mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार   दि. १९ जानेवारी २०२५  

आजऱ्यात आज बैलगाडी शर्यतीचे धुमशान

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     बकासुर प्रेमी ग्रुप च्या वतीने आज रविवारी आजरा येथील क्रीडा संकुलामध्ये सकाळी दहा वाजता भव्य बैलगाडी शर्यत ओपन सेकंद (महाराष्ट्र-कर्नाटक) स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक रवींद्र पारपोलकर यांनी दिली . आजऱ्यात प्रथमच बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आह

      या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.

      या स्पर्धेसाठी १५००१/-रु., १२००१/- रु .,१०००१/-रु., ८००१/-रु., ६००१/-रु., ४००१/-रु., २००१/-रु. व विजयी सर्व क्रमांकासाठी शील्ड अशी बक्षिसे आहेत. प्रवेश फी १०००/- रुपये आहे. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आजऱ्याचे माजी नगरसेवक किशोर पारपोलकर, शिवसेना आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, स्वामी विवेकानंद पतसंस्था उपाध्यक्ष सुधीर कुंभार, रमण सावंत, अश्विन डोंगरे, अशोक पाचवडेकर, दत्ता पारपोलकर, संदीप पारपोलकर उपस्थित राहणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री झाले…

आज-यात आनंदाला उधाण आले

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याचे जाहीर होताच आजरा येथील मंत्री आबिटकर प्रेमी व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आतषबाजी करून साखर पेढ्यांचे वाटप केले.

        येथील संभाजी चौकामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला यावेळी विजय थोरवत, राजेंद्र सिंह सावंत, संजय पाटील,संतोष भाटले, धनंजय पाटील, प्रकाश सावंत, इंद्रजीत देसाई, विनोद जाधव, प्रथमेश हरमळकर, मंदार बिरजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

पोळगाव येथे आग… अडीच लाखाचे नुकसान


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पोळगाव ( ता.आजरा) येथे शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत ऊस, तुर, ठिबक सिंचन व पाण्याची पाईपलाईन जळून खाक झाली. जीवन शेवाळे यांचे यामध्ये नुकसान झाले.

      आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

आजरा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी श्री. अशोकण्णा चराटी व व्हा. चेअरमनपदी श्री. संजय चव्हाण यांची निवड


            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या चेअरमनपदी अशोक चराटी व व्हाईस चेअरमनपदी संजय चव्हाण यांची एकमताने निवड झाली आहे. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  श्री. अमोल येडगे (जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर) यांनी काम पाहीले.यावेळी रिक्त झालेल्या जागी श्रीमती अन्नपुर्णा काशिनाथ चराटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

      नुतन चेअरमन श्री. अशोक काशिनाथ चराटी यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने अण्णा भाऊ व त्यांच्या संस्थापक सहकाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक व्यवहार करुन बँकेचा नाव लौकीक वाढविणेसाठी सर्व संचालकांना विश्वासात घेवून काम करणार असलेचे सांगून बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त करुन देण्याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

      व्हाईस चेअरमन श्री. संजय विष्णू चव्हाण यांनी संचालकांनी सोपविलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडू अशी याप्रसंगी ग्वाही दिली.

     यावेळी बँकेचे सर्व संचालक, अधिकारी  उपस्थित होते.

ब्रह्माकुमारीजतर्फे आज व्याख्यान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आज-यामध्ये १९८२ पासून कार्यरत असलेल्या ब्रह्माकुमारीज विद्यालयामार्फत आजरा तालुक्यातील सर्व वारकरी लोकांसाठी आज रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते ११.३० यावेळी श्रीमद्भगवद्गीतेवर ‘ प्रश्नाकडून प्रसन्नतेकडे ‘ नेणारी श्रीमद् भगवद्गीता या विषयावर डॉ. सचिन परब, मुंबई यांचे प्रवचन ब्रह्माकुमारी राईस मिल जवळ, सुखधाम येथे होणार आहे. हा कार्यक्रम ब्रह्माकुमारीस विद्यालयाच्या धार्मिक प्रभागाद्वारे आयोजित केला आहे असे संस्थेच्या मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी संध्या बहनजी यांनी सांगितले.

आज शहरात…

राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव आजचा प्रयोग…वॉक इन

लेखक : डॉ.श्रदानंद ठाकूर

सादरकर्ते : नित्यश्रद्धा फाउंडेशन,आजरा.

वेळ : सायंकाळी ७-०० वाजता

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

खलिफा एज्युकेशनल अँड वेल्फेअर ट्रस्ट, आजरा यांच्या वतीने सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मर्कज मस्जिद नाईक गल्ली, आजरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आजरा महाविद्यालय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

प्रमुख उपस्थिती:- अजितकुमार कोष्टी

वेळ : सकाळी ९-०० वाजता

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याकडून चालू हंगामातील संपूर्ण ऊस बिले अदा

mrityunjay mahanews
error: Content is protected !!