mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्याभारतमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

रविवार   दि.२६ आक्टोंबर २०२५

एसटीपी प्लांट जागेला स्थानिक रहिवाशांचा विरोध…
संघर्ष होण्याची शक्यता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नगरपंचायती मार्फत. आजऱ्यातील शिवाजीनगर ऐतिहासिक घाट परिसरामध्ये. स्मशानभूमी व महादेव मंदिर परिसरामध्ये येथील जागेमध्ये प्रस्तावित एसटीपी प्लांट (प्रकल्प) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.त्याला स्थानिक नागरिकांचा व संपूर्ण हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे ही जागा बदलावी अन्यथा संघर्षाला सामोरे जावे लागेल असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला आहे.

सदर नियोजित केलेली स्मशानभूमी व महादेव मंदिर परसातील घाट येथील एसटीपी प्लांट/प्रकल्प साठी जागा हि अत्यंत चुकीची निवड आहे तिथे स्मशानभूमी कार्यरत आहे. आणि नगरपंचायतने हि जागा एस.टी.पी प्रकल्पासाठी वापरणे नियमबाह्य/चुकीचे असून नगरपंचायतीने पर्यायी जागेची व्यवस्था करावी. हा परिसर हिंदूंच्या आस्थेचा परिसर आहे. यामध्ये महादेव मंदिर, मोरजकर महाराज समाधी मंदिर. महादेव मंदिर, लिंगायत समाज स्मशानभूमी. इतर बेवारस यांसाठीची स्मशानभूमी अशा पद्धतीची जागा आहे. ही जागा एसटीपी सारख्या प्रकल्पासाठी वापरणे अत्यंत चुकीचे आहे. हि जागा खुली किंवा मोकळी अशी नाही आहे ती स्मशानभूमी म्हणून वापरात आहे. याला येथील स्थानिक नागरिकांचा तसेच. सकल हिंदू समाज आजरा यांचा तीव्र विरोध राहील. तरी आपण ही प्रस्तावित एसटीपी प्रकल्पासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

काय आहे हा प्रकल्प…?

शहरातील संपूर्ण सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी या ठिकाणी आणून हे पाणी स्वच्छ करून (?) नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. हिरण्यकेशी नदीच्या वाहत्या प्रवाहाच्या वरच्या दिशेला हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. भौगोलिक दृष्ट्या हा भाग उंचीवर असल्याने येथे शहरातील ड्रेनेजचे पाणी उचलून आणणे कितपत शक्य होणार हा संशोधनाचा विषय आहे. अत्यंत अपुऱ्या व तोकड्या जागेमध्ये उभारला जाणारा हा प्रकल्प भविष्यात अपयशी ठरला तर या भागातील नागरिकांचे पाणी प्रदूषण व दुर्गंधीमुळे जगणे अवघड होणार आहे. या परिसराचे पावित्र्यही नष्ट होणार आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ऐन दिवाळीत कोटींची उड्डाणे
बँका पतसंस्था मालामाल.


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील प्रमुख बँका सहकारी पतसंस्थांकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ३० ते ३५ कोटींच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्याने बँका व पतसंस्था मालामाल झाल्या आहेत. याव्यतिरिक्त तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या पतसंस्थांनी दहा ते पंधरा कोटींच्या ठेवी जमा केल्या आहेत.

आजरा तालुका हा सहकार पंढरी म्हणून ओळखला जातो. अनेक सहकारी संस्था नेटक्या कारभारामुळे संपूर्ण राज्यभर चर्चेत आहेत. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने खास मोहीम राबवून आजरा अर्बन बँक, जनता सहकारी बँक, श्री. रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी, स्वामी विवेकानंद पतसंस्था, जनता सहकारी गृहतारण संस्था या संस्थांसह छोट्या-मोठ्या पतसंस्थांनी या ठेवी जमा केलेल्या आहेत. हा ठेवींचा आकडा निश्चितच कौतुकास्पद तर आहेच परंतु त्याच बरोबर यामुळे सहकारी संस्थांची विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे. शिक्षक व सेवक वर्गाच्या पतसंस्थांनीही ठेवी जमा करण्यात आघाडी घेतली आहे.

सोन्या चांदीचे दर वधारल्याने गुंतवणूकदारांनी ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेत बँका व पतसंस्थांमध्ये गुंतवणुकांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

नगरपंचायत  निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहा..

आमदार सतेज पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा शहरामध्ये काँग्रेसची भक्कम बांधणी आहे. तालुक्यातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. आग्रा येथील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.अशोक तरडेकर, अभिषेक शिंपी यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.

बैठकीस सदाशिव डेळेकर, अमित खेडेकर, किरण कांबळे, इम्रान सोनेखान, पांडुरंग जाधव, सुनिल पाटील, विक्रम पटेकर, विश्वास जाधव, विलास पाटील, रवी भाटले, उत्तम देसाई, संजय सावंत, अशोक पवार, समीर गुंजाटी, सुनील शिंदे, सुधीर जाधव, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान शिवसेना (उ.बा.ठा.) पदाधिकाऱ्यांनीही आमदार पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

वारी चालली…

सिरसंगीतून दिंडी निघाली पंढरपुरी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सिरसंगीतून पायी दिंडी पंढरीला निघाली असून सांप्रदायिक मंडळ व पंचक्रोशी मंडळाची दिंडी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.

शिरसंगी सांप्रदायिक मंडळाची ही २४ वी पायी वारी असून या दिंडीचे प्रमुख म्हणून हभप बळवंत गोविंद चौगुले करत आहेत. तर पंचक्रोशी मंडळ पायी दिंडीप्रमुख अनंत सुतार आहेत.दोन्ही दिंडी मधून अंदाजे सव्वाशे वारकरी सहभागी झाले असून कार्तिक वारीसाठी बसद्वारे सिरसंगी गावातील ३०० वारकरी प्रतिवर्षी पंढरपूरला जातात.

श्री साई ग्राम दूध संस्थेमार्फत उत्पादकांना भेटवस्तू वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सिरसंगी येथील श्री साई ग्राम दूध संस्थेमार्फत उत्पादकांना दीपावलीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री.संदीप चौगुले होते.

चेअरमन श्रावण होडगे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले.यावेळी सरपंच संदीप चौगुले यांनी उत्पादकांना मार्गदर्शन करताना दूध उत्पादन फक्त जोडधंदा म्हणून न करता व्यवसाय म्हणून करा असे आवाहन केले.
यावेळी संस्थेकडून दहा टक्के प्रमाणे दुध फरक वाटप करण्यात आला त्याचबरोबर उत्पादकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी नंदकुमार दळवी, शिवाजी होडगे चाळू चौगुले पांडुरंग टकेकर, वसंत सुतार, संतोष चौगुले, शंकर चंदगडकर शंकर होडगे किशोर देवगुंडे ,अजित बुडके, लक्ष्मण चौगुले, तुकाराम कांबळे, सौ. अश्विनी अमोल होडगे ,सौ.विमल बाजीराव पाटील, अशोक सुतार सचिव दत्तात्रय होडगे उपस्थित होते.

छायावृत्त…

चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या (सिटू) वतीने पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यासोबत थकीत पगार, बोनस, कर्मचाऱ्यांची देणी यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचारी वर्गाचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
यशोदा पाटील-आर्दाळकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खेडे ता.आजरा येथील श्रीमती यशोदा गणपतराव पाटील-आर्दाळकर (वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजकडील कर्मचारी प्रकाश पाटील-आर्दाळकर यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन रविवार दि. २६ रोजी सकाळी खेडे येथे आहे.

 

संबंधित पोस्ट

कीणे येथे भिंत कोसळून महिला ठार

mrityunjay mahanews

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव देसाई

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

mrityunjay mahanews
error: Content is protected !!