mrityunjaymahanews
अन्य

तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव देसाई

 

आजरा तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव देसाई तर

उपाध्यक्षपदी गणपती सांगले : बिनविरोध निवडी

आजरा तालुका शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव रामराव देसाई यांची तर उपाध्यक्षपदी गणपती विष्णु सांगले यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा गडहिंग्लजचे सहाय्यक निबंधक अमित गराडे होते.

अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. अध्यक्षपदासाठी श्री. देसाई यांचे नाव एम. के. देसाई यांनी सूचविले. महादेवराव पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी श्री. सांगले यांचे नाव सौ. मायादेवी पाटील यांनी सूचविले. मधुकर येल्गार यांनी अनुमोदन दिले. सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा, एम. के. देसाई, अध्यक्ष देसाई व उपाध्यक्ष श्री. सांगले यांची भाषणे झाली. नूतन पदाधिकाऱ्यांचा श्री. गराडे यांच्या हस्ते सत्कार झाला.

मुकुंदराव देसाई, वसंतराव घुरे, राजू होलम, अनिल फडके, शिरीष देसाई, श्रीमती अंजनाताई रेडेकर, सुभाष देसाई, संचालक उदयराज पवार, महादेव हेब्बाळकर, संभाजी तांबेकर, डी. ए. पाटील, ज्ञानदेव पोवार, राजाराम पाटील, सुनिल देसाई, सोमनाथ होडगे, संचालिका सौ. राजलक्ष्मी देसाई, गणपती कांबळे, महेश पाटील,सौ. भैरवी सावंत, शंकर पावले, जयराम संकपाळ, आप्पासाहेब देसाई,धनाजी शिंदे,गोविंद पाटील आदी उपस्थित होते. व्यवस्थापक जनार्दन बामणे यांनी स्वागत केले. मधुकर येल्गार यांनी आभार मानले.

मृत्युंजय महान्युज’च्या बातमीची निवडस्थळी चर्चा…

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच ‘मृत्युंजय महान्युज’ने अध्यक्षपदी विठ्ठलराव देसाई यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव सांगले यांची निवड होणार असल्याचे स्पष्ट केले होते. आज निवडीनंतर या वृत्ताची चर्चा होती. इतर राजकीय अंदाज तंतोतंत वर्तवणाऱ्या ‘मृत्युंजय महान्यूज’चा हा अंदाजही अगदी शंभर टक्के सत्यात उतरला आहे.


सुळे येथून एक जण बेपत्ता

सुळे (ता. आजरा) येथून अमित वसंत कांबळे ( वय वर्षे ३८) हे बेपत्ता झाले आहेत.

२४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेलेले कांबळे अद्याप परतलेले नाहीत. याबाबतची वर्दी बाबुराव बंडू कांबळे यांनी दिली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

…………………. …………………………………

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

अनुसया पोवार यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

mrityunjay mahanews
error: Content is protected !!