mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


विटे येथील चाळोबा देव विकास सेवा संस्थेचे १०७ सभासद कमी केले

सहाय्यक निबंधकांचा आदेश

          आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      विटे तालुका आजरा येथील चाळोबादेव विकास सेवा संस्थेच्या १०७ सभासदांच्या नावे कार्यक्षेत्रातशेत जमीन नाही, घर नाही, शेतीचे खाते नाही अशी परिस्थिती असल्याने त्यांचे सभासदत्व सभासद रजिस्टर मधून कमी करण्यात यावे अशी मागणी गुंडू पाटील यांनी तक्रार केली होती ‌. या तक्रारीवरून १०७ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश सहाय्यक निबंधकांनी दिल्याने  सभासदांत खळबळ उडाली आहे

      पाटील यांनी तक्रार केलेल्या १०७ सभासदांचे कार्यक्षेत्रातील रहिवास व शेत जमीन नसल्याचे तहसीलदारांकडून मिळालेल्या दाखल्यातून स्पष्ट होत असल्याने ‘त्या’ १०७ सभासदांचे सभासद रजिस्टर मधून कमी करण्यात यावे असे आदेश सहाय्यक निबंधक सुजय येजरे यांनी दिले आहेत.

ग्रामपंचायत खानापूर यशवंत ग्रामपंचायत यशवंत सरपंच पुरस्काराने सन्मानित

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     खानापूर ता. आजरा या ग्रामपंचायतीला
सन२०२३/२४ चा यशवंत ग्रामपंचायत व यशवंत सरपंच पुरस्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक देऊन गौरवण्यात आले.

    यावेळी सरपंच कल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे , ग्रामपंचायत सदस्य विश्वास जाधव,अलका चव्हाण, सुशिला जाधव, लीलाताई दोरुगडे व रामचंद्र डोंगरे यांच्यासह खानापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

तेजस पारपोलकर यांचा सत्कार

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजऱ्यातील प्रा. तेजस गणपती पारपोलकर यांची सांख्यिकी अधिकारी, नियोजन विभाग दिल्ली व सांख्यिकी अन्वेशक, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन या दोन पदांवर स्पर्धापरीक्षेव्दारे निवड झाल्याबद्दल श्रीमंत गंगामाई वाचनालयाच्या वतीने शाल, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     ग्रंथालयाचा स्पर्धा परीक्षा विभाग गेली १० वर्षे सुरू आहे. याठिकाणी अभ्यास करून अनेक विद्यार्थी शासनाच्या सेवेत रुजु झाले आहेत. अशा गुणवंतांचा सत्कार करण्याची संधी वाचनालयाला वारंवार मिळत आहे याचा निश्चितच आनंद आहे असे प्रास्ताविकात विजय राजोपाध्ये यांनी सांगीतले.

      आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करून प्रयत्न करा यश नककी मिळेल, आपल्या यशात श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे मोठे योगदान आहे असे प्रा. तेजस पारपोलकर यांनी मनोगतात सांगीतले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांच्या पाठीशी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर सदैव उभे राहील असे अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोक बाचुळकर यांनी सागीतले .

      कार्यक्रमास उपाध्यक्षा गीता पोतदार, सहकार्यवाह विनायक आमणगी, संचालक संभाजी इंजल, सुभाष विभुते, वामन सामंत, रविंद्र हुक्केरी, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखील कळेकर, महादेव पाटील यासह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते.

धोकादायक झाडे रस्त्यावर…
धोकादायक नसलेल्या झाडांची विल्हेवाट

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा-पेरणोली मार्गावरील अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून एकीकडे धोकादायक झाडे आहेत ती धोकादायक परिस्थितीतच असताना दुसरीकडे धोकादायक नसलेल्या वृक्षांची मात्र बेसुमार कत्तल झाल्याचे आजरा तालुक्यात चित्र दिसत आहे.

    आता पावसाळाभर हे धोकादायक वृक्ष कोसळून त्याचा त्रास तालुकावासीयांना होणार असून अनेक लहान मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रार्षी शाहूयंती उत्साहात


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!