीज मीटरला विरोध, ६० वर्षावरील कामगारांना पेन्शन व वैद्यकीय योजना कायम ठेवण्याचे ठराव मंजूर झाले.
मागील तीन वर्षांचा अहवाल तालुका सेक्रेटरी कॉ. सुनील पाटील यांनी सादर केला. पुढील तीन वर्षांसाठी ४७ सदस्यीय कमिटी निवडली असून तालुकाध्यक्षपदी कॉ. प्रकाश कुंभार, सेक्रेटरीपदी कॉ. सुनील पाटील (फेरनिवड), उपाध्यक्षपदी रमेश कांबळे व संजय नवकुडकर, सहसचिवपदी अशोक चोथे व रामचंद्र नाईक यांची निवड झाली.जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, संदीप सुतार, मोहन गिरी, आनंदा कराडे, नूर मोहम्मद बेळकुडे, शिवाजी मोरे, रमेश निर्मळे, संजय चौगुले, सुनील पाटील, आनंदा देवार्डे, अशोक चोथे यांनी मनोगत व्यक्त केले.

आभार विजय टेंबुगडे यांनी मानले.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ
कर्मचारी संघटना व संस्था व्यवस्थापनामध्ये करार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राज्यस्तरीय पतसंस्था असलेली स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था कर्मचारी यांना सुमारे रुपये ५० लाखाची भरघोस वेतनवाढ देणेत आली. कर्मचारी संघटना व संस्था व्यवस्थापनामध्ये २०२५ ते २०२७ या तीन वर्षाकरीता करार झाला. सदरची वेतन वाढ ही दिनांक – ०१/०१/२०२५ पासुन लागु केली जाणार असलेचे संस्थेचे चेअरमन श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सांगीतले.

वेतनवाढ करारावर व्यवस्थापन व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांनी स्वाक्ष-या केल्या. सदरची वेतन वाढ ही रुपये ५,१६६ ते ९,४४० इतकी भरीव देणेत आली आहे. संस्थेच्या प्रगती मध्ये कर्मचारी यांची भुमीका अत्यंत महत्वाची असते. कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन कर्मचारी यांना दिलेली वेतनवाढ ही केवळ आर्थिक फायदा नसुन कर्मचाऱ्या करीता एक प्रकारची प्रेरणा व सन्मान असलेचे संस्थेचे चेअरमन श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सांगीतले.

संस्थेचे ३१ मार्च २०२५ अखेर वसुल भागभांडवल रु ४,६०,२१,२०० एकूण ठेवी- रुपये -१७०,३९,६७,७४५ कर्जवाटप रुपये १५५,४४,८८,१९९, खेळते भांडवल रु-२१०,२९,१७,५८० व निव्वळ नफा रु. १,११,२०,९०२ इतका आहे.

कर्मचारी पगारवाढ करारावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन  श्री. सुधीर कुंभार, संचालक श्री. नारायण सावंत, श्री. रविंद्र दामले, मा. श्री. रणजित पाटील, श्री. शिवाजीराव येसणे, श्री. गणपत जाधव, श्री. विश्वजित मुंज, श्री. राजेंद्र चंदनवाले, श्री.सुधिर चोडणकर, श्री. मुकुंद कांबळे, संचालिका सौ. सुनिता कुंभार,सौ. सारीका देसाई, सुकाणु समिती सदस्य श्री. मलिककुमार बुरुड, श्री. अरुण देसाई, श्री.उतम कुंभार संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. अर्जुन कुंभार, कर्मचारी संघटना उपाध्यक्ष श्री. जोसेफ लोबो, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आभार कर्मचारी संघटना उपाध्यक्ष श्री. जोसेफ लोबो यांनी मांडले.

आजरा मर्चंट्स ची वार्षिक सभा उत्साहात
२५ लाख ८६ हजार रुपये नफा : अध्यक्ष कारेकर यांची माहिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आजरा या पतसंस्थेस आर्थिक वर्षांमध्ये २५ लाख ८६ हजार ९०७ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कारेकर यांनी सांगितले. संस्थेच्या ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

उपस्थितांचे स्वागत संचालक दिवाकर नलवडे यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव रुद्राप्पा पाटील यांनी मांडला.

अध्यक्ष कारेकर यांनी संस्थेवर सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी दाखवलेला विश्वास व कर्मचारी वर्गाचे प्रयत्न यामुळे प्रगती सुरू असून संस्थेने सहकार खात्याचे आदर्श प्रमाण ठेवले असल्याचे सांगितले. सभेमध्ये ज्येष्ठ सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभार संचालक गोपाळ जाधव यांनी मांडले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरज जाधव, संचालक बसवराज गुंजाटी, दिवाकर नलवडे, शिवलिंगाप्पा तेरणी, शामराव कारंडे, ऋषिकेश महाळंक, संचालिका सौ. स्मिता टोपले, उमा हुक्केरी तसेच सभासद उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात ‘प्रती सरकार’ वर प्रा. माळगी यांचे व्याख्यान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि आजरा महाविद्यालय, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रती सरकारचे योगदान’ या विषयावर ख्यातनाम विचारवंत प्रा. राजा माळगी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
महाविद्यालयातील मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्यावतीने या कार्यक्रमाचे संयोजन केले असून हुतात्मा सहकारी साखर कारखाना, वाळवा चे अध्यक्ष श्री. वैभव नागनाथ नायकवडी यांच्या आर्थिक सहकार्याने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेशअण्णा कुरूणकर, सर्व संचालक, सल्लागार आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या व्याख्यानास सर्वांनी अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृह येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. अशोक सादळे आणि विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले आहे.

श्री भावेश्वरी विकास सेवा संस्था सुलगांवच्या चेअरमन पदी वसंत देसाई तर व्हा. चेअरमनपदी सागर कसलकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सुलगाव येथील श्री भावेश्वरी विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या संस्थेत आजरा साखर कारखाना व जनता बँकेचे संचालक श्री. रणजीत देसाई यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. आज नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत माजी सरपंच श्री. वसंत आप्पासाहेब देसाई यांची चेअरमन पदी व माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर गुंडू कसलकर यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन व व्हा. चेअरमन पदांची नांवे श्री. गणपतराव कुंभार व श्री. दिनकर देसाई यांनी सुचविली त्यास श्री संजय गुरव व श्री महेश कांबळे यांनी अनुमोदन दिले.
या विकास संस्थेची सन २०११मध्ये स्थापना होवून सुलगांव सारख्या अल्प जमीन क्षेत्र असलेल्या छोट्याशा गावात संस्था सहकारी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करीत उत्तम प्रकारे सुरू आहे. संस्थेची स्थापनेपासून दरवर्षी १०० टक्के कर्ज वसुली होत असून सतत आॅडीट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे. यापुढेही संस्थेचा कारभार पारदर्शी व सभासदांच्या हिताचाच करणार असलेची ग्वाही नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी दिली. श्री. प्रमोद फडणीस, सहायक निबंधक श्रेणी -२ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

यावेळी माजी अध्यक्ष श्री. रणजीत देसाई, सरपंच श्री. पांडुरंग खवरे, उपसरपंच श्री. सदानंद कदम, सदस्य श्री. प्रल्हाद देसाई,माजी सदस्य श्री. रविंद्र कदम,संस्थेचे संचालक श्री. बबन देसाई, श्री. दशरथ लांडे, श्री. अनिल विठ्ठल देसाई, संचालिका श्रीमती विमल डोंगरे, सौ. शितल देसाई, श्री. संजय डोंगरे, श्री. आनंदा डोंगरे, श्री. सौरभ कसलकर तसेच सेक्रेटरी श्री. बसवराज उत्तुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

रेजीना डाॅमणीक फर्नाडिस यांची आजरा तालुका राष्ट्रवादी महीला अध्यक्षपदी निवड 
करण्यात आली आहे.

यासाठी माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अनील फडके, के.डी.सी.सी. बँकेचे संचालक सुधीर देसाई व आजरा येथील पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

 

संबंधित पोस्ट

‘अंजुमन इत्तेहादुल’ वर शासकीय रिसिवर म्हणून डी.डी. कोळी यांची नेमणूक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चराटी यांचे आरोप बालिशपणाचे…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!