mrityunjaymahanews
अन्य

Breaking News

गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०२५       

घरासमोरच अपघात…
चिमुकल्याचा मृतदेह दिसलाच नाही..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

यमेकोंड ता. आजरा येथील सहा वर्षीय साहील शिवाजी कांबळे उर्फ बाब्या हा चिमुकला बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरातून खेळण्याच्या निमित्ताने बाहेर पडला. तो बराच वेळ झाला तरी परतला नसल्याने घरच्यांनी शोध मोहीम सुरू केली. आजूबाजूचा परिसर डोंगर भाग, शेती, विहिरी सर्वत्र त्याचा शोध घेतला परंतु तो आढळला नाही. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.परंतु त्याचा शोध काही लागला नाही.

आज गुरुवारी सकाळी त्याच्या घरासमोर सुरू असणाऱ्या दुसऱ्या कुटुंबीयांच्या बांधकामाशेजारी असणाऱ्या गटरमध्ये त्याचा सिमेंट चौकट अंगावर पडून अडकलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. गटर शेजारी असणाऱ्या झाडीमुळे त्याचा मृतदेह दिसला नाही.

गटर शेजारून जात असताना कदाचित त्याचा रचलेल्या विटांना टेकून उभा केलेल्या चौकटीला हात/धक्का लागला असावा व चौकट कोसळून त्याखाली तो अडकून मृत पावला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू झाला आहे.

घरासमोरच घडलेल्या या दुर्घटनेमध्ये सिद्धांत याचा मृत्यू झाला असावा याचा पुसटसा अंदाजही  ग्रामस्थांसह त्याच्या कुटुंबीयांना आला नाही.

या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

संबंधित पोस्ट

महायुतीला धक्का…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!